लिओनार्डो डीकॅप्रिओ....जर्मन आई आणि इटालियन वडील...दोघेही अमेरिकन नागरीक, यांचा मुलगा. जगभर अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून, अतिशय देखणा आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत छोट्या पडद्यावर चमकत राहिला. याचा अनुभव आणि फायदा त्याला पूर्णवेळ चित्रपट उद्योगात प्रवेश मिळवून देण्यास झाला. वयाच्या १८ व्या वर्षीच त्याने रॉबर्ट डी नीरो समवेत १९९३ मध्ये आलेल्या 'धिस बॉयज् लाईफ" मध्ये एका युवकाची भूमिका वठविली आणि त्यापुढील इटिंग ग्रेप व बास्केटबॉल डायरीजमधून सहजसुंदर अभिनयामुळे आणि विलक्षण देखणेपणामुळे सर्वसामान्य प्रेक्षक लोक तसेच निर्माते दिग्दर्शकांच्या नजरेत भरू लागला. त्यातील एक बडे नाव होते...जेम्स कॅमेरून. या धडाडीच्या आणि कल्पक दिग्दर्शकाने त्याला हॉलिवूड सृष्टीतील सर्वाधिक गल्ला मिळविलेल्या "टायटॅनिक" चित्रपटातील जॅक डॉसन या प्रमुख भूमिकेसाठी निवडले आणि या चित्रपटाने सर्व जगात जे काही अभूतपूर्व यश मिळविले त्या लोकप्रियतेचा फायदा दोन्ही कलाकारांना....लिओनार्डो डी कॅप्रिओ आणि नायिका केट विन्स्लेट याना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप असा मिळाला. त्याचा फायदा दोघांनीही घेतला. "मॅन इन द आयर्न मास्क.... कॅच मी इफ यू कॅन...गॅन्ग्ज ऑफ न्यू यॉर्क...." आदी चित्रपटातील लिओनार्डोच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी त्याला आघाडीचा अभिनेता तर बनविलेच शिवाय मार्टिन स्कोरसेसे, स्टीव्हन स्पिएलबर्ग आदी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांच्या गळ्यातील तो ताईतच बनला. "ब्लड डायमंड" सारख्या राजकीय पार्श्वभूमी आणि काळेगोरे भेदावर असलेला चित्रपट असो, संघटीत आणि मेट्रो शहरातील गुन्हेगारीवर आधारीत "डीपार्टेड" सारखा दिग्गजांच्या भूमिका असलेलाच चित्रपट असो किंवा गल्फ देशातील हेरगिरीबाबतचा "बॉडी ऑफ लाईज" असो....सार्या चित्रपटांचा नायक असलेला लिओनार्डो दिग्दर्शकांचाही लाडका बनत चालला. प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत गेल्यामुळे स्टुडिओ सिस्टिमदेखील या नावावर फिदा झाली असल्यास त्यात नवल नाही. प्रचंड बजेटसचे प्लॅन्स बनत गेले आणि त्यांचा केन्द्रबिंदू ठरला हा प्रत्येक भूमिकेतील राजा...लिओनार्डो डीकॅप्रियो...२०१० चा इन्सेप्शन घ्या किंवा हॉवर्ड ह्यूजेसची कहाणी असलेला एव्हिएटर घ्या...तसेच जे.एडगर...प्रत्येक भूमिका स्वीकारण्यापूवी त्या पात्राचा इतिहास तपासून त्यानुसार केवळ अभिनयच नव्हे तर आपले लूक्स आणि देहयष्टीही तशीच असण्यामागे त्याने घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगेच आहेत.
अशा गुणी अभिनेत्याला हॉलीवूड चित्रपटसृष्टीतील मानाचे पान ठरलेले "ऑस्कर" पारितोषिक मिळावे ही त्याच्या जगभरातील चाहत्यांची इच्छा होती....आणि तशी असण्याचे कारण त्याने साकार केलेल्या लक्षणीय भूमिका. ऑस्करसाठी त्याला सर्वप्रथम मानांकन मिळाले ते १९९३ साली सर्वोत्कृष्ट सहा.नायकाचे "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप" मधील अर्नीच्या भूमिकेसाठी...नंतर पुढील काळात तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे मानांकन मिळाली....२००५ एव्हिएटर, २००७ ब्लड डायमंड आणि २०१४ वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट....या सर्व वेळी ऑस्करने त्याला हुलकावणी दिली. या व्यतिरिक्त आम्हा लिओ प्रेमी रसिकांना डीपार्टेड आणि रीव्होल्युशनरी रोड तसेच इन्सेप्शन साठीही त्याला मानांकन मिळायला हवे होते असे वाटत राहिले.
