पत्नी म्हणून कुटुंबात वावरताना जे स्थान मिळते त्याची ही काही उदाहरणे! ही रँडम उदाहरणे आहेत.
====================
सोनल - पुण्यातील अत्यंत प्रतिष्ठित घराण्यातील सर्वात धाकटी सून! प्रचंड श्रीमंती, राजवाड्यासारखा बंगला, दिमतीला कित्येक नोकर, घरातील प्रत्येक पुरुष कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात अग्रगण्य अशी एकंदर परिस्थिती! चुलत सासरे हे भारतीय राजकारणातील एक जुने व धुरंधर नेते! घरात रोजच किती पाने जेवून उठतात ह्याची गणती नाही. घरातील बहुतेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या, मंडळाच्या वगैरे चेअरपर्सनपदी! प्रत्येक व्यक्तीला एक वलय! सोनलही महिलांसाठी मोठी चळवळ चालवते. सोनलला दोन मुले आहेत. मोठी मुलगी आता उच्चशिक्षणासाठी परदेशी आहे आणि धाकटा मुलगा कॉलेजमध्ये! एरवी घरात काडीही इकडची तिकडे करावी लागत नाही. पण सासरचे मोठे मोठे लोक जेवायला आले की साडी नेसावी लागते. पदर डोक्यावरून घ्यावा लागतो. प्रथम बाहेरच्या दिवाणखान्यात सर्व पुरुषांची जेवणे होतात. तेथे वाढावे लागते. आतल्या खोलीत त्याचवेळी सर्व लहान मुले जेवत असतात. त्यांनाही वाढावे लागते. त्यानंतर घरातील सर्व सासवा आणि नणंदा जेवायला बसतात. त्यांना सर्व सुना वाढतात. नंतर वयानुसार सगळ्या सुना जेवायला बसतात. त्यांना सर्वात धाकटी असलेली सोनल वाढते. शेवटी मग सोनलची जेवायची वेळ येते तेव्हा साडे चार वगैरे वाजलेले असतात. नवरा व धाकटे दीर सोडून इतर सर्व पुरुषांसमोर आवाज हळू ठेवण्याची संस्कृती आहे. हा एवढा समारंभ उरकून सगळे निघून गेले की मग सोनल पुन्हा आपल्या साम्राज्याची राणी होते. लग्नानंतर काही काळ ही अशी संस्कृती पचवण्यातच खर्ची पडली. नंतर तिला त्याचे काही वाटेनासे झाले. बहुतेकदा रात्री कोणत्यातरी व्यावसायिक मीटिंग किंवा समारंभासाठी पतीबरोबर शोभा म्हणून जावे लागते. तेथे अती उच्चभ्रू वर्तुळातील स्त्रियांशी गप्पा मारत बसणे इतकेच काम असते. सोनलची स्वतःची ओळख काहीही असली तरी अजूनही ती 'ह्यांची पत्नी' म्हणूनच अधिक ओळखली जाते. बाहेरही आणि घरातही!
नेहा - पुण्यातील प्रतिष्ठित आय टी कंपनीत काम करणारी तरुणी! गेल्या वीस वर्षांत कामानिमित्त जगातील प्रगत असे किमान दहा देश पाहून झालेले आहेत. अमेरिका, कॅनडा व जपान येथे वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे दीर्घकाळ वास्तव्य! आता गेली काही वर्षे भारतातच! अधूनमधून फ्रान्सला जावे लागते पंधरा एक दिवसांसाठी तेवढेच! नवरा अतिशय हुषार पण काही मानसिक व्याधीमुळे गेली कित्येक वर्षे कामच करत नाही. घरात बसून असतो. मात्र तो प्रेमळ आहे. त्या व्याधीसाठी घ्यावी लागणारी जी औषधे आहेत त्यांचा साईड इफेक्ट असा होतो की त्याची कार्यशक्ती कमी होते. त्यामुळे तो बसून असतो. त्याच्या रिअॅक्शन्सही मंद असतात. सासू नाही. सासरे प्रत्येक लहानसहान गोष्टीत नाक खुपसणारे! प्रत्येक गोष्टीत उपदेश करणारे! इर्रिटेट करणारे! नेहा पहाटे साडेपाचला उठते. सव्वासहा वाजता घरातील सगळ्यांचा स्वयंपाक व स्वतःचा डबा तयार करून ठेवते. पावणे सातला कार घेऊन बावीस किलोमीटरवर असलेल्या कंपनीत पोचते. तेथून सगळ्यांना सुप्रभात अशी बल्क मेल पाठवून कामाला जुंपते ती रात्री आठ वाजता घरी येते. आल्यावर पुन्हा स्वयंपाक करते. सासरा व नवरा ह्या दोघांना वाढते. सासरे हाताने पाणी किंवा मीठही घेत नाहीत. नेहा तिथेच उभी असते. एखाद्या पदार्थात मीठ कमी वगैरे झाले असेल तर सासरे तेवढे नक्की सांगतात. चुका अनेकदा काढतात. तुला सासू नाही हे नशीब समज असे चेष्टेत म्हणून हसतात. नेहा केव्हाही बघावे तेव्हा हसरा चेहरा करून वावरत असते. तब्येत नाजूक आहे.
