कप्पा

Submitted by _हर्षा_ on 4 March, 2016 - 01:01

आतल्या आत प्रत्येकाच्या मनात
असतोच एक कप्पा,
चिरकाल बंद उघडतो एखाद्याच कातरवेळी
विमनस्क मन, भांबावले श्वास,
फुललेले उच्छवास सगळं काही झेलत
बंद कप्प्याच दार किलकिलं होतं
आणि पसरतो दूरवर एक गहिरा अंतर्नाद.....

भावनांचे कल्लोळ ऐकू येतात आपल्यालाच
उष्ण होत जाणारे श्वासांचे गहिवर
जाणवतात स्वतःला
आतून बरसणारा तो मनाच्या निश्चलतेवर
थांबलेला असतो वाट बघत त्या क्षणाची
जरा प्रेमाची उब लागताच,
आतच झिरपणारा तो... तितक्याच आवेगानं
उधळण करतो थेंबांची आणि
पुन्हा कप्पा स्वच्छ धुवुन तयार होतो मिटायला....
काही काळासाठी!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users