आपण यांना पाहिलंत का? - प्रतिसाद स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 27 February, 2016 - 22:48

कादंबरी वाचताना किती वेळा पात्रं डोळ्यासमोर येतात?
ट्रेकिंगला गेल्यावर एखादं ठिकाण पाहून, तिथे वाचत वाचत आधीच येऊन गेल्यासारखं वाटतं?

'जैत रे जैत'मधली चिंधी स्मिता पाटीलसारखीच दिसते का?
'माचीवरला बुधा' भेटला होता का कधी?

खोपोलीला लोकलमधून उतरून रानवाटा शोधताना अवचित पडघवली दिसली होती का?

गोनीदांना समर्पित 'मराठी भाषा दिना'निमित्त हेच चेहरे शोधायचेत अन् कादंबरीतली स्थळंदेखील, प्रकाशचित्रांच्या स्वरूपात!

नियम, अटी, सूचना!

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. हा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली असो) प्रकाशचित्रं सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रं, ती प्रताधिकारमुक्त असली तरी, देऊ नयेत.
३. तुमच्या नजरेस भरपूर स्थळं अन् पात्र पडली असतीलच, त्यामुळे प्रत्येकी कितीही प्रकाशचित्रं पाठवू शकता. मात्र एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावं. प्रकाशचित्राबरोबरच पात्र / स्थळ आणि तुमचे प्रकाशचित्र यांतली साम्यस्थळं यांबद्दल दोन ओळी आवर्जून लिहा.
४. प्रकाशचित्र हे संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावं. प्रकाशचित्र कोलाज-स्वरूपातले नसावं.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा प्रकाशचित्रं देऊ शकतो, मात्र सलग दोन प्रकाशचित्रं देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रं मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चं पालन करणारी असावीत. मायबोलीवरील प्रकाशचित्रांचं धोरण येथे पाहा -
http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे चालेल का?

जुन्नर भटकंतीत एका हॉटेलात पाहिलेले हे चित्र.
चित्रातील चेहर्‍यावरचे हावभाव, पोशाख पाहुन नकळत "जैत रे जैत" मधल्या "चिंधीची" (कै. स्मिता पाटिल) व्यक्तिरेखा आठवली.
हॉटेल मालकाला चित्रकाराचे नाव विचारले, पण त्याला हि त्याबद्दल काहि माहिती नव्हती. चित्रकाराचे नाव कुठेहि त्या चित्रावर नव्हते.


(मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

वरील प्रचि नियमात बसणार नसेल तर संयोजकांनी ते काढुन टाकावे. Happy

जिप्सि , तुमच्या भटकन्तीत गोनिदांची अजूनही बरीच पात्र भेटली असतील. बरिच ठिकाण सापडली असतिल. ती ही येउद्या.

जिप्सी, चिंधी मस्त. माझ्या मनातली जैत रे जैत वाचल्यावरची चिंधी काहीशी अशीच होती. मी स्मिता पाटील यांची व्यक्तिरेखा पाहिली नसल्याने आज तिला चित्ररुप मिळाले. धन्यवाद जिप्सी Happy

१. 'पडघवली' मधला खळखळत वाहणारा पाट!
नितळ गोमटे पाणी..

pat.jpg

२. मृण्मयी मधल्या मनूची वाडी..

Rasta.jpg

पाचगणी च्या आठवडी बाजारात ही आजी भेटली होती.माझ्या हातात कॅमेरा पाहून हौसेने स्वतः चे फोटो काढून घेत होती.. पण मला आठवत नाहीये कि तिचं कोणत्या कॅरेक्टर शी साम्य वाटतंय..

मदत हवीये