माधवी - आज वय पासष्ट! लग्न झाल्यावर कळाले की नवरा जुगार खेळतो व खूप दारू पितो. माधवी सासरी मन रमवू शकत होती. तितपत सालस व सोशिक वगैरे होती. पण भडकली की भडकली. घरात सगळ्या नणंदा माहेरवाशीण म्हणून आलेल्या असताना उशीरापर्यंत जर नवरा परतला नाही तर डोळ्यातून पाणी न काढता घराच्या दारात अबोलपणे उभी राहायची. कोणी विचारले का उभी आहेस म्हणून तर काहीही सांगायची नाही. सगळ्याजणी आतल्या खोलीत प्रचंड गप्पा आणि हास्यविनोद करत असताना ती तिथून जात असली तर तात्पुरता हसरा चेहरा करून जायची. पण जसजसा घड्याळाचा काटा नऊकडे सरकायचा तसतशी अस्वस्थ व्हायची आणि एकच वाक्य बोलून चपला घालून घराबाहेर पडायची. 'मी आलेच हं' इतकेच सांगून जायची. कोणालाही माहीत नसायचे की ही आत्ता कुठे गेली असावी. एक तासाने दोघे बरोबर परत यायचे आणि माधवीचा नवरा खालमानेने जेवायला बसायचा. जेवून वरच्या खोलीत झोपायला निघून गेला की माधवीला नणंदा म्हणायच्या की आजही पिऊन आलाय का! त्यावर माधवी हसून 'ते नेहमीचंच आहे' म्हणायची आणि स्वतःचे पान वाढायची. नणंदा मग प्रेमाने तिला वाढायच्या आणि कोणीतरी थोपटायचेही. पण माधवी डोळ्यातून पाणी काढायची नाही. एकदा भडका उडाला. असेच सगळे जमलेले असताना रात्री सगळ्यांनी मिळून काहीतरी करायचे ठरत होते. अचानक माधवीचा नवरा उठला आणि कुठेतरी निघाला. माधवीने त्याचा पटकन् हात धरला आणि तिचे डोळे प्रथमच पाणावले. ती त्याला म्हणाली की आज नका ना जाऊ, आज सगळे घरात आहेत. त्यावर तो म्हणाला 'आलोच थोड्या वेळात'! आणि मग भडका उडाला. माधवीने खसकन् त्याचा हात खेचून त्याला खुर्चीत बसता केला आणि म्हणाली. 'हरामखोर, मला कशाला लग्न करून आणलीयस इथे? रोज रात्री तुला त्या भिकारचोटांच्या गर्दीतून पत्ते खेळताना उठवून घरी आणायला? त्यांच्यातल्या कोणी माझ्यावर हात टाकला तरी तू पीत बसशील. आज तू जाऊनच दाखव, नाही चामडी सोलली तुझी तर बघ'! माधवीचा हा रुद्रावतार नणंदा, भाचरे, सासू आणि सासरे ह्या सगळ्यांनाच थक्क करणारा होता. ही अशी बोलू शकते हेच मुळी इतके वर्षांनी समजत होते. ती रात्री कुठे जाते ह्याचेही सगळ्यांना आकलन झाले. तेव्हापासून तिचे घरातील स्थान वधारले. पण नुकतेच समजले की आता दोघेही म्हातारी झालेली असून आताही माधवीचा नवरा रोज पितो आणि कधीकधी तिला मारतोही! काय मिळाले माधवीला ह्या संसारातून? तर एक मुलगी आणि जावई! जोडीला अशांत मन!
