ताप आला

Submitted by गिरीश on 26 February, 2016 - 11:19

आमच्या ७ वर्षाच्या मुलाला ताप आला . आम्ही नुकतेच मुंबई हून लॉस आनजेलिस ला आलो आहोत. मुलाचा डॉक्टर बघून ठेवला होता, पण अजून प्रत्यक्ष भेट झाली नव्हती .
ताप जवळ जवळ २ दिवस उतरत नव्हता,गोळी दिली कि तेवढ्य पुरता उतरायचा , काही तासांनी पुन्हा अंग गरम, म्हणून शेवटी डॉक्टर कडे घेवून गेलो. मुलाला तापामुळे थंडी वाजत होती, म्हणून त्याने एकावर एक दोन शर्ट आणि वर जाकेट आणि कानटोपी घातले होते.

डॉक्टर कडे गेल्यावर तिथली नर्स म्हणाली why are you so wrapped up ? how will the body heat spread out ? म्हणून तिने मुलाला जाकेत आणि कानटोपी काढायला लावले , डॉक्टरांचे पण तसेच मत दिसले.

आमचा जन्म मुंबईत गेला, आमच्या घरी ताप आला कि आम्ही एकावर एक दोन पांघरूण घेवून झोपून जायचो , घाम आला कि ताप गेलाच !!
मग इथली नर्स आणि डॉक्टर असे का म्हणतात ? तापामुळे थंडी वाजत असेल तर जाकेत किवा एकावर एक कपडे घालणे नैसर्गीक नाही काय ? मा .बो.तज्ञाचं मत जाणून घ्यायला आवडेल . मा .बो .ला कुठल्याही विषयाचे वावडे नसल्यामुळे सहज उत्सुकतेपोटी हा माझा पहिला धागा Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉ. चोथानी हे श्रीरामपूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ आहेत. ते ही असेच करायला सांगतात. कपडे काढून थंड पाण्याने सतत अंग पुसायला सांगतात.

अजुन एक, आपल्याकडे दही खाणे आजारी अस ताना योग्य मानत नाही,
तर अमेरीकेमधले डॉक्टर योगर्ट खायला सान्गतात लहान मुलाना...प्रो-बयोटीक्स साठी स्पे शली पो टाच्या
तक्रारी असतील तर

टायटलवरून मला आधी ही गझल वगैरे असेल असं वाटलं होतं. Happy
हो, खूप रॅप करून नका असे डॉक्टर बर्‍याचदा सांगतात इथे. थंड पाण्याने स्पंजिंग सांगतात, दर ३ तासांनी एकदा टायलेनॉल आणि एकदा आयबुप्रोफेन असे आल्टरनेट द्यायला सांगतात बहुधा. अर्थात बाकी ट्रीटमेन्ट कशाने ताप आलाय त्यावर अवलंबून असेल. म्या त्यातली तज्ज्ञ नाही .

अमेरीकेचे माहीत नाही पण भारतातल्या आमच्या आई आज्जींचा सल्ला असा आहे की ताप आला की थंड पाण्याने अंग पुसून घ्यायचे. बर्फाचे पाणी असेल तर आणखी उत्तम. जर ताप बराच झाला तर सरळ नळाखाली वा शॉवरखाली उभे राहत थंड पाण्याची धारच अंगावर घ्यायची.

बॉडी टेंपरेचर वाढले असेल तर ते असेच उतरवावे लागते. ताप डोक्यात गेला की खेळ खल्लास. लहान मूल असेल तर ते आणखी डेंजरस. त्यांच्याबाबत रिस्क घेऊच नये.

एक आठवण - एकदा मी थंडी तापाने सकाळीच सकाळी बिछान्यावर बेशुद्धीच्या अवस्थेत नुसता तडफडत फडफडत होतो. जसे पाण्यातून मासोळी बाहेर काढल्यावर थडथडत उडते अगदी तसाच. मला तर वाटलेले की माझे दिवस भरलेत आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. पण माझ्या आईने मात्र थंड डोक्याने माझ्या अंगावर बर्फाचे खडे आणि बर्फाच्याच थंड पाण्याने उपचार करत मला नॉर्मल केले. मग सावकाश चहापाणी उरकून डॉक्टरकडे गेलो. पुढचे औषधपाणी त्याने केले.

अवांतर - माझी ईंजिनीअरींगची परीक्षा चालू होती. दोन पेपरच्या मध्ये तीन दिवसाची सुट्टी आलेली त्यात हे सारे घडलेले. तरी दोन दिवसांनी मी सोबत ग्लूकोजची बाटली सोबत घेऊन का होईना परीक्षा देऊन आलो आणि चांगल्या मार्कांनी पासही झालो.

