"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या"

Submitted by Mandar Katre on 8 March, 2016 - 00:42

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या"
"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे"
वाडीत आम्ही सगळे बसून मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि रेडियोवर हे गाणं लागलं, वसंतरावांना ते जुनं सगळं आठवलं आणि त्यांनी सांगायला सुरवात केली
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ....फोनची रिंग वाजली ... वसंतरावांनी फोन उचलला आणि समोरून आवाज आला..." सर आय ह्याव कंप्लीटेड ओंल माय रिपोर्ट्स, आय ह्याव स्पेशल इन्फोर्मेशन फॉर यु सर "
वसंतरावांनी विचारलं ..."ओके गो अहेड एंड टेल मी मिष्टर शर्मा "
समोरून शर्माने उत्तर दिलं ....."सर टुमॉंरो आय विल मिट यु ओन युवर ऑफिस एंड आय विल टेल यु एवरीथिंग, मिस्ट्री इज सोल्वड सर "
वसंतरावांनी निश्वास टाकला आणि उद्या आपला सिक्रेट डिटेकटिव्ह काय बातमी देतोय या कडे त्यांचं लक्ष लागलं.ठरल्याप्रमाणे शर्मा दुसऱ्यादिवशी वसंतरावांना त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन भेटला आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून वसंतरावांच्या डोक्यात विचारांची मालिकाच चालू झाली.
वसंतराव आणि त्यांची पत्नी शोभना हे दोघेही पुण्याकडे नावाजलेल्या बँकेत कामाला होते. मोठा मुलगा सुयश पुण्यात शिकायला होता , तो तिकडे त्यांच्या फ्ल्याट वरच राहायचा. बँकेतून सेवा निवृत्त झाल्यानंतर वसंतरावांनी कोकणात जाऊन एखादं छानसं घर खरेदी करून तिकडेच आपलं पुढील आयुष्य घालवण्याचं ठरवलं आणि मग शोध चालू झाला कोकणातल्या घराचा.
कोणत्यातरी वेबसाईटवर एक घर बघून त्यांनी कोकणात वेळासला जाऊन ते घर बघून घेतलं, घर दिसायला सुस्थितीत, घर कसलं अलिशान बंगलाच होता तो. नारळी पोफळीच्या वाडीत वसलेलं ते घर , पाठीमागे अथांग समुद्रकिनारा आणि थंडगार वाहणारे वारे . बंगला बघता क्षणीच शोभनाच्या मनात भरला.ठरलं मग, आपला शोध इथेच संपला आणि त्यांनी ते घर खरेदी करण्याचा विचार केला.
घरमालक चाव्हाण त्यांच्या सोबतच होते. वसंतरावांनी घर घेण्याचं ठरवल्यानंतर येत्या सोमवारी रजिस्ट्रेशन करून पुढे एका आठवड्यात ताबा घेण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे सोमवारी रजिस्ट्रेशन हि झालं. वसंतराव आणि शोभना रजिस्ट्रेशन पूर्ण करून पुन्हा पुण्याकडे निघून गेले. नंतर साधारण ५ दिवसांनी चव्हाणांनी त्या घरातून आपलं सर्व सामान त्यांच्या राहत्याघारी माणगावला हलवलं आणि ते तिथून निघून गेले.
वसंतरावांनी आपल्या मुलाला पुण्यात सेटल करून आत्ता ते दोघे नवरा बायको कोकणात आपल्या बंगल्यात राहायला आले.
सकाळी पुण्याहून ड्राईव्ह करून वसंतराव थकलेले, शोभना थोडा चहा टाकतेस का ?
शोभना किचन मध्ये गेली आणि तिने ग्यासवर चहा टाकला.वसंतराव बाहेर अंगणात खुर्ची टाकून झाडाच्या सावलीला बसलेले आणि शोभना आत किचन मध्ये होती. डोळे मिटून शांत थंड हवा घेत असलेल्या वसंतरावांना कोणाच्या तरी रडण्याचा आवाज कानावर आला. डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहिलं , आवाज घरातून येत होता.
त्यांनी मोठ्याने आवाज दिला..."शोभना "
घरातून शोभना हातात चहा घेऊन बाहेर आली आणि तिने वसंतरावांच्या हातातला कप पुढे केला ,पण वसंतरावांचं लक्ष घराकडे होतं. ते मागे मान वळवून घराकडे बघून कान देऊन तो आवाज ऐकत होते .
