फुसके बार – २१ फेब्रुवारी २०१६ - पप्पूच्या रक्तातील देशद्रोह व बिनडोकपणा, जाट संघटनांचे आव्हान व चहावरची साय
१) पप्पू, तुझ्या रक्तात असलाच तर देशद्रोह व बिनडोकपणा. देशभक्ती नाही.
पप्पू काल म्हणाला की माझ्या रक्तात देशभक्ती आहे. माझ्या कुटुंबातील दोघे मेले (मरे). अतिरेक्यांनी त्यांना मारले. तर यामुळे पप्पूच्या रक्तातच देशभक्ती आहे म्हणे.
पप्पू, तुझ्या आजीने या देशाचे जेवढे भले केले त्यापेक्षा कितीतरीपट वाटोळे केले. राजकीय स्वार्थासाठी पूर्वोत्तर राज्यांमधल्या बांगला देशी निर्वासितांचा व नंतरच्या घुसखोरीचा प्रश्न मुद्दाम सोडवला नाही, झालेच तर त्याला खतपाणी दिले. राजकीय स्वार्थासाठी देशात आणीबाणी पुकारली. जनता पक्षाचे पंतप्रधान व मंत्री पुचाट निघाले म्हणून, अन्यथा काहीही कारण नसताना पुकारलेली आणीबाणी हा देशद्रोहच होता व त्यासाठी तुझी आजी फासावर गेली नसती तरी आयुष्यभर तुरूंगात तरी नक्कीच राहिली असती इतका गंभीर गुन्हा होता तो. तेव्हा तुझ्या रक्तात काही असलेच तर देशद्रोह आहे हे लक्षात ठेव. आज आणीबाणी हा शब्द उगाळलेल्या दगडासारखा बोथट झाला आहे म्हणून; अन्यथा त्यावेळी आजीने व तुझ्या काकाने जे अक्षरश: थैमान घातले होते, त्याची तीव्रता भयानक होती. अर्थात आज सगळेच ते विसरलेले आहेत असे दिसते.
तशाच राजकीय स्वार्थापोटी अकालींना शह देण्यासाठी तुझ्या आजीने पंजाबमध्ये भिंदरावालेला प्रोत्साहन दिले, तो हाताबाहेर जाऊन त्याचा राक्षस झाल्यावर मग सुवर्णमंदिरावर कारवाई करावी लागली. त्यातून त्या मारल्या गेल्या. स्वत:च प्रश्न निर्माण करून त्यात मारले गेले, तर त्याला देशभक्ती म्हणत नाहीत, हुतात्मा म्हणत नाहीत. उलट राजकीय स्वार्थापोटी तेथे दहशतवादाला जन्म देण्यास जबाबदार असणे हा देशद्रोह आहे. शिवाय त्यांच्या वैयक्तिक प्राणहानीपलीकडे देशाचेही जे अपरिमित नुकसान झाले याची तुला कल्पना तरी आहे का पप्पू? पुढच्यावेळी असले भंपक उद्गार पप्पूने काढले तर त्याला हे कोणीतरी ऐकवले पाहिजे.
तुझे वडील राजकारणात नवखे होते तरी देशाच्या डोक्यावर बसवले गेले. कारण एकच तुझ्या आजीचा मुलगा. गादीचा वारसदार. शाहबानो प्रकरणी कायदा बदलून, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंमलात न आणून मुस्लिम महिलांवर अन्याय करण्याचा पराक्रम त्यांनी केलाच होता. भारत देशापेक्षा अगदी छोट्या असलेल्या श्रीलंकेचे चतुर अध्यक्ष जयवर्धने यांनी राजकारणात बच्चा असलेल्या तुझ्या वडलांना अक्षरश: मूर्ख बनवले आणि त्यांच्या धूर्त चालीला बळी पडत तुझ्या वडलांनी तिथल्या तमीळ दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी आपले म्हणजे भारतीय सैन्यच खर्ची पाडले. त्यातूनच ते पुढे मारले गेले. तेव्हा त्यांनी देशरक्षणासाठी काही केले म्हणून व त्यातून त्यांचा मृत्यु झाला यामुळे त्यांना हुतात्मा म्हणावे अशी स्थिती अजिबात नाही. तुझी आजी काय किंवा वडील काय, त्यांच्या अशा प्रकारचे मारले जाण्याचे दु:ख मलाही आहेत, पण त्यातून तू तुझ्या रक्तातच देशभक्ती आहे असे म्हणतोस तो तुझा मूर्खपणा आहे हे सांगत अहे. तुमच्या गांधी घराण्याशिवाय देशाचे काही होणार नाही असा तुमचा जो माज आहे त्यातून ही तुमच्या रक्तातच देशभक्ती आहे वगैरे डायलॉगबाजी जन्माला येते.