अपूर्वा - अपूर्वाला पुरुषांना खेळवायला आवडते. अनेक नजरा स्वतःवर झुलवत ठेवून ती वावरत असते. शॉपिंग ही तिची पॅशन आहे. नवीन भेटवस्तू मिळणे हा अत्यानंद आहे तिच्यासाठी! मग ती भेटवस्तू देणार्याने थोडी लगट केली तरी चालते. नवर्याला बोटाच्या इशार्यावर नाचवते आणि तो नाचतोही! दोघेही कमावतात पण नवरा अपूर्वाला कोणत्याच प्रकारे मार्गावर आणण्यास असमर्थ आहे. एकदा अपूर्वाने परगावी असलेल्या सासूला फोन करून झापले. तुम्ही तुमच्या मुलाला ज्या सवयी लावलेल्या आहेत त्यामुळे तो मी केलेल्या भाज्या खात नाही. त्याला जरा अक्कल शिकवा इथे येऊन! चारचौघांमध्ये नवर्याची थट्टा करण्यात तिला विशेष काही वाटत नाही. खरे तर संसार किंवा सहजीवन ह्या संकल्पनाच तिला मान्य नसाव्यात असे वाटते. एखाद्या कारणामुळे चिडली की चेहरा भयंकर हिंस्त्र होतो. एरवी आकर्षक दिसणारी अपूर्वा अचानक राक्षसिणीसारखी भासू लागते. अर्धा अर्धा तास घशाच्या शिरा ताणून आरडाओरडा करू शकते. आजूबाजूच्यांना सवय झालेली आहे. अपूर्वाला एक मुलगा आहे ज्याला आईबद्दल विशेष माया वाटत नाही. तेही साहजिकच आहे. प्रेझेंटेबल असण्याबाबत ती इतकी भयंकर दक्ष असते की एखादी नटीही अशी नसावी. म्हातारपणी अपूर्वाचे आयुष्य कसे असेल ह्याचा अंदाज लावता येत नाही.
नेत्रा - नेत्राचे कुटुंबातील स्थान बघितले तर धक्का बसेल. राजेशाही राहणी! अफाट श्रीमंती! पुण्यात चार मोठी साड्यांची आणि रेडिमेड्सची दुकाने! लक्ष्मी नुसती वाहत असते. पण नेत्रा शोभेची बाहुली आहे. घरात नोकरचाकर आहेत. पण वेळेवर नाश्ता मिळाला नाही तर नवरा आणि मुलगा किंवा मुलगीही सर्वांदेखत पाणउतारा करतात. अबोल नेत्रा घाईघाईने कामे उरकू लागते. आता नोकरही तिच्या म्हणण्याला देत असलेली किंमत जरा कमी झाली आहे. सिंध हाऊसिंग सोसायटीसारख्या पुण्यातील अतीप्रतिष्ठित कॉलनीतील प्रासादतुल्य बंगल्यात राहणारी नेत्रा घराबाहेर पडते ती फार तर देवाला जाण्यासाठी! अगदीच सोसायटीतील बायकांचा काही समारंभ असला तर तिला सहभागी होता येते. अन्यथा तिला सोशल लाईफ विशेष नाही.
वरील उदाहरणे पूर्णपणे सत्य आहेत मात्र नांवे बदललेली आहेत. प्रत्येक कुटुंबातील पत्नीचे स्थान व्यक्तीपरत्त्वे बदलत असते. त्यापैकीच ही काही खास उदाहरणे!
==========
-'बेफिकीर'!
लेख आवडला.
लेख आवडला.
<<५. कोउटुम्बिक जबाबदार्या
<<५. कोउटुम्बिक जबाबदार्या वाहायला लागणारी मानसिकता कित्येक पुरुषान्मधे नसते . (यात २ "catagories" असतात,,१ घाबरट आणी २ फुलपाखरू व्रुत्तीचे )त्यानी लग्न करण्याच्या भानगडीत न पड लेले बरे!>>
------ छे असे झाले तर स्त्रियान्च्या पाठिशी कोण उभे रहाणार ? ९० % स्त्रियान्ना अपयश येणार.
