हुं!

Submitted by mrsbarve on 22 February, 2016 - 01:03

“आज सकाळी आत्तींचा फोन येउन गेला . द्राक्षे यंदा दुबईला जाणार म्हणाल्या ".
"हुं " स्क्रीन वरची नजर न हलवत उत्तर .
"आत्ती म्हणाल्या कि मंजुला दुसरी मुलगी झाली"
आता त्याने किमान "हि कोण मंजु?" एव्हढ तरी विचारावं अशी अपेक्षा बाळगत तिने पाने वाढायला घेतली . पण ऑफिसच्या कामात तो गुंतलेला .
"उद्या माझ्या क्लासना सुट्टी " ,
"गुड---" त्याचा रिप्लाय !
उद्या मी" आणि मैत्रिणी नीरजा ला जातोय ,मी संध्याकाळी काही तरी टेक ओउट आणू का?”
"चालेल ".

-----------------

"तू काय आणलस मग जेवायला"?
"सब्ज आणलेत ."
"मी बाहेरच जेवतो स्टडी मध्ये ,काम संपवायचं आहे "
"हुं"

रात्रीचे बारा वाजून गेलेत ,ती रडतेय ,वैतागून झोपतेय तोवर हा आत येतो ,ती रडलेले डोळे दिसू नयेत म्हणून पाठ करून झोपतेय.
"राणी ,उठ न"
"काय रे ,झोप बघू आता" आवाजात शक्य तितका तिरसट स्वर!
हळूच तिला पांघरूण घालत तो म्हणतो,"आत्तींच्या मंजुच्या मुलीचं नाव नीरजा ठेवलं तर ?"

ती हसते ,एकदम मस्त!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा Happy