मागे तुझ्या मातोश्रींनीही मी माझ्या सासूचा रक्ताळलेला देह माझ्या मांडीवर घेतला होता, माझ्या पतीनेही बलिदान केले अशी नाटकबाजी मते मिळवण्यासाठी केलेल्या भाषणात केली होती. तेव्हा लोक भुलले होते, आता तसे होणार नाही, याची खात्री बाळग.
एवढेही सांगतो, की तू तर तुझ्या आजीपेक्षा, वडलांपेक्षाही बदतर आहेस. वडील नवखे होते, पण बुद्दू नव्हते. तू तर बुद्दू आहेस, बिनडोक आहेस. तुझ्या पक्षात तुझ्यापेक्षा चांगले व अनुभवी असलेले कितीतरी नेते आहेत, पण तरीही त्यांच्याऐवजी तुझे बोबडे बोल रोज ऐकणे आमच्या नशिबी आहे. काल मनरेगाच्या मजुरांसमोर म्हणालास, की मोदी म्हणतात की गरीबांना काम मिळायला नको. हेही तुझे बोबडे बोलच. हे बोबडे बोल खरोखर एखाद्या बाळाचे असते तरी हरकत नव्हती. पण तू तर तुझ्या रक्तात देशभक्ती असल्याचे बरळत आहेस.
म्हणून हे सांगावे लागले पप्पू.
२) जाट संघटनांचा माज व सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आव्हान
हरयानातील जाटा संघटनांनी आरक्षणावरून फारच हिंसक आंदोलन सुरू केले आहे. हॉस्पिटल्स, शाळा जाळण्याचे प्रकार झाले आहेत. राजधानी दिल्लीचा पाणीपुरवठा रोखण्यात आल्याचे कळते.
एकूण आरक्षण ५० टक्क्यापेक्षा वाढू शकत नाही हे घटनात्मक कारणामुळे वास्तव आहे. शिवाय अगदी सर्वोच्च न्यायालयाने मुळात जाट समाज मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना आरक्षण देता येणार नाही असा निवाडा दिला आहे. तरीही अशा प्रकारचे हिंसक आंदोलन चालू करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देण्यासारखे आहे. हे आंदोलन कठोरपणे मोडून काढणे आवश्यक आहे.
त्यामुळे अशी आंदोलने देशविरोधी आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.
महाराष्ट्रातही मराठा आरक्षणावरून आरपारची लढाई लढण्याचे संकेत गुंड राणे पिता-पुत्रांनी दिले आहेत. मुळात गुंड राणे यांच्या अध्यक्षतेखाली अशी आरक्षणासंबंधीची समिती नेमणे हाच विनोद होता. एकापाठोपाठ निवडणुका हरल्यामुळे राणे यांचे राजकीय भविष्य सध्या अंधारमय आहे. शिवाय राज्यातल्या निवडणुकांना आणखी बराच अवधी आहे. तेव्हा स्वत:चे राजकीय पुनर्वसन करून घेण्यासाठी राणे या नादाला लागलेले असण्याची शक्यता आहे.
