’बाटा’ रुते कुणाला ..?

Submitted by मानस६ on 12 February, 2009 - 13:51

(चप्पल चावते म्हणून बूट विकत घेतलेत, तर ही गत...)
’बाटा’ रुते कुणाला
(चाल- काटा रुते कुणाला)

बाटा रुते कुणाला?
आक्रंदतो किती मी!
मज बूट ही रुतावे,
हा दैवयोग आहे!
(’आहे’ वर जीवघेणी तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात येणार नाही)
रुते कुणाला....!

सांगु कशी कुणाला,
कळ आतल्या खिळ्याची!
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(तान?... लक्षात असू द्यावी)
रुते कुणाला....!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला.....!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला....!

फुटले नशीब माझ्या,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर ’जा’, ’ये’!
(चोर माझ्या ढापलेल्या जुन्या
वहाणा घालून, माझ्याच समोरुन
’ये-जा’ करतोय)
रुते कुणाला..!

हा ’पायगुण’ माझा,
आहे असा करंटा,
त्या मंदिरात पुन्हा,
बदलून बूट जाये!
रुते कुणाला..!
-मानस६

गुलमोहर: 

या विडंबनाला पहिल्या प्रतिसादाचा मान मिळाला हे मी माझे भाग्य समजतो.

इतके सुंदर विडंबन मी पूर्वी वाचले नाही. "तान" तर खूपच आवडली. मी गाऊन पाहिली. लई इफेक्टिव आहे.

व्वा!

शरद

मस्त ! मस्त ! अगदी पर्फेक्ट ताला-सुरात !
एरवी कविता आणि रसिक यांच्यामध्ये मध्ये कवी आला तर मला आवडत नाही, पण यात उलट मजा आणलीत Happy

बाय द वे बाटा आणि बाटाप्रेमींपासून लपवा बरं का ही Happy

मस्तच.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

छान. Biggrin जमून आलीये तालासुरात.

छान विडंबन... मला एका मेलवर पण आलं होतं अगदी हेच! Happy

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
स्मितहास्याची ही गोलंदाजी
पेलवेल त्याने करावी फलंदाजी....
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

वा! मस्त आहे विडंबन. मानस.. जियो!
-योगेश

मला पण असाच त्रास दिलाय बाटा ने!
खूप मजा आलि वाचून!!:)

सहीच एकदम ! ऑफिस मधे वाचायची चुक केली आणि हसत सुटले (तान एकदम भारीच)

मजा आली. ही पाठ करायला हवी, कामाला येईल.

सर्व रसिकांचे प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार!
-मानस६

क्या बात है मानस.....मजा आ गया Happy