डाब चिंगरी (नारळात शिजवलेली कोळंबी)

Submitted by मृणाल साळवी on 29 February, 2016 - 15:46
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

आज आपण दाब चिंगरी बघणार आहोत. ही एक बंगाली पाकृ आहे. 'दाब'म्हणजे नारळ आणि 'चिंगरी'म्हणजे कोळंबी. नारळात शिजवलेली कोळंबी.

साहित्यः

शहाळे - २
कोळंबी - ५०० ग्रॅम
कांदा - २ लांब चिरुन
काजु - ७ - ८
खसखस - २ चमचे
मोहरी - २ चमचे
हिरवी मिरची - ३
लसुण - ३-४ पाकळ्या
आल्याचा छोटा तुकडा
मोहरीचे तेल - २ चमचे
पंचफोराण - २ चमचे (मेथी, जीरे, कलौंजी, मोहरी,बडिशेप यांचे मिश्रण)
कणिक - १ वाटी
मिठ चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

कृती:

१. दोन्ही शहाळ्यांमधील पाणी ग्लासात काढुन घ्यावे व दोन्ही शहाळ्यांची मलई काढुन घ्यावी. शहाळे कापुन घेताना नारळवाल्याकडुन त्याचे वरचे झाकण सुद्धा मागुन घ्यावे.

p1

२. एका पॅनमधे तेल गरम करुन त्यात चिरलेले आले, लसुण व कांदा टाकुन ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
३. कांदा परतल्यावर त्यात काजु, भिजवलेली मोहरी व खसखस टाकुन परतावे.

p2

४. ह्या मिश्रणात थोडी मलई टाकुन मिक्सरवर मऊसर वाटुन घ्यावे. वाटताना पाण्याची गरज वाटल्यास शहाळ्याचे पाणी वापरावे.

p3

५. एका बाऊलमधे कोळंबीला थोडी हळद व हिंग चोळुन घ्यावे.
६. पॅनमधे मोहरीचे तेल गरम करावे व कोळंबी टाकुन २ मिनिटे परतुन लगेच बाऊल मधे काढुन घ्यावी.

p4

७. ह्या बाऊलमधे वाटलेले मिश्रण, उरलेली मलई, हिरवी मिरची, मिठ व एक चमचा मोहरीचे तेल टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

p5p6

८. हे तयार झालेले मिश्रण दोन्ही नारळामधे भरुन त्याला वरुन झाकण लावावे.

p7

९. ह्यामधुन वाफ बाहेर पडु नये म्हणुन कणकेने सील करावे. त्यास वरती पंचफोरण लावावे.

p8p9

१०. ओव्हन २०० degree Celsius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
११. ह्या ओव्हनमधे दोन्ही नारळ ठेवुन ३० मिनिटे शिजवुन घ्यावेत.

p10

१२. जेवायला बसतानाच नारळ उघडुन दाब चिंगरी गरम भात किंवा तांदुळाच्या भाकरी सोबत serve करावे.

p11p12p13

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा खुप आवडली.
खरे तर आधी नावावरून कळलेच नाही ही मांसाहारी पाककृती असेल.

कोलंबी ऐवजी चिकनही ठेवता येईल.

मी करून पाहिली आज ...घरच्यांना खूप आवडली ..फक्त नारळात न शिजवता पॅन मधेच शिजवली ..रेसिपी बद्दल धन्यवाद ☺

वॉव!! कोळंबी खाणार्‍या मेंबरांना रेसेपी देते. आणि या प्रकारे चिकन करुन बघते स्वतःसाठी.

Thanks to all. Happy

विनार्च, सगळ्यांना चव आव्डली वाचुन मस्त वाटले.

अल्पना, हो चिकन सुद्धा छान लागेल, फक्त त्याला शिजायला जरा वेळ लागेल. त्यामुले त्या प्रमाणे वेळ adjust करायला लागेल.

मस्तच! एकदम delicacy समजतात या डिश ला इथे पण घरी करायच्या फंदात फार जण पडत नाहीत. तुमची चिकाटी थोर आहे Happy
एक बदल करणार का? ते 'डाब' चिंगरी असं नाव आहे, दाब नव्हे

वॉव काय झबर्रदस्त पाकृ आहे.. कोळंबी म्हणजे चवीचा प्रश्नच नसणार.. त्या दिवशीच वाचलेले पण फोटो लोड होत नव्हते. आता पाहिले तृप्त झालो Happy

Pages