कारणे काहीही असोत, यापुढे कोणालाही नव्याने आरक्षण मिळणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने जाट आंदोलनाची स्वत: दखल घेऊन द्यावा. त्याशिवाय स्वत:च्या राजकीय लाभासाठी देशाला वेठीला धरण्याचे देशाच्या विविध भागात यावरून घडणारे प्रकार बंद होणार नाहीत. शिवाय अशा आंदोलनांना फूस देण्यात कोणाचा काय हेतु असेल याचा नेम नसतो. त्यामुळे हे प्रकार बंद व्हायलाच हवेत.
बाकी भाजप असो, कॉंग्रेस असो वा आप असो, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळे आरक्षण मिळणार नाही असे हे बेकायदेशीर आंदोलन करणा-या जाट संघटनांना स्पष्टपणे सांगताना दिसते आहे का हो? त्यामुळेही अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाची जबाबदारी वाढलेली आहे.
३) कन्हैयाकुमारचे वकीलच त्याला जामीन न मिळण्यास जबाबदार?
परवा सर्वोच्च न्यायालयात जाताना कन्हैयाला मारहाण झाली, या कारणाने त्याच्या वकिलांनी तेथेच त्याच्यासाठी जामीन मागितला. दिल्ली पोलिसांनी त्याला जामीन देण्यास त्यांची हरकत नसल्याचे सांगूनही केवळ उच्च न्यायालयात जामीन न मागितल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांची सुनावणी घेऊनही त्यांना परत उच्च न्यायालयातच जाण्यास सांगितले. याबाबतीत उशीर झाल्यामुळे आता कन्हैया कुमारच्या जामीनाची सुनावणी थेट पुढच्या आठवड्यातच होईल. मात्र जेव्हा ती होईल त्यावेळी त्याची जामीनावर सुटका होण्यात अडथळा येणार नाही असे दिसते.
४) अंनिसच्या व्यासपीठावर राजकीय पक्षांना मोकळे रान?
गोविंद पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापुरात काढलेल्या मोर्चामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्तेही दिसले. पुण्यात दाभोळकरांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने पानसरेंचीही आठवण काढली गेली होती. पण त्या निमित्ताने ‘लाल सलाम’च्या घोषणा दिल्या जातात, हे अंनिसला मान्य आहे का?
मागे पुण्यातल्या अंनिसच्या कार्यक्रमात कॉंग्रेसच्या हुसेन दलवाईंनीही यापुढे बहुजन समाजातल्या जवानांचे बळी सीमेवर पडलेले खपवून घेतले जाणार नाही (म्हणजे तेथे कोणाचे बळी पडावेत, असे त्यांचे म्हणणे होते हे वाचकांनी लक्षात घ्यावे) असे तद्दन मूर्खपणाचे विधान केले होते. तेव्हा अंनिसच्या कार्यक्रमामध्ये राजकारणीदेखील आपले हात धुवून घेत असताना दिसतात, हे अंनिसला मान्य आहे का?
गोविद पानसरे ही चांगली व्यक्ती होती, मग त्यांची जी विचारसरणी होती तिच्या अनुषंगाने लाल सलामच्या घोषणा दिल्या तर बिघडले काय, असे कोणालाही वाटेल. मात्र आज जेएनयुमध्ये फुटीरतावादी व डावे यांच्यात असलेले उघड संबंध, केरळमध्ये रा.स्व. संघ व कॉंग्रेस यांच्यात राजकीय हत्या करणारे कम्युनिस्ट, आपल्या राजवटीदरम्यान कम्युनिस्टांनी बरबाद केलेला बंगाल हे सगळेच त्यामुळे पावन होते. आता केरळमध्ये रा.स्व. संघाकडूनही कम्युनिस्टांच्या हत्या झालेल्या आहेत असे कोणाचे म्हणणे असेल तर तेथे या हत्यांना सुरूवात कशातून झाली हे पहावे व हिंसाचारातून क्रांती हीच कम्युनिस्टांच्या विचारधारा आहे हे लक्षात घ्यावे आणि केरळमधील कम्युनिस्ट पक्षाचे अस्तित्वच राजकीय हिंसाचारावर अवलंबून आहे हे लक्षात घ्यावे. वैयक्तिक पातळीवर माझा कोणत्याही हत्यांना विरोधच आहे.