अवांतर क्रमांक 2 - पहिल्यावहिल्या धाग्याबद्दल अभिनंदन.! वेलकम टू अखिल निखिल मायबोली धागाकर्ता मंडळ Happy

पुढच्या सीझनच्या सुरुवातीला फ्लू शॉट बद्दल विचार करा. मी हल्ली घेतो आणि फायदेशीर वाटतात मला. आयबुप्रोफेन ++

As a rule, avoid using a heavy blanket or several blankets at the same time, since doing so may lead to overheating and an increase in discomfort. ~आंतरजालावरून साभार

हेच कारण आमच्या डॉक्टरनं पण सांगितलं होतं. आम्ही आपले बाब्या आजारी म्हणून त्याला एकावर एक कपडे घालून घेऊन गेलो डॉककडे. इन्फन्ट कारसीटचे बेल्ट्स लावता येत नाहीत ब्लँकेट असेल तर म्हणून जाड जॅकेट, फ्लीसचा पायजमा असा सगळा सरंजाम.

आपल्याकडे गार किंवा बर्फाच्या पाण्यानं अंग, तळपाय, तळहात आणि कपाळ पुसणे किंवा पट्ट्या ठेवणे बघितले आहे. पण इथल्या आणि एवढ्यातच भारतातल्या डॉक्टरांनी पण कोमट पाण्यानं पुसायचं किंवा आंघोळ चंलायची असं सांगितलं. गारेगार पाणी अजिबात नको म्हणे.

अमेरीकेचे माहीत नाही पण भारतातल्या आमच्या आई आज्जींचा सल्ला असा आहे की ताप आला की थंड पाण्याने अंग पुसून घ्यायचे. बर्फाचे पाणी असेल तर आणखी उत्तम. जर ताप बराच झाला तर सरळ नळाखाली वा शॉवरखाली उभे राहत थंड पाण्याची धारच अंगावर घ्यायची.

बॉडी टेंपरेचर वाढले असेल तर ते असेच उतरवावे लागते. ताप डोक्यात गेला की खेळ खल्लास. लहान मूल असेल तर ते आणखी डेंजरस. त्यांच्याबाबत रिस्क घेऊच नये. >>>> अगदी बरोबर मित्रा !

लेकाला ताप जास्त चढला की अगदी रात्री २ वाजताही (बर्फाच्या नाही पण थोडे गरम पाणी घालून )थंड पाण्याने आंघोळ घातली आहे. डोक्यात ताप चढेल ही भीती असते. आता लेकाला ईतकी सवय झाली आहे की कधी कधी ताप असला की तो स्व:ताच झोपायच्या अगोदर आंघोळ करायचा हट्ट करतो .
फ्रीजमधल्या थंड पाण्यात कोलन वॉटर घालून पूसून काढावं , हा दूसरा उपाय .
अर्थात हे साधे ताप असताना , थंडी वाजून ताप आला की हे प्रकार करत नाही.

कपाळावर गार पाण्याच्या घड्या, स्पंजिंग आपणही करतोच की. माझी मुलगी लहान असताना तिला असाच ताप अतीच चढायचा. तापात फीट पण आली होती, लहान मुलांना येते ५ च्या आत - अंडरवेट स्पेशली. convulsion म्हटले होते डॉ. बहुधा. तेव्हा डोक्यावर पाण्याची धार धरली आईने तेव्हा पोरीने डोळे फिरवलेले खाली आणले. Sad थोडक्यात मुलांचा ताप वाढू देऊ नका.

गिरीश - ताप येणं म्हणजे ही शरीरामध्ये काहीतरी झालं (व्हायरल/ इन्फेक्श्न) आणि त्यामुळे त्याचं तापमान वाढतं आणि नंतर पूर्ववत होतं आणि हि क्रिया परत चालू राहते. लहान मुलांचा मेंदू जास्त नाजूक असतो म्हणून तो ताप पूर्ववत होण्याचा अगोदर डोक्यात गेला नाही पाहिजे.

म्ह्णून लहान मुलांसाठी शक्यतो खाली काळजी घ्यावी. तापचे साधे आणि जास्त ताकदीचे औषध, डिजीतल थर्मामीटर, अर्लाम क्लॉक आणि नोंदवही