पण अखेर २०१५ साल उजाडले आणि त्याला मिळाली एक जबरदस्त भूमिका...."द रेव्हेनंट" या चित्रपटातील नायकाची. चित्रपटात त्याचे दर्शन म्हणजे बर्फाळ प्रदेशातील....सन १८२३ सालातील घडामोडी....त्याने साकारलेली एका सैन्य तुकडीच्या मार्गदर्शकाची भूमिका...तो ही कशी जगला आणि कशारितीने ती पूर्ण क्षमतेनिशी दर्शविली आहे ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहाणे गरजेचे आहे. या चित्रपटातील याच भूमिकेसाठी त्याला जगभरातून अनेक पारितोषिके मिळाली आहेत...पण त्याची आणि त्याच्या चाहत्यांची भूक होती ती ऑस्करची. ते त्याला मिळायला हवेच हवे अशी हवाच तयार झाली.
आज अखेरीस अॅकॅडेमीने ते स्वप्न पूर्ण केले आणि यंदाच्या "ऑस्कर" बहुमानासाठी लिओनार्डो डी कॅप्रिओ याची "रेव्हेनंट" मधील ह्यू ग्लास या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्याचे जाहीर झाले आहे.
अभिनंदन !!
मिळाला का फायनली...वॉव..
मिळाला का फायनली...वॉव.. मस्त
तुमचा लेख ही छान
आनंद तर अफाट झाला आहे पण
आनंद तर अफाट झाला आहे पण रेवेननट लिओचा बेस्ट अभिनय नव्हता अस प्रामाणिक पणे वाटत . त्यापेक्षा टोम हार्डी ने खाल्लाय तो पिक्चर . पण जाऊ दे . लिओ ऑस्कर विजेत्या यादीत आला हेच महत्वाचं
सुंदर लेख.
सुंदर लेख.
अशोक , फक्त टायटॅनिक पाहून या
अशोक , फक्त टायटॅनिक पाहून या विषयावर मी अधिकाराने बोलावं असं काहीच नाही, त्यातला लिओनार्डोचा अभिनय अर्थातच आवडला होता, पण ती सर्व फिल्मच महामिती असलेली ,त्यात प्रत्येकाला आपली आपली जागा होती .तुमचा लेख मस्तच आहे , तुमच्या आवडीच्या अभ्यासाच्या विषयावर आणि माझ्यासारखीच्या अल्पज्ञानात तातडीने भर घालणारा .
बावरा मन.... ~ तुम्ही टॉम
बावरा मन....
~ तुम्ही टॉम हार्डीचा केलेला उल्लेख मला खूप आवडला. त्यालाही सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या ऑस्करसाठी नामांकन मिळाले होतेच. पण ते मिळाले "ब्रिजेस ऑफ स्पाईज" साठी मार्क रिलॅन्स याना...त्यानीही परिणामकारक ती भूमिका वठविली आहे.....
आपल्या भाषणात खुद्द लिओनार्डो ने टॉम हार्डिबद्दल असे उद्गार काढले आहेत : "...First off, to my brother in this endeavor, Mr. Tom Hardy. Tom, your talent on screen can only be surpassed by your friendship off screen… thank you for creating a transcendent cinematic experience...." ~ ही टॉमच्या अभिनय क्षमतेची पावतीच होय.
तुम्ही लिहिले आहे..."..लिओचा बेस्ट अभिनय नव्हता अस प्रामाणिक पणे वाटत..." ~ हरकत नाही, तुमचे मत आहे, त्याबद्दल आदर व्यक्त केलाच पाहिजे.
भारती.... ~ मला खूप आनंद
भारती....