शोभनाने त्यांच्या समोर कप पुन्हा थोडा पुढे केला ..."आहो हे घ्या, काय झालं तिकडे काय बाघता "
वसंतराव शोभनाकडे बघून म्हणाले ....
"काय गं तू रडत होतीस ?"
"नाही , मी तर किचन मध्ये होती "
वसंतराव मनात संशय घेऊन बोलले.."मी आत्ता रडण्याचा आवाज ऐकला"
"आहो मांजरीचा आवाज आला असेल, एक काळ्या रंगाचं मांजर आहे इकडे, मी मगाशी बघितलं होतं "
हम्म असेल....वसंतराव म्हणाले, आणि हातातला कप ओठांवर लावून चहाचा झुरका घेतला .
शोभना पण त्यांच्या बाजूलाच खुर्ची टाकून बसली आणि दोघे समोर समुद्राकडे बघून चहा पीत गप्पा मारत बसले. गप्पा मारता मारता संध्याकाळच्या ५ चे कधी ७ वाजले त्यांनाच समजलं नाही. वाडीत अंधार दाटायला लागला, दोघे खुर्च्या उचलून घरात घेऊन गेले. वसंतराव बाहेर हॉल मध्ये टी.व्ही. लावून बसले आणि शोभना, देव घरात जाऊन दिवा बत्ती करत होती. आत्ता घड्याळात साधारण संध्याकाळचे ७:३० वाजले असतील. देव घरात शोभना माळ जपत बसली म्हणून बाहेर बसलेल्या वसंतरावांनी टी.व्ही.चा आवाज कमी केला. आवाज कमी करताच त्यांना कोणीतरी काहीतरी गुणगुणत असल्याचा आवाज कानावर आला.....
त्यांना वाटलं शोभना माळ जपत आहे बहुदा त्याचा आवाज असेल...त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही, थोड्या वेळाने ते पाणी प्यायला किचनकडे जायला निघाले....समोर शोभना डोळे मिटून माळ जपत होती ...पण तो गुणगुणण्याचा आवाज त्यांना अजून है ऐकायला येत होता.... शोभना तर समोर बसली आहे, मग हा आवाज कुठून येतोय...हातातला पाण्याचा ग्लास ओट्यावर ठेवून ते आवाजाच्या दिशेने आपली पावलं टाकायला लागले....आणि त्यांची पावलं ..बेडरूमच्या दिशेने जायला लागली...आवाज बेडरूम मधूनच येत होता. ते बेडरूमच्या एकदम जवळ पोहोचले, दरवाजा एका हाताने सरकवला हळूच वाकून आत नजर टाकणार इतक्यात मागून त्यांच्या खांद्यावर खूप जोराने नखं टोचल्या सारखं झालं .....ते मोठ्याने ओरडले...."ए .....ए...."
त्यांनी आपल्या एका हाताने खांद्यावर हात फिरवला आणि जोराने झटकला .....धप्प असा आवाज झाला आणि ते काळं मांजर त्यांच्या खांद्यावरून जमिनीवर पडलं......आणि दरवाजातून पळत बाहेर निघून गेलं. खोलीतून येणारा रडण्याचा आवाज एकाच क्षणात थांबला ,शोभना ने वसंतरावांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि ती धावत बेडरूमजवळ आली ...
"काय हो काय झालं , मोठ्याने ओरडलात "
" आगं इथे ह्या बेडरूम मध्ये ....." आणि ते बोलायचे थांबले. क्षणार्धासाठी त्यांच्या मनात विचार आला..."आपण शोभना ला हे सांगितलं तर ती घाबरून जाईल "
म्हणून ते बोलता बोलता गप्प बसले.....आणि म्हणाले ..."इथे बेडरूम मध्ये येत होतो तर अचानक मांजर खांद्यावर उडी मारून बसलं, नखं टोचली खांद्यावर म्हणून ओरडलो, बाकी काही नाही "
शोभना म्हाणाली ..." हो मी मगाशी म्हणाले ना तुम्हाला आहे इकडे एक काळं मांजर"
थोड्या वेळाने जेवणं आटोपल्यावर ते दोघेही बेडरूम मध्ये जाऊन आडवे पडले, अंगावर गोधडी गेऊन डोळे मिटून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले आणि बोलता बोलता झोपी गेले.
