तुला भेटायला आले स्वतःला शोधण्यासाठी

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 February, 2016 - 05:34

खरेतर घेतली होती शपथ ना मोडण्यासाठी....
तुला भेटायला आले स्वतःला शोधण्यासाठी !

मुलामा दागिन्यांवरती जुन्या देतोस सोनारा
करावे काय नात्यांची झळाळी राखण्यासाठी

तुला बहुधा सहन झाले नसावे तेज सूर्याचे
धरा फिरतेच ना कक्षेत त्याच्या पोळण्यासाठी

क्षणातच झोत वाऱ्याचा दिवा विझवून गेेला...पण
जळाला जन्म वातीचा निशीदिन तेवण्यासाठी

पुन्हा खिड़कीतुुनी माझ्या जरी डोकावला नाही
पिठोरी चांदणे त्याचे पुरेसे जागण्यासाठी !

निरोपाच्या क्षणी वागायचे कळले न दोघांना
दगा जिवणी करे ....आतूर डोळे वाहण्यासाठी !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच छान

मुलामा दागिन्यांवरती जुन्या देतोस सोनारा
करावे काय नात्यांना झळाळी आणण्यासाठी>>> जास्त आवडल Happy

मतला छान !
राखण्यासाठी,,,,,
वाहण्यासाठी,,,,,
खूप छान!