१. ताप साधा (१००) कि जास्त (१०२) येतो ते बघा म्हणजे १०० नंतर लगेच वाढत नसेल तर साधा आणि लगेच चढत असेल तर जास्त.
२. ताप कधी, किती आला आणि कधी, किती गेला, कोणते औषध दिंल त्याची नोदवहीत नोंद करा.
२. ताप साधा असेल तर तापचे साधे औषध द्या आणि १० ते २० मिनीटात ताप उतराला पाहिजे. सुरुवातीला ताप येण्याची वारवारता जास्त असते पण दोन औषधांच्या वेळामध्ये कमीत कमी ६ तासाचे अंतर पाहिजे. जास्तीत जास्त अंतर तुम्ही नोंदवहीतील नोंदीनुसार ठरवू शकता. यामध्ये डोक्यावर मिठाच्या पट्टीच्या घड्या
ठेवाव्या लागत नाही.
३. ताप जास्त असेल तर तापाचे जास्त ताकदीचे औषध द्यावे आणि लगेच डोक्यावर मिठाच्या पट्टीच्या घड्या
ठेवाव्या आणि अंग मिठाच्या पाणाने हलकसे पुसत राहावे. साधे कपडे आणि रुममध्ये कोंदतपणा नसावा/ हवेशीर असावी. सुरुवातीला ताप येण्याची वारवारता जास्त असते पण दोन औषधांच्या वेळामध्ये कमीत कमी ६ तासाचे अंतर पाहिजे. यासाठी थोडा ताप आल्यानंतर लगेच डोक्यावर लगेच मिठाच्या पट्टीच्या घड्या
ठेवाव्या आणि अंग मिठाच्या पाणाने हलकसे पुसत राहावे.यामुळे ताप चढाला वेळ लागतो.
४. रात्री ताप लगेच चढतो म्हणून नोंदव्हीच्या नोंदनीनुसार टाईमर लावून ऊठा आणि बघा मुलाला ताप आहे की नाही आणि त्यानुसार वर सांगितलेल्या स्टेप्स करा.

ताप हे एक अत्यंत किचकट व वात्रट लक्षण आहे. त्याबद्दल थोडे समजवून घेण्याचा हा प्रयत्न.

आपण गरम रक्ताचे प्राणी आहोत. शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेत ठेवणे ही आपल्या शरीराची गरज असते. हे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम मेंदूतला हायपोथॅलॅमस नामक भाग करत असतो. हायपोथॅलॅमसने पायरोजेन्स नामक काही केमिकल्सना दिलेल्या रिस्पॉन्समुळे ताप येतो. (ताप येण्याच्या सर्व कारणांचा उहापोह इथे होणार नाही, जंतूप्रादुर्भावामुळे येणारा ताप सर्वात कॉमन आहे, म्हणून त्याबद्दल.)

जंतूप्रादुर्भावामुळे होणार्‍या तापात : ताप येणे हा शरिराच्या रोगप्रतिकाराचा एक भाग आहे. "नॉर्मल" बॉडी टेंपरेचरला बहुतेक पॅथोजेनिक (माणसाला हानिकारक) बॅक्टेरिया व व्हायरस इ. जंतूंची छान वाढ होते. ताप आला, की या जंतूंची वाढ होण्यात अडथळा उत्पन्न होतो. तस्मात, ताप फायद्याचा.

बॉडी टेंपरेचर वाढवण्यासाठी आपल्या शरीराला हुडहुडी भरते. अर्थात स्नायूंची हलचाल मोठ्या प्रमाणावर होते. हे होण्यासाठी बाहेर थंडी असायची गरज नाही, व म्हणूनच ताप येण्यासाठी वाजणारी थंडी, म्हणण्यापेक्षा हुडहुडी ब्लँकेटं पांघरून जातही नाही. ती ताप भरला की आपोआप जाते.

ताप उतरताना घाम येतो, व या घामाचे बाष्पीभवन होवून शरीराचे तापमान उतरायला मदत होते.

आता पुन्हा एकदा,

आपण गरम रक्ताचे प्राणी आहोत. या गरम रक्त असण्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. पैकी तोटा हा, की आपल्याला शरीराचे तापमान ९८॥ डिग्री फॅ. च्या +/- १ डिग्रीत ठेवावे लागते. हे फार वाढले, (१०५) तर शरीरातले प्रोटीन्स व फॅट्स चक्क शिजायला लागतात, व कायमचे डॅमेज होतात. हीटस्ट्रोक्/उष्माघातात हे प्रकरण घडून येते.

लहान मुलांचे स्वतःच्या टेंपरेचरवरचे नियंत्रण कमकुवत असते, व ताप वाढला, तर "मेंदूत जाऊन" झटके येणे हा प्रकार होऊ शकतो.

तर, आता या बॅकग्राउंड ज्ञानानंतरः

१. ताप येत असताना पांघरुणे / कपडे गुंडाळणे यामुळे ताप लवकर चढायला मदत होते.
२. ताप अधिक जास्त प्रमाणात येतो, कारण शरिराचे तापमान जास्त वाढवायला आपण मदत करत असतो.
३.अती कपड्यांनी ताप उतरायला प्रतिबंध होतो. कारण घामाचे बाष्पीभवन होत नाही.
४. थंड (रूम टेंपरेचर) पाण्याच्या पट्ट्या, अंग पुसणे याने ताप उतरायला मदत होते. अती ताप असेल, तर अती थंड पाण्याचाही वापर करतात, पण तो घरगुती इलाज नव्हे.

तेव्हा, आता सांगा पाहू, बाळाला ताप येत असताना, वा आल्यावर, कपडे कसे घालावेत?