असेच दोन दिवस निघून गेले ,आकाशातल्या चंद्राचा आकार हळू हळू कमी होत गेला .आणि एकदिवस अमावस्या आली.पहाट झाली वाडीत कोंबडा आरवला,शोभना उठून बाहेर अंगणात गेली आणि झाडलोट करायला लागली, वसंतराव खाटेवर झोपलेले, अंगणात फिरणाऱ्या खराट्याच्या आवाजाने त्यांना पण जाग आली, उठताच क्षणी त्यांच्या मनात काल घडलेली घटना पुन्हा आपली भीती घालून गेली, अंघोळ्या आटोपून दोघांनी चहा नास्ता केला आणि वसंतराव वेळासला बाजारपेठेत मच्छी आणायला म्हणून गेले. साधारण १० वाजता परत घरी आले ,हातात मछीची पिशवी , दुसऱ्या हातात कोथिंबीर , आलं लिंबू ची पिशवी . काळं मांजर दारातच बसलं होतं . त्या मांजराला बघून वसंतरावांनी जिन्याजवळ पडलेली काठी उचलली आणि मांजराला हुस्कावलं .....मांजर ओटीवरून धावत पळालं . वसंतराव दोन पायऱ्या वर चढून ओटीवर आले , पायातली चप्पल काढायला नजर खाली वळवली आणि ....जे समोर दिसलं ते बघून गडबडले.....
मांजर धावत तर गेलं होतं पण जाताना मागे रक्ताने माकलेले पायाचे ठसे सोडून गेलं.मांजराच्या पायाने माणसाच्या पायाचे ठसे कसे उमटले ...हे बघून त्यांना धडकी भरली .हा काहीतरी विचित्र प्रकार आहे हे हळू हळू त्यांच्या लक्षात येत होतं , संशयाचे ढग मनाच्या भोवती अधिकच गर्द होत चालले होते.पण नक्की काय घडतंय त्यांच्या लक्षात येईना , कारण आत्ता पर्यंत जे काही घडत होतं ते आपले भास असावे .....असं म्हणून ते मनाला समजावत होते .
पण स्वतःच्या मनाला फसवण्याचा त्यांचा खेळ लवकरच संपुष्टात येणार होता हे फक्त नियतीला माहिती होतं.
त्यांनी अंगणात ठेवलेल्या पाण्याच्या पिंपात एक फडकं भिजवून घेतलं आणि लादीवरून मांजरीच्या पायाचे ठसे पुसून काढले. त्या प्र्कारा बद्दल हि त्यांनी शोभनाला काहीच सांगितलं नाही. शोभना ह्या सगळ्या घडणाऱ्या प्रकारांपासून एकदम अजाण होती...
तो त्यांचा त्या घरातला तिसरा दिवस, सकाळी मांजराच्या पायाचे रक्ताचे ठसे बघून वसंतराव भलतेच डिस्टर्ब झाले ,दुपारी जेवण हि व्यवस्तीत केलं नाही आणि कसल्यातरी चिंतेत बाहेर खुर्ची टाकून विचार करत बसले. शोभना च्या हे लक्षात आलं ...तिने त्यांना खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आपल्या मनातलं मनातच दाबून ठेवलं. त्याच दिवशी संध्याकाळी वसंतराव आणि शोभना दोघेही हॉल मध्ये सतरंजी टाकून टी.व्ही. समोर बसून जेवत होते. आपला आवडता कार्यक्रम म्हणून शोभना तो बघण्यात मग्न झालेली आणि वसंतराव शांतपणे एक एक घास खात होते....लक्ष ताटात होतं तेवढ्यात लाईट गेली .
शोभना ..." ह्या लाईट ला पण आत्ताच जायचं होतं, आत्ता मेणबत्ती कुठे आहे शोधावी लागेल " असं म्हणत शोभना मोबाईल ची टोर्च लावून बेडरूम मध्ये गेली, ड्रेसिंग टेबलच्या ड्रोव्हर मधून मेणबत्ती काढली आणि क्चीहन मध्ये गेली, मेणबत्ती पेटवली आणि घेऊन बाहेर हॉंल मध्ये आली. लादीवर मेण टाकून मेणबत्ती त्यावर उभी केली आणि दोघे पुन्हा जेवायला लागले .
