खुन्या

Submitted by Mandar Katre on 18 March, 2016 - 23:52

विलवडे गावातील सगळी मंडळी आज देवळात एकत्र जमली होती . एका मोठ्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गहन चर्चा सुरू होती . भुस्कूटे बाबा भयानक संतापला होता . भुसकुटे बाबा गावातील फार मोठा मांत्रिक होता . देवर्षी बाबाचा दरारा फार मोठा होता ... पण याच भुसकुटे बाबाचा थोरला मुलगा रमानाथ आत्यंतिक वेदनेत तळमळत गावातील सरकारी दवाखान्यात पडला होता ,आणि गावावरचे हे संकट निवारण्यासाठी गावाची बैठक देवळात सुरू झाली होती ...

याचे कारण असे की रमानाथ कॉलेज ला शिकायला होता . कॉलेज गावातून 20 किमी लांब होते . पहाटे 5.00 वाजताची एस टी पकडून तालुक्याच्या गावात जावे लागायचे ... रमानाथ च्या घरातून एस टी स्टँड पर्यंतचा रस्ता घनदाट जंगलातून जायचा ... तर माघ अमावास्येला पहाटे साडेचार ला रमानाथ घरातून निघाला ... आणि गिरोबाच्या चिंचेजवळ पोहोचला ... तिथून एस टी स्टँड हाकेच्या अंतरावर होता ... तेवढ्यात गिरोबाच्या चिंचेवरून धप्पदिशी काहीतरी पडले ,ते थेट रमानाथ च्या मानेवर ... त्या अनाहूत हल्ल्याने रमानाथ पार गळपटला ... घामाघूम झाला ... तोंडातून शब्दही फुटेनासा झाला .... तसाच बेशुद्ध पडून होता ... शेवटी सात वाजता शाळेत जाणार्याग मुलांनी त्याला पाहिला आणि भुसकुटे बाबाला खबर दिली ... बाबाने मग ताबडतोब रमानाथला सरकारी दवाखान्यात हलवले .... आज सात दिवस झाले , सगळे डॉक्टरी उपचार झाले , तरीही त्याचा ताप कमी होत नव्हता ....म्हणून शेवटी नाईलाजास्तव देवाला कौल लावून प्रश्न विचारायचे ठरले ....

तर बैठकीत देवाला कौल भरण्यात आले , तेव्हा देवाने उत्तर दिले की “ हा प्रेमप्रकरणाचा विषय असून तुझ्या वैर्या ने तुझ्यावर गावचा खुन्या सोडला आहे ... “ त्यावर बाबा अचंभीत झाला ... कारण बाबाला यातले काहीच माहीत नव्हते ... म्हणून बाबाने “आणखी चौकशी करून मग सगळे भागवतो “,असा शब्द देवाला दिला ,आणि कौल उतरवून बैठक तिथेच संपली .....

रमानाथ च्या कॉलेज मध्ये निशा नावाची एक मुलगी होती. निशा दिसायला खूपच सुंदर, मोहक आणि आकर्षक होती ... कॉलेज मधले बरेचजण तिच्यावर मारत होते ...पण टी कुणालाच भाव देत नसे ... तिला मात्र रमानाथ मनापासून आवडत होता ... हळूहळू दोन मने जुळली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ... पण इथेच घात झाला .... कुणीतरी निशाच्या वडिलांना चुगली केली आणि दोघांच्या प्रेमाचं बभ्रा झाला.... निशाचे वडील भाऊसाहेब लटके हे तालुक्यातील मोठे प्रस्थ .... राजकारणी .... जिल्हा परिषद अध्यक्ष होते ... आणि आपली मुलगी एका सामान्य खेड्यातील मांत्रिकाच्या मुलाच्या प्रेमात पागल व्हावी हे भाऊसाहेबांना रुचले नाही... त्यांना तो आपला अपमान वाटला ... त्यांनी निशाला खूप समजावून पाहिले ..पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती .... “मला रमानाथ पासून वेगळे कराल तर मी जीव देवून आत्महत्या करीन” अशी धमकीही तिने वडिलांना दिली ....

सगळे उपाय थकल्या वर मग भाऊसाहेबांनी आपला विश्वासू तांत्रिक शाह बाबा नूर बंगाली ला पाचारण केले. याच शाह बाबाच्या मदतीने त्यांनी मागची निवडणूक जिंकली होती... त्यासाठी त्याला पाच लाखाची मजबूत दक्षिणा देखील दिली होती... मग शाह बाबाने रमानाथ ज्या गावात राहायचा त्या विलवडे गावाच्या स्मशानात माघ अमावास्येच्या रात्री काही तांत्रिक विधी केले , आणि तिथल्या “खुन्या” नावच्या शक्तीला पाचारण करून बोकडाचा बळी दिला ... आणि रमानाथ चा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली .... नेमक्या त्याच रात्री पहाटे रमानाथ गिरोबाच्या चिंचेजवळ झपाटला होता ......

भुसकुटे बाबाला हे सगळे समजले ते त्याच्या गुरु बाबा दीनानाथ कडून ... भुसकुटे बाबा अडचणीत असला की आपला गुरु बाबा दीनानाथ कडे धाव घ्यायचा ... दीनानाथ ने समाधी लावून सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग डिटेलवार भुसकुटे ला सांगितल्या ... आता ताबडतोब रमानाथ ला घेवून गिरोबाच्या चिंचेजवळ जा आणि तिथे एक नारळ कोंबडा दे आणि रमानाथ ला सांगायचे की आजपासून मी निशाचा नाद कायमचा सोडला .... एवढे केल्यानंतर तुझा पोरगा लगेच बरा होईल ....

भुसकुटे बाबाने मग ताबडतोब रमानाथ ला दवाखान्यातून बाहेर काढून गिरोबाच्या चिंचे जवळ आणले , आणि बाबा दीनानाथच्या आज्ञेप्रमाणे विधी केला आणि रमानाथ कडून निशाला विसरण्याची शपथ घेतली ....

दुसर्यारच दिवशी रमानाथ खडखडीत बरा झाला , भुसकुटे बाबाने त्याला कॉलेज मधून काढून टाकले ... आणि घरी शेतीत लक्ष द्यायला सांगितले .. निशालाही तिच्या वडिलांनी मावशीकडे मुंबईत कॉलेजला पाठवले... टी दोघे आता कायमची दूर गेली होती ..पुन्हा कधीही न भेटण्यासाठी ... एका उमलत्या प्रेमाचा करुण अंत झाला , कोवळी मने उद्ध्वस्त झाली ... पण मुलगा वाचला हेच नशीब असे समजून भुसकुटे बाबा गप्प बसला !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users