भांडा भांडा भरपूर भांडा …… नेत्यांच्या समर्थकांनो

Submitted by आईची_लेक on 22 February, 2016 - 02:16

वा मस्त चाललय युद्ध सगळ्या राजकीय धाग्यांवर
कुणीतरी काड्या टाकणार की इथे सगळे पेटून उठतात , इथं सगळ्या पक्षांचे तगडे समर्थक आहेत

आणि नेते काय सगळे इथून तिथून सारखेच ,त्यांना फक्त सत्तेशी मतलब असतो
ते तुमच्या मनात परस्पर द्वेषाची बीज पेरतात आणि स्वतःची पोळी भाजून घेतात ,भांडायला हजार कारण कधी प्रादेशिक अस्मिता कधी जातीय अस्मिता कधी भाषिक अस्मिता एक काडी टाकली की नेत्यांच काम झाल, त्यांचे अनुयायी तलवारी उपसून तयार असतात एकमेकांशी भांडायला
divide and rule हीच नीती वापरून राज्यकर्ते राज्य करताहेत
सगळीकडे कसलं ना कसलं आंदोलन पेटलंय ,जनता भांडतीये आणि नेते बघताहेत मजा !!
त्यांचा हेतू एकच असतो बेसिक समस्यांवरून लोकांच लक्ष हटवायच,
पाणी प्रश्न इतका भीषण झालाय देशात अस्वच्छता, बेरोजगारी ,वाढती गुन्हेगारी ,प्रदूषण इतक्या समस्या आहेत पण त्याच्याशी एकाही नेत्याला काही देण घेण नाहीये आणि जनता नेत्यांना जाब विचारण्या ऐवजी आपापसात भांडतीये

लोकांना भांडायला फार आवडत
उद्या राकुंनी 'पाणी बचतीचे उपाय 'असा धागा काढला तर कदाचित ५० प्रतिसाद सुद्धा मिळणार नाहीत कारण तिथे एकमेकांचे वाभाडे काढता येत नाहीत ना

भांडत रहा यथेच्छ पण तुम्ही इथे भांडलात काय किंवा आवडत्या नेत्याच समर्थन करायला प्रत्यक्ष भेटून परस्परांची टाळकी जरी फोडलीत तरीही एकाही नेत्याला काडीचाही फरक पडणार नाहीये

लगे रहो ,हेच हवय नेत्यांना , तुम्ही तुमच्या अस्मितांवरून भांडत राहा म्हणजे समाजात कधीच एकी होणार नाही , कारण समाजात जर एकी झाली तर जनता नेत्यांना भारी पडेल मग नेत्यांना खरोखर समाजहिताची काम करावी लागतील आणि देश सुधारेल..........

पण तसं झाल तर भांडण करायला काही कारण उरणार नाही आणि इथे तर भांडल्या शिवाय जनतेला चैन पडत नाही , भांडा भरपूर भांडा
अस्मिता सगळ्यात महत्वाची
पाणी प्रश्न , अस्वच्छता वगैरे सारखे क्षुल्लक प्रश्न काय कधीही सुटतील आणि नाही सुटले तरी काय फरक पडतो
मी तर म्हणते कशाला आंतरजालावर भांडण्यात वेळ घालवताय , स्नेहमेळावा असतो तसा एखादा भांडण मेळावा भरवा आणि समोरासमोर भांडा , जमल्यास हाणामाऱ्या करा.
कुणी सांगाव या मेळाव्यामुळे कदाचित देशातल्या पाणीप्रश्न वगैरे सारख्या क्षुल्लक आणि बिन महत्वाच्या समस्या सुटतीलही........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी खरे आहे, १००% सहमत

नको तिथे (पाणी प्रश्न , अस्वच्छता,रस्ते, रोजगार, भ्रष्टाचार, बलात्कार, गुंडागर्दी). सगळेच लोक सहीष्णुता दाखवत आहे. मी तर म्हणेल शेपटी टाकुन बसतात.

<< चहा घ्या जरा. इतके भाषण लिहून थकला असाल. स्मित >>

उन्हाळ्यात लिंबू सरबतच बर चहापेक्षा ............ Happy Happy :स्मित:nimbu.pngआणि तुम्ही हि कॉफी घ्या...... Happy Happy :स्मित:ezgif.com-resize.gif

smiley-sad001.gif

छान विषय आहे.... भावना पोहोचल्यात आणि उद्वेग जाणवतो.

आपण (यात मी, एक सामान्य पण आलोच) नेहेमी सर्वात सोपे काम करतो आणि ते म्हणजे राज्यकर्त्यान्ना दोष देतो... त्यान्ना सर्व प्रॉब्लेम्सचा दोष दिल्यावर काम पुर्ण झाले म्हणुन (कर्तव्यपुर्ती), सुटकेचा निश्वास टाकतो.

जशी प्रजा तसा राजा... आपल्याला आपल्या पात्रतेनुसारच राज्यकर्ते मिळतात. कारण ते पण आपल्यामधुनच आलेले असतात. जर राज्यकर्ते चान्गले हवे असतील तर आपणच आपल्या पात्रतेच्या अपेक्षान्ची उन्ची वाढवायला हवी, आपल्यातच अजुन सुधारणा घडवुन आणायला हव्यात... सर्व प्रजा चान्गली झाल्यावर राज्यकर्ते १०० % चान्गली असणारच आहेत कारण ते सामान्य जनातुनच आलेले आहेत.

परिस्थिती बदलण्यासाठी आपण (मी काय करतो ?) काय करतो हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. प्रत्येकालाच परिस्थितीशी झगडता येतही नसेल (तेव्हढी सबळता नसेल) तर किमान आहे त्या परिस्थितीत अजुन भर पडणार नाही याची काळजी घ्या. उदा - मी माझ्यापुरता भ्रष्टाचार करणार नाही किव्वा इतरान्ना करायला भाग पाडणार नाही, शक्य तेव्हढी पर्यावरणाची काळजी घेणे या व अनेक छोट्या गोष्ट आहेत आणि आपण सहज करु शकतो.