जेवण आटोपलं वसंतराव उठले आणि किचन मध्ये जाऊन हात धुवत होते, शोभना बाहेर हॉल मध्ये जेवणाची भांडी गोळा करत होती आणि लाईट आली .
लाईट येताच घरात लख्खं प्रकाश पसरला ....वसंतराव मागे वळले आणि बघतात तर किचनच्या लादीवर रक्ताने माखलेले माणसाच्या पायाचे ठसे उमटलेले. हे ठसे बघून ते घाबरले ....त्यांनी शोभनाला हाक मारली , शोभना भांडी घेऊन उठली आणि मधल्या खोलीत आली....लादीवर उठलेले रक्ताचे ठसे दिसले....तिने मोठ्याने वसंतरावांना हाक मारली....
" ओ ...ओ आहो...हे बघा काय "
वसंतराव पण धावत बाहेर मधल्या खोलीत आले ..... " ते ठसे बेडरूम मधून किचन कडे जाणारे होते
वसंतरावांनी शोभनाला विचारलं तुझे पाय बघू....काहीतरी कापल असेल, पायाला काही लागलं का तुझ्या ..." शोभना ने आपले दोन्ही पायाचे तळवे बघितले , तिच्या तळव्यांना रक्त लागलेलं "
" हे माझ्या पायाला कुठून लागलं " ...शोभना म्हणाली
वसंतराव ...." बघ पाय कापला असेल तुझा, कुठे गेली होतीस आत्ता मेणबत्ती शोधायला ?"
शोभना......." नाही हो काहीच कापलं नाही, मी आत्ता बेडरूम मध्ये गेली होती "
लगेच दोघेही बेडरूम मध्ये गेले ....पण ते ठसे बेडरूम च्या मध्य भागापर्यंतच होते.
हा विचित्र प्रकार बघून शोभना मात्र घाबरून गेली, तीच अवस्था वसंतरावांची होती ....आत्ता मात्र त्यांनी आपलं तोंड उघडलं
त्या घरात आल्यापासून आपल्याला काय काय भास झाले, आपल्याला मांजरीच्या पायाचे रक्ताचे ठसे दिसले होते ...हे सगळं त्यांनी आत्ता शोभना ला सांगून टाकलं आणि आपलं मन मोकळं केलं.
चाव्हाणाने आपल्याला हा बंगला का स्वस्तात विकून ताबडतोब रजिस्ट्रेशन केलं हे त्यांच्या आत्ता लक्षात आलं.
"शोभना , आपण १५ लाखात हे घर घेऊन फसलो , इथे काहीतरी विचित्र प्रकार घडत आहेत "
शोभना काहीच बोलण्याच्या अवस्थेत नव्हती...दोघांनी मिळून ते ठसे ओल्या फडक्याने पुसून काढले .आणि ठरवलं आपण उद्याच इथून पुण्याला निघून जाऊ.
अमावस्येची ती रात्र अधिकच गडद झाली,आणि आपलं अक्राळ विक्राळ रूप धारण करू लागली . वसंतराव आणि शोभना बेडरूम मध्ये बेडवर झोपलेले...बाहेरून खिडकीतून थंड गार हवा आत घरात येत होती. समुद्रांच्या लाटांचा आवाज कानावर पडत होता ...घड्याळाच्या काट्यांच्या आवाज....." टक टक टक टक " त्या रात्रीला अजूनच भयाण करत गेला. दोघांनाही झोप लागेना. आत्ता २-३ तासांपूर्वी घरात घडलेला प्रकार त्यांच्या अंगाचा थरकाप उडवून गेला होता. तोच शोभना ने वसंतरावांचा हात पकडला आणि हळूच कानात सांगितलं ....
" ओ त्या खिडकीपाशी बघा "
वसंतरावांनी खिडकीत आपली नजर वळवली ....रात्रीच्या त्या काळोख्या अंधारात खिडकीतून मिचमिचणारे २ डोळे दिसले ...