~ मला खूप आनंद होईल, जर तू हा चित्रपट आवर्जून पाहिलास तर... जरूर पाहा. मला वाटते शुक्रवारी मुंबईत रिलीज झाला आहे. फार प्रभावीरित्या लिओनार्डोने गाईड ग्लासची भूमिका साकार केली आहे.
शटर आयलंड , ब्लड डायमंड ,
शटर आयलंड , ब्लड डायमंड , इंस्पेशन या चित्रपटात त्याने इथल्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे अस वाटत . तुलना ही त्यानेच सेट केलेल्या high standard च्या निकषावर केली . पण हा प्रश्न शेवटी वैयक्तिक perception चा आहे .
"...हा प्रश्न शेवटी वैयक्तिक
"...हा प्रश्न शेवटी वैयक्तिक perception चा आहे...."
~ हे तर मी मनोरंजनच नव्हे तर अन्य सर्व घटकांवर होत असलेल्या मताबाबत मानतोच....त्याबद्दल बिलकुल वाद नाही.
Finally ! N he well deserved
Finally ! N he well deserved it. खुप वेळा हुकलं होतं. प्रचंड आनंद झाला आहे. कालच HD Channel - M+ वर Wolf of Wall Street लागाला होता. मला खुप आवडतो हा मुवी. अनेको वेळा टीवी वर आला कि पाहिला आहे. काल पहाताना मात्र विशेषच आनंद झाला होता.
बावरा मन्न अनुमोदन्न. टॉम ला
बावरा मन्न अनुमोदन्न. टॉम ला मिळते कि काय अशी भीति वाटत होती. रेवनंट च्या रिवूत पण तसेच लिहून आले होते. बाकी ते फर वगैरे अपने बसकी बात नहीं आपल्याला इन्सेप्शन ठीक आहे तभीच मिलना था.
अमा.... टॉमला मिळाले असते तरी
अमा....
टॉमला मिळाले असते तरी त्याचे मानांकन "सहाय्यक अभिनेता" गटासाठी होते. त्याला ऑस्कर मिळणे वा ना मिळणे या बाबीचा लिओनार्डो डी कॅप्रिओच्या कामगिरीवर कसलाच परिणाम करणारे नव्हते.
मामा छान लेख... तुमच्या मागे
मामा छान लेख...
तुमच्या मागे आपण बोललेल्या लेखमाले ची प्रतिक्षा करतो आहे बर का मी
थॅन्क्स प्रसन्न.....त्या
थॅन्क्स प्रसन्न.....त्या लेखमालेबद्दल आपल्यात झालेले बोलणे पक्के स्मरणात आहे माझ्या. पण गेली काही महिने दवाखाना मागे लागला आहे चांगलाच....त्यामुळे अन्य कामेही मागे पडली आहेत. हा लेखही अगदी उत्स्फ़ुर्तपणे लिहून झाला....त्याला ऑस्कर मिळाल्या मिळाल्या मला वाटले की या आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल दोन शब्द जर आज नाही लिहिले तर उद्या विसरून देखील जाईन मी....त्यामुळे लेख झटदिशी उतरला....त्रुटी राहिल्या आहेत काही, पण असो...तितके मी अपेक्षित धरले होतेच....."शटर आयलंड" चा उल्लेख राहून गेला त्याचे मात्र मनस्वी वाईट वाटले....फ़ार सुंदर चित्रपट लिओचा.
छान लेख.. रेव्हेनंट मधली
छान लेख.. रेव्हेनंट मधली भुमिका अवघड होती, अवार्डवर त्याचा हक्कच होता. मी फक्त झलक बघितलीय, पूर्ण चित्रपट बघू शकेन कि नाही, याची खात्री नाही.
अशोक, तूम्ही या चित्रपटाबद्दल सविस्तर लिहाच.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=dyp_DVgT260 भारी भाषण आहे!
मामा , ग्रेट गॅट्स्बी अन शटर आय्लंड विसरलात? >>>> माझ्याही मनात तेच आलं. शटर आयलंडचा उल्लेख कसा नाही ?
छान, समयोचित व औचित्यपूर्ण
छान, समयोचित व औचित्यपूर्ण लेख .