पशुपत - तुमच्या पोस्टमधल्या मुद्द्यान्शी असहमत.
अनेक उदाहरणे देता येतिल. केवळ दोन वेग-वगळी उदाहरणे देतो. उच्च शिक्षण (मास्टर्स) घेतलेल्या दोन मुली, शिक्षण सम्पल्यावरच चान्गली नोकरी लागली. काही वर्षान्नी व्यवस्थित लग्न झाली. लग्नानन्तर मुलाच्या घरची मन्डळी "आमची साम्पत्तीक स्थिती चान्गली आहे, मुलाच्या पगारात घर व्यावस्थित चालेल, मुलीला नोकरीची अवशक्ता नाही" असे म्हणुन नोकरी सोडण्यासाठी पिच्छा...
एकीने नोकरी सोडली... सान्सारिक जबाबदारीत आज पुर्ण व्यस्त आणि जबरदस्तीने लादलेले आर्थिक परावलम्बित्व...
दुसर्या उदाहरणात नोकरी न सोडण्याच्या मुलीच्या निर्णयावर मुलगी अजुनही ठाम आहे... पण त्रास आहेच.
पोटात असताना पासुनच स्त्री जातीचा जगण्यासाठीचा लढा सुरु असतो. शिक्षण घेण्यासाठी लढा, समान आर्थिक हक्कान्साठी लढा, शिक्षण घेण्यासाठी दर-रोज शाळेत/ कॉलेजात जाताना तसेच दैनन्दिन व्यावहारात बस-लोकल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी पब्लिकच्या धक्क्यान्पासुन स्वतःला दुर ठेवतानाचा लढा (कसरतच आहे), एव्हढे करुन जिवघेण्या स्पर्धेत नोकरी मिळवली आणि बर्यापैकी घरात लग्न झाले तर या स्वकर्तुत्वावर मिळवलेली नोकरी टिकवण्यासाठी लढा... , असो. अजुन आपल्याला बरिच मोठी मजल मारायची आहे.
"भित्र्या" स्त्रियान्पैकी
"भित्र्या" स्त्रियान्पैकी ९०% अस अर्थ अपेक्शित आहे. किन्वा खूप काही करू शकतील परन्तू प्रत्यक्शात साशन्कतेने मागे राहिलेल्या महिलान्बद्दल मला म्हणा यचे आहे.
आणखी एक. हे म्हणणारा नवराच असलापाहिजे असे मला अजिबात म्हणायचे नाही. हे म्हणणारे गुरु(पुरूष आणी स्त्री), मित्र -मैत्रीणी , आई- वडील - कुणीही असू शकतात .
ज्या महिला भित्र्या नसतात त्या स्वतः यशस्वी होतातच आणी त्या त्यान्च्या सम्पर्कातल्या इतर महिलाना प्रोत्साहित करतात.
"प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते" ही विचारसरणी कधीच मागे पडली आहे.
<<एकीने नोकरी सोडली...
<<एकीने नोकरी सोडली... सान्सारिक जबाबदारीत आज पुर्ण व्यस्त आणि जबरदस्तीने लादलेले आर्थिक परावलम्बित्व...>>: दिल धदकने दो मधली समस्या ....
<<दुसर्या उदाहरणात नोकरी न सोडण्याच्या मुलीच्या निर्णयावर मुलगी अजुनही ठाम आहे... पण त्रास आहेच>>
दोन्ही समस्या च आहेत पण त्याचे निराकरण सोपे आहे.
लग्न करण्या आधी या गोष्टी स्पष्टपणे बोलणे अत्यावष्यक आहे !
मागे एक "matromonial" ची सुन्दर जाहिरात TV वर होती. ज्यात बायको नोकरीवरून येउन तयार होत असते आणी नवरा सर्वाना जेवायला वाढत असतो (सहजतेने आणी आनन्दाने) , तो सान्गतो कि तिने लग्नापूर्वीच मला सान्गितले होते कि ती लग्नानन्तर ही नोकरी चालू ठेवू इच्छिते.....
हे वातावरण घराघरात दिसायला हवे.
लेख आवडला. या विषयावर खूप
लेख आवडला.
या विषयावर खूप काही लिहण्यासारखे आहे. आजूबाजूला खूप उदाहरणे आहेत .
Pages