एकमेकांना घट्ट पकडून दोघेही शांत पडून राहिले, ते डोळे आत्ता त्यांच्या बेडकडे नजर रोखून स्तब्ध झाले....आणि त्या खोलीत येणारी हवा थांबली ..
एक झटका लागला ...सररर क .....३-४ फुट लांब खाट सरकली आणि खिडकीपाशी ओढली गेली ....आपली खाट खिडकीपाशी ओढली गेली आहे हे बघताच शोभना आणि वसंतराव मोठ्याने ओरडले....
"वाचवा वाचवा ओ ओ कोणीतरी वाचवा " दोघेही ढसढसा रडायला लागले ....तोच अचानक कोणीतरी बाई मोठ्याने किंचाळली.....खिदळायला लागली .
त्या किंकाळीच्या आवाजाने वाडीत कुत्र्यांचा कळप मोठ्याने रडायला लागला...अमावस्येच्या रात्री घरातल्या आत्म्याने जोर धरला .....
हा सगळा प्रकार म्हणजे भुताटकीच
आवाज इतका विचित्र होता कि दोघेही त्या खाटेवरून उठून खोली बाहेर पळाले आणि अंगणात येऊन उभे राहिले. घरातून बाहेर येताच दोघांना थोडा धीर आला, पण भीतीने काळीज अजून धडधडत करतच होतं. इतक्यात वसंतरावांच्या पायाजवळ काहीतरी घासून गेलं ...ते मोठ्याने ओरडले आणि त्यांनी उडी मारली ...मांजर ....एक पाय मांजराच्या अंगावर पडला, पाय पडताच मांजर चवताळून ओरडलं ..... म्याआआआव .
त्या काळोखात त्या काळ्या मांजराचा आवाज अजूनच भयाण वाटला ....त्या विचित्र आवाजाने, घडणाऱ्या आक्रीतामध्ये अधिकच भर घातली ...दोघेही मनातून कचरले बोबडीच वळली आणि धास्ती घेऊन जीवाच्या आकांताने मिळेल त्या मार्गाने दोघांनी गावाकडे पळ काढला. घर तसच उघडं टाकून दोघे त्या काळोखात रात्री २ वाजता पडत धडपत धापा टाकत समोर दिसणाऱ्या वेळास गावात चमकणाऱ्या विजांच्या खांबांच्या दिशेने पावलं टाकत निघून गेले.वाडीपासून वेळास गाव किमान २ किलोमीटर अंतरावर असेल....ह्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला तिथे कोणीच नव्हतं. शोभनाचं रडू थांबेना ,
जीवाच्या आकांताने घाबरून पळत आलेल्या ह्या जोडप्याची मद्द करणारं एवढ्या रात्री तिकडे कोणीच नव्हतं. दोघेही वेळासच्या बस स्थानकात रात्रभर बसून राहिले. आत्ता सगळं शांत शांत वाटत होतं , मन स्थिर झालं ,पहाट झाली. दोघांचाही डोळा लागला , इतक्यात लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला आणि त्यांचे डोळे उघडले ...पहाटे कामावर जाणारी २-४ लोकं तिथे आली होती. काहीतरी मद्द मिळेल म्हणून वसंतरावांनी त्यांच्यातल्या एकाला विचारलं .....
"का हो भाऊ पुण्याला जाणारी गाडी कधी आहे ? "
तो माणूस म्हणाला..." माहिती नाही, पण एक काम करा , रत्नागिरी पर्यंत चला, आत्ता गाडी येईलच, तिथून मिळेल तुम्हाला दुसरी गाडी "
एवढ्यात गाडी आलीच...दोघेही गाडीत बसून पुण्याला रवाना झाले.
झाला प्रकार त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका ज्योतिषाला सांगितला. ज्योतिषाने घराच्या दिशा विचारल्या आणि गणित मांडलं.
ज्योतिषाने पण तेच सांगितलं ज्याचा अंदाज वसंतरावांना हि होताच .
" वसंतराव त्या घरात काहीतरी आक्रीत घडलंय , तुम्ही चांगला मांत्रिक घेऊन जा , तो मोड करेल त्या आत्म्याची "
वसंतरावांनी माणगावला स्थाईक झालेल्या जुन्या घरमालकाला संपर्क साधला , फोन करून विचारणा केली ,
" काय घडलं होतं त्या घरात ?"