'टायटॅनिक' नंत़र 'कॅच मी इफ यू कॅन' व 'ब्लड डायमंड'मधे अभिनयाचे पैलू उलगडत गेले. 'रेव्हेनंट' पाहिला नाही पण आतां पहाणं आलं. कांहीं अॅक्शन चित्रपटातील त्याच्या भूमिका मात्र त्याच्या कुवतीच्या अभिनेत्याचा दुरुपयोग केल्याची जाणीव देवून गेल्या.
उशीरा कां होईना, पण त्याला औस्कर मिळणं अपरिहार्य होतं. अभिनंदन !
दिनेश....धन्यवाद. पण
दिनेश....धन्यवाद. पण ऑस्करमुळे हा चित्रपट आता सर्वत्र गाजत राहणार शिवाय या शुक्रवारीच भारतात तो प्रदर्शीत झाला असल्याने प्रेक्षकांना कथानक सांगून त्यांचा रसभंग केल्यासारखे होईल.
पराग.... होय, "शटर आयलंड" सारख्या महत्त्वाच्या चित्रपटाचा उल्लेख माझ्याकडून गडबडीत राहून गेला, ती चूक मी प्रतिसादात कबूल केलेली आहेच.
भाऊ नमसकर....जरूर पाहा तुम्ही "रेव्हेनंट...". मी मुद्दामच कथानक सांगत नाही. ह्यू ग्लास (कथेचा नायक) आणि मैलोगणती पसरलेले बर्फ़ाचे साम्राज्य आणि विलक्षण अशी शांतता.....अथक प्रवास. दोन सव्वा दोन तास असे काही अंगी भरून जातात की चित्रपट संपल्याचे ध्यानातही येत नाही. लिओ ला तर एक पानभरसुद्धा संवाद नाहीत.
अशोक., व्हू इज इटिंग गिल्बर्ट
अशोक.,
व्हू इज इटिंग गिल्बर्ट ग्रेप मध्ये जॉनी डेपने गिल्बर्ट ग्रेपची भुमिका केली आहे. लिओनार्दोने त्याच्या धाकट्या भावाची आर्नीची भुमिका केली आहे. वरच्या लेखात ती दुरुस्ती करू शकता.
भाषण मस्त केले लिओनार्दोने. एवड्या मोठ्या व्यासपीठाचा उत्तम उपयोग. जो पेसीच्या ऑस्कर भाषणानंतरचे हे माझे सर्वात आवडते!
टण्या.... ~ यू आर राईट देअर.
टण्या....
~ यू आर राईट देअर. त्या चित्रपटाचे नाव आहे "व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप" आणि जॉनी डेप याने गिल्बर्टची तर लिओनार्डोने त्याच्या धाकट्या भावाची - अर्नी - भूमिका साकारली होती जी प्रभावी ठरली व त्यासाठीच त्याला ऑस्करचे पहिले मानांकन (सहा.अभिनेत्याचे) मिळाले होते. लेखात मी चित्रपटाचे पूर्ण नाव न दिल्याने "गिल्बर्ट" ची भूमिका लिओने साकारली असावी असा अर्थ त्यातून ध्वनीत होतो, हे मान्यच.
योग्य ते संपादन केले आहे. धन्यवाद.
मला हा गिल्बर्ट ग्रेप सिनेमा
मला हा गिल्बर्ट ग्रेप सिनेमा बरेचदा आठवतो कारण महिन्यातून एकदा तरी मी एल्डोरा मधून जातो. या सिनेमाची कथा एल्डोरा गावात घडते - पण सिनेमाचे चित्रीकरण इथे झाले नव्हते. तरी सिनेमात दाखवले आहे तसेच हे गाव आहे. या गावावरून गेलो तर मुद्दाम थांबून कॉफी ब्रेक घेतो.
वेल डिझर्व्ड ऑस्कर फॉर लिओ.
वेल डिझर्व्ड ऑस्कर फॉर लिओ. काय रेंज आहे या पठ्ठ्याची. रोमँटिक, साय-फाय, बायोपिक, वेस्टर्न, अॅक्शन्/थ्रिलर, ड्रामा, ब्लॅक कॉमेडी...
मामा फार सुंदर लेख. लिओ आवडतो
मामा फार सुंदर लेख.