अंनिसने यापुढे कम्युनिस्टच नव्हे, सर्वच राजकीय विचारधारांना बाजूला ठेवावे. दाभोळकर हे आधुनिक संत होते, म्हणजे इतक्या उच्च विचारांचे होते असे मी मानतो, त्यांच्या चळवळीला राजकीय वळण लागू नये असे वाटते.
५) बंगळुरूमध्ये शंकर बेलगावी ही वयाच्या चार वर्षांपासूनच अंधत्व आलेली व्यक्ती लिंगायत समाजाच्या जवळजवळ २०० शैक्षणिक संस्थांचे उपाध्यक्ष आहेत. लहानपणी त्यांच्या आईने त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला तर नंतर पत्नीची अमूल्य साथ. त्यांना चार मुली आहेत. त्यांना दररोजची वर्तमानपत्रे वाचून दाखवली जातात. त्यांच्या आविर्भावावरून शंकाही येत नाही की त्यांना अजिबात दिसत नाही.
काल टीव्हीवर याबाबतची बातमी ऐकताना त्यांचे आडनाव नीटसे कळले नाही.
६) चहावरची साय
ज्यांना पहिल्या वाफेचा चहा पिण्याची सवय नसते त्यांनी तो पिण्यास सुरूवात करेपर्यंत किंवा चहा आणण्यासच थोडा उशीर झालेला असेल तर त्यावर साय जमते. दूध कितीही कमी दर्जाचे असले तरी सायीचा हलकासा थर जमतोच जमतो. असा चहा पिताना काही जणांची धांदल उडते. तेही इतरांसमोर असताना. काही जण सरळ दोन बोटांनी माशी पकडावी तसा हा थर बाजुला सरकवतात. त्यावेळी आपली बोटे स्वच्छ आहेत का हेही पाहिले जात नाही. काही जण फू-फू करून त्या थराला मागे सरकवण्याचा प्रयत्न करतात. झुपकेदार मिशा असतील तर मात्र हा थर मिशीत अडकलाच समजा. हा प्रकार म्हणजे पाहुण्यांची छोटीसी परीक्षा घेण्यासारखा प्रकार असतो.
पूर्वी जावयाची परीक्षा घेण्यासाठी जेवायला पक्वान्न म्हणून शेवयाची खीर बनवत. ही खीर खायची तीदेखील चमच्याने. म्हणजे चमचा तोंडात पोहोचेपर्यंत ती हमखास खाली सांडणार व जावई परीक्षेत अनुत्तीर्ण होणार. त्यापेक्षा खिरीची वाटीच तोंडाला लावणारा जावई हुशार समजला जाई. चहावरच्या सायीच्या थराचा प्रश्न यामानाने किरकोळ असतो.
विदूषक
विदूषक
रच्याकने, मी एकच ओळ लिहिली
रच्याकने,
मी एकच ओळ लिहिली की त्यावर अर्वाच्य भाषेत इतकी गरळ ओकावी लागते, यातच या कुलकर्णीच्या भगतगिरीची ओळख पटते.
सचिन पगारे, "काहीही असो
सचिन पगारे,
"काहीही असो त्यांनी समोरासमोर आणिबाणी लावली होती.पण अघोषित आणिबाणिचे काय"
इतका सोपा अर्थ विचारताहात. हा प्रश्न तरी विचारू शकत आहात ते स्वातंत्र्य आहे हे मान्य आहे की नाही. का उगाच अघोषित आणीबाणी वगैरे शब्द वापरून दिशाभूल करत आहात किंवा स्वत:चे समधान करून घेत आहात?
कशात काही नाही तर कसली खळबळ आणि घेऊन बसलाय? एक ठोंब्या वाटेल ती विधाने करतोय हा त्यातला साधा भाग आहे. रक्तातली देशभक्ती वगैरे जाऊद्या पुढचा जो भाग 'मोदीजी चाहते हैं की गरीबों को काम ना मिले', हे उद्गार कोणासामोर तर मनरेगाच्या मजुरांसमोर. तेव्हा अशा माणसाकडून काहीही धोका संभवत नाही.