चव्हाण ---- मला माहिती नाही तिथे काय घडलं होतं, मी इतकी वर्ष राहिलो तिकडे कधीच काही घडलं नाही , तुम्हाला ३ दिवस नाही झाले तिकडे तुम्हाला कुठून दिसलं हे सगळं "
वसंतराव वारंवार त्याच्यावर दबाव बनवत होते, खोदून खोदून विचारात होते पण तो चाचपडत उत्तरं देत सपशेल खोट बोलत होता , चव्हाण आपली काहीतरी दिशाभूल करतोय वसंतरावांच्या हे लगेच लक्षात आलं "
कोकणात वाडीत आपलं घर उघडं आहे ,गाडीपण वाडीतच आहे , जावं तर लागणारच होतं म्हणून वसंतरावांनी सुयशला सोबत घेतलं आणि ते वेळासला रवाना झाले .
तिकडे जाताच त्यांनी हॉल मधून गाडीची किल्ली उचलली, टेबलावर पडलेलं कुलूप उचललं , टाळ लावलं आणि तिथून माणगावला चव्हाणकडे निघून गेले.
चाव्हांच्या घरी पोहोचायला त्यांना संध्याकाळचे साधारण ७ वाजले.
त्यांनी चव्हाणांच्या घराची बेल दाबली .....एक सुंदर महिला समोर आली, दरवाजा उघडला आणि विचारलं ..." कोण आपण , कोण हवं आहे ?"
सुयश ने उत्तर दिलं ..." आम्ही परांजपे,पुण्याहून आलोय, चव्हाण साहेबांना भेटायचं होतं, आहेत का "
बाईने उत्तर दिलं ..." हो आहेत पण जरा बाजारात गेलेत येतीलच इतक्यात, या न आत बसा "
दोघेही आत घरात जाऊन बसले, बाईने पाणी आणून दिलं , आणि चहा ठेवायला आत गेली .
बाई २ चहाचे कप हातात घेऊन बाहेर आली.... वसंतरावांनी विचारलं ...." आपण ?"
बाई म्हणाली ..." मी त्यांची मिसेस "
हे ऐकताच वसंतरावांच्या कपाळावर आटया आल्या.
"मिसेस ....हि कशी काय चव्हाणांची मिसेस असू शकते, रजिस्ट्रेशन च्या वेळी तर त्यांच्या सोबत वेगळीच बाई आली होती, हि नक्कीच त्यांची मिसेस नाही , काहीतरी गडबड आहे "
चहा पिऊन ते चव्हांणांना न भेटताच पुन्हा पुण्याला माघारी निघून गेले . पुण्यात जाताच त्यांनी ह्या प्रकारचा छडा लावायचं ठरवलं, मित्राने त्यांना एका खासगी डिटेकटिव्हची भेट घालून दिली. देवेंद्र शर्मा .
थोड्याच दिवसांत शर्माने चव्हाण बद्दल माहिती गोळा करण्यास सुरवात केली. आणि अवघ्या १५ दिवसांतच शर्माने वसंतरावांना बातमी दिली .
एक दिवस सकाळ सकाळी शर्माने वसंतरावांना फोन केला ...
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ....फोनची रिंग वाजली ... वसंतरावांनी फोन उचलला आणि समोरून आवाज आला..." सर आय ह्याव कंप्लीटेड ओंल माय रिपोर्ट्स, आय ह्याव स्पेशल इन्फोर्मेशन फॉर यु सर "
वसंतरावांनी विचारलं ..."ओके गो अहेड एंड टेल मी मिष्टर शर्मा "
समोरून शर्माने उत्तर दिलं ....."सर टुमॉंरो आय विल मिट यु ओन युवर ऑफिस एंड आय विल टेल यु एवरीथिंग, मिस्ट्री इज सोल्वड सर "
ठरलेल्या जागी दोघे एकमेकांना भेटले आणि शर्माने जे सांगितलं ते ऐकून वसंतरावांच्या मनातले सगळे फास सुटत गेले.
शर्माने सांगितलं ...
"चव्हाण हा एक रंगील माणूस, त्याचं एका बाई सोबत लफडं होतं, ती बाई म्हणजे माणगावला आत्ता त्याच्या सोबत पत्नी म्हणून राहते ती.