लिओ आवडतो मला. मी फार कमी चित्रपट बघितलेत त्याचे. त्याचं अभिनंदन. हा बघायला हवा मूवी.
अभिनेता आणि चित्रपट निर्माता
अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून अतिशय देखण्या आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे जगभर. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत चमकत राहिला छोट्या पडद्यावर. >>> हे थोड व्याकरणात सुधारता येइल का? चान्गल्या लेखाची सुरवात भाषातरित असल्यासारखि वाटतेय.
जगभर अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून, अतिशय देखणा आणि लोकप्रियतेचे प्रतीक बनून राहिला आहे. १९७४ मध्ये जन्मलेल्या या मुलाने बालपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती आणि अमेरिकन टीव्हीमधून जाहिरातीद्वारा तो सतत छोट्या पडद्यावर चमकत राहिला.
छान लेख ! लिओनार्दोला ऑस्कर
छान लेख ! लिओनार्दोला ऑस्कर मिळाल्याची बातमी ऐकून खूपचं आनंद झाला. त्याच्या सगळ्याचं भूमिका आवडतात विशेषतः ब्ल्ड डायमंड आणि इन्सेप्शन मधल्या. द रेव्हेनंट अद्याप पाहिला नाहिय..आता पाहायची उत्सुकता लागलीयं
मस्त लेख. मला तर आता लिओचा
मस्त लेख. मला तर आता लिओचा लेंडल होतो कि काय अशी भीती वाटायला लागली होती. पण लिओ लकी ठरला
मस्त, समयोचित लेख. टण्या +१.
मस्त, समयोचित लेख.
टण्या +१. भाषण लै भारी. मागच्या वर्षी Patricia Arquette ने, णि या वर्षी यांनी छान भाषणं दिली. अर्थपूर्ण.
थोपु वरुन साभार
थोपु वरुन साभार
जीव भांड्यात पडला खरा, आधी
जीव भांड्यात पडला खरा, आधी एकूण चारदा अभिनयासाठी नामांकन होऊनही ऑस्कर न मिळाल्याने त्याला आयुष्यात ऑस्कर मिळेल का नाही असे चर्वितचर्वण गेले अनेक दिवस सुरू झाले होते, त्याला आता आळा बसेल.
मागच्या खेपेस प्रमुख अभिनेत्याचे नामांकन मिळाले त्यावेळी इतर स्पर्धकांत काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण भूमिका असलेले अभिनेते होते (Jamie Foxx, Forest Whitaker वगैरे). यावेळीही Danish Girl मधली Eddie Redmayne ची भूमिका वेगळी होती (Trumbo आणि Martian अजून पाहिलेले नाहीत) पण सर्व नामांकनांत सशक्त भूमिका लिओचीच होती असे वाटते.
आता दरवाजे उघडले आहेत तर त्याला अजून एखादे ऑस्कर नक्की मिळेल/मिळावे. पुढच्या काही वर्षांत येणाऱ्या चार पाच चित्रपटांत भन्नाट वेगवेगळ्या भूमिका आहेत त्याच्या.
आणि हो, काल त्याला बघून मार्लन ब्रँडोची आठवण झाली. दिसतही तसाच होता आणि बोललाही तसेच (फक्त उच्चार थोडे अधिक स्पष्ट
)
उत्तम लेख! लिओ ने केलेले
उत्तम लेख!
लिओ ने केलेले भाषणही जबरदस्त होते. अशा संधीचा आणि व्यासपीठाचा पर्यावरण बदलाच्या प्रश्नासाठी प्रभावी वापर करुन घेतला. नेटीव्ह अमेरिकन्ससाठी ऑस्करचे व्यासपीठ वापरणार्या मार्लन ब्रँडोची आठवण झाली. आपल्या, विशेषतः 'बॉलीवूडी' कलाकारांना अशा सामाजिक विषयांवर बोलायचे सहसा वावडे आहे.
वा! लिओच्या कारकिर्दीचा उत्तम
वा! लिओच्या कारकिर्दीचा उत्तम आढावा.
या निमित्ताने तुम्ही लिहिते झालात हेही छान झाले
Pages