प्रवास

Submitted by जयदीप. on 1 March, 2016 - 09:00

सुरू स्वतःकडे प्रवास कर
निघायला हवे, प्रयास कर

मिळेल चोर आतला तुला
अजून एकदा तपास कर

बदल घडेल काय चांगला
दिलास का कधी 'विकास' कर

किती असेल भूक राहिली
कळायला हवे, उपास कर

कुठे अजून जिंकलेस जग
जरा कमीच तू मिजास कर

जयदीप
(मार्च १,२०१६)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
तपास,उपास मस्तच!

'विकास'कर>>>tax अपेक्षित! तीन वेळा शेर वाचल्यानंतर लक्षात आले!