वसंतराव --" मग पढे "
शर्मा -- " सर , त्याच्या पत्नीनीला ह्यांच्या लफड्या बद्दल संशय आला होता, आणि एकदिवस तिने ह्या दोघांना आपत्तीजनक अवस्तेत रंगे हात पकडलं"
वसंतराव ---" मग पुढे काय झालं , त्याच्या बायकोने पोलिसात तक्रार केली का?"
शर्मा --- " नो सर , त्या संध्याकाळी त्याच्या बायकोला वेळास मधल्या लोकांनी त्या वाडीत जाताना बघितलं, वेळास मधला जो रिक्षावाला तिला तिथे सोडून आला होता, त्याच्या माहिती प्रमाणे त्या बंगल्यात त्या दिवशी त्याने २ बायकांना सोडलं होतं. एक बाई नवीनच कोणीतरी होती आणि दुसरी चव्हाणांची बायको"
त्या नंतर चव्हाणांच्या बायकोला कोणीच बघितलं नाही.
शर्माने वसंतरावांना हि माहिती दिली आणि म्हणाला...." सर नाऊ व्हाट आय एम टेलिंग लिसन केयार्फुली "
" त्या बंगल्याच्या बेडरूमच्या मागे खिडकीच्या खाली एक मातीचा ढिगारा पडला आहे, ती माती वाडीत कुठेच उकरली गेली नाही , सर मला १००% खात्री आहे, ती माती त्या घरातूनच खोदली गेली आहे , सर त्या बंगल्यात नक्की काय झालं आहे हे मला सांगता येणार नाही, पण एवढं नक्की सांगतो ती बाई गायब आहे आणि त्या घरात खड्डा खोदला गेला आहे "
वसंतरावांनी क्षणाचा हि विलंब न लावता शर्माला घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी तपास यंत्रणा सज्ज केली आणि तपास चालू झाला , जस जसा तपास पुढे गेला एक एक गूढ उलगडत गेलं.
पोलिसांनी चव्हाणला उचललं आणि थर्ड डिग्री लावली. चव्हाण पटापट सगळं सत्य ओकू लागला ....
चव्हाणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ... चव्हाणाला त्याच्या पत्नीने त्याच्या प्रेयसी सोबत आपत्ती जनक अवस्थेत रंगे हात पकडलं , समाजात आपली नामुष्की होईल, पोलीस केस होईल ह्या भीतीने चव्हाण आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीचा गळा दाबून खून केला . बेडरूम मध्येच खड्डा खोदून तिला तिथेच पुरलं , आणि सगळं प्रकरण दाबलं . पुढे ताबडतोब चव्हाणाने तो बंगला विकून तिथून आपलं बस्तान गुंडाळलं.
पुढे पोलिसांनी बेडरूम खोदून काढलं , बॉडी सापडली , पोस्टमॉंटम रिपोर्ट आला, गळा दाबून हत्या. पुरावे सिद्ध झाले चव्हाणांच्या दुष्कृत्यची बळी त्याची पत्नी ठरली, कायद्याने गुन्हा सिद्ध झाला ,चव्हाण आणि त्याची प्रेयसी खडी फोडायला जेल मध्ये गेले.
इथे वसंतराव परांजपे कुटुंबीयांनी रिती रिवाजाप्रमाणे चव्हाणांच्या बायकोच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले , श्राद्ध घातले, तिचं पिंड दान केलं, आणि कार्य हि केले.
चव्हाणाच्या पत्नीच्या आत्म्याला बहुदा शांती लाभली आणि त्या वेळासच्या वाडीतल्या बंगल्याचा शाप निघून गेला.
वसंतराव आणि शोभना आत्ता त्या वाडीत अधूनमधून राहायला जातात , पण सोबत कोणी ना कोणी नातेवाईक सोबत घेऊनच ...

हे आमचे पेज -

https://www.facebook.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9F%E...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयकथआंची लाट..
मस्त लिहिलयं..
मला वाटली भिती एक दोन ठिकाणी वाचताना.. कोकणातली भूत लय्य वाईट्ट...

Chan ahe katha ....fakt १ shanka ahe ...registration chya veli chavan sobat kon bai hoti mag karan byko tar aadhi meli na ...mg tyane ghar vikayla kadle .