अद्भूत खेळण्या

Submitted by स्वप्नाली on 24 February, 2016 - 13:59

लहान मूलाना बर्‍याचदा स्वत: च्या खेळण्या कंटाळवाण्या होतात..तेच तेच खेळायला नको वाटते, कधी कधी खेळायला कोणी सोबत नसते..अश्या वेळी, कोणत्या वस्तू मूलाना देता येतील ज्या त्यांच्या साठी नवीन असतील (वय 2-10 वर्षे), ज्यामधून त्यांना शिकायला ही मिळेल.
उदा: लोह-चुंबक, दरवज्याचा आय-होल, भिंग (मॅगनिफाइंग ग्लास), किचन मधले मोज-मापाचे चमचे. चला करू या यादी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नाली khup chan, hi mazi list -

Calculator - My 5 year old like to play with it, he asks mumma you know 4+4 is how many, I says no dear please tell me, he quickly calculate using calculator and tell me it's 8 Happy and feels very proud that he teach mumma something Happy because of this game he easily remembers it. Now he is very good at calculations and without using calculator he can solve his math sums very easily.

Age - 4+ Mix chole, rajma etc. and give 2 separate bowls and let your kids sort them

----------------------
www.vslittleworld.com

मस्त धागा. आत्ता तरी काही सुचत नाहीये, सुचलं की लिहिते. (किंवा मुलाला ऑब्झर्व करते आणि लिहिते)

इथे तुम्हाला खूप खेळ, गेम्स, अ‍ॅक्टिव्हिटीज आणि खूपशी जनरल माहिती देखिल मिळेल -

मज्जाखेळ आणि गोष्टी - सावली या आयडीच्या लेखनात तुम्हाला अनेक छान छान खेळ मिळतील. लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी देखिल आहेत. : http://www.maayboli.com/user/26562/created?page=2 (बाकीची पानं देखिल पहा)

मुलांसाठी खेळणी /गेम्स इत्यादी : http://www.maayboli.com/node/12386

मुलांसाठी पुस्तके , इतर छंद, फावल्या वेळेतले उद्योग इत्यादी : http://www.maayboli.com/node/35698

सुट्टीतील उद्योग : http://www.maayboli.com/node/25906

दोन वर्षाच्या मुलांसाठी पार्टी गेम्स : http://www.maayboli.com/node/52281

चला कल्पक बनवु या : http://www.maayboli.com/node/22219

लहान मुलांसाठी दृकश्राव्य तबकड्या अर्थात व्हीसीडीज् : http://www.maayboli.com/node/20136

खरतर कुठलीही गोष्ट खेळणी म्हणून वापरता येइल Happy .
बाळराजे कधीतरी हाताला लागतील त्या गोष्टी घेउन घरात पळापळी करायचे .
मग त्यान्च्या आजोबाना टेन्शन .

एकदा माझ्या ऑक्सिडाईज्ड बान्गड्या घेतल्या . मी फक्त गप्प बसून बघत होते काय चाललाय ते .
थोड्यावेळ इकडे तिकडे केल्यावर म्हण्तो , मम्मा ईकडे ये , गंमत दाखवतो .
मग आम्हि त्या बान्गड्या वेगवेगळ्या आकारात रचून वेगवेगळ्या गोष्टी बनवल्या .
एक फुल , कॅटरपिलर , सन , मून , टॉवर , सगळ्यात बेस्ट तर मिकी माउस - डिस्नी चॅनेलचा लोगो .

मॅक्डी मध्ये मिळालेली खेळणी , सॉफ्ट टॉयज घेउन नाटक बनवण हा आणखी एक आवडता खेळ .

किचन्मधले वाट्या , पेले , चमचे - पाणी भरून जलतरंग वाजवणे .

कधी माझी ओढणी खान्द्याला बान्धून सुपरमॅन , ईगल , बटरफ्लाय बनणं.

कधी नुसते रिकामी खोकडी जमा करून टॉवर बनवणं

थर्माकॉल चे ग्लासेस आणि टी-टी बॉल घेउन "बॉलिन्ग" करणं

कणकेचा - एका पोळीचा गोळा घेउन - क्ले म्हणून वापर करण .

किचन मधल्या बास्केट्स डोक्यावर हेल्मेट्स म्हणून घालायच आणि कालथा/पळी ही बन्दूक .

सगळ्या खेळण्यांची पूर्ण घरबर आगगाडी करतात का तुमची बाळे? >> हो Happy
माझ्या मैत्रिणीचा मुलगा सगळ्या गाड्या गोळा करून "ट्रॅफिक जॅम " करायचा .