याने न वाचता केलेले विविध मुद्द्यांचा समावेश असलेले एक भाषण दाखवा आणि मग आपण खळबळ वगैरे पाहू.
अहो ग्रामपंचायतीतही आजकाल याच्या वयाचा ठोंब्या नसतो. त्यांचा थोडाफार तरी अभ्यास असतो. हा तर देशाचे नेत्ृत्व करण्यासाठी प्रोजेक्ट केला जातोय.
अरे रे सल्ला इतका झोंबला का?
अरे रे सल्ला इतका झोंबला का? बरोबर प्रसाद नावाच्या विदुषकाला सुध्दा वेड्यांच्या इस्पितळात भर्ती करून घ्या
कुलकर्णीला सोबत होईल.
ज्यांच्या रक्तात व्यक्तिद्वेष आणि वेडेपणा भरलेला आहे अशा लोकांची वेड्याच्या इस्पितळा मधे जागा आहे. कृपया रक्त बदलून घ्यावे
अहो ग्रामपंचायतीतही आजकाल
अहो ग्रामपंचायतीतही आजकाल याच्या वयाचा ठोंब्या नसतो. त्यांचा थोडाफार तरी अभ्यास असतो. हा तर देशाचे नेत्ृत्व करण्यासाठी प्रोजेक्ट केला जातोय.
<<
ठोंब्या,
राजेश, अहो तो तुमच्यामते
राजेश, अहो तो तुमच्यामते ठोंब्या असेल, भाजपच्या मते क्षुल्लक असेल तर त्यांना इतके महत्व का? दुर्लक्ष करता येत नाही कारण न जाणो हा पलटुन आला तर ही भिती भाजपच्या मनात ओतप्रोत भरली आहे.भाजपच्या मते काँग्रेस संपलिय, नेत्रुत्व कुचकामी आहे मग त्या नेत्रुत्वाने काही क्रुति केली वक्तव्य केले तर त्यावर आकांडतांडव कशासाठी? एका संपलेल्या पक्षाच्या साधारण नेत्रुत्वाचे बोल हे मानुण सोडुन द्यायचे पण ते तर खुद्द मोदींकडुनही होत नाही. याचा एकच अर्थ स्पष्ट दिसतोय जाहिरातींचा हजारो कोटींचा मारा करुन बहुमत मिळुनही मनातील भितीवर मात करता येत नाहि.
बिहार मधे तक्षशिला म्हणणारा
बिहार मधे तक्षशिला म्हणणारा ठोंब्या
<< तेव्हा अशा माणसाकडून
<< तेव्हा अशा माणसाकडून काहीही धोका संभवत नाही.>>
----- राहुल गान्धी यान्च्याकडून धोका सम्भवत नसेल तर त्यान्च्या बारिक-सारिक वक्तव्याची आपल्याला का दखल घ्यावी असे वाटते ?
लोकान्चे लोकान्साठी लोकान्नी चालवलेले प्रजासत्ताक सन्घराज्य आहे, त्यामुळे नावडल्यास लोक नाकारतील ना... जे त्यान्नी २०१४ मधे केले.
आता निवान्त झोपतो, शुभरात्री (१:३३).
सभासद, तो बोंब्या
सभासद, तो बोंब्या असेल!
म्हणजे बोंबलून अज्ञान प्रदर्शित करणारा!
कोण हो तो? मी कधी वाचले नाही याबाबत.
राकु, तुम्ही बिजेपी rss चे
राकु, तुम्ही बिजेपी rss चे पुर्ण वेळ प्रचारक आहात का?
ABVP ने JNU में पाकिस्तान
ABVP ने JNU में
पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाए (सबूत आप पहले
ही एक वीडियो में देख चुके हैं) और इसका इलज़ाम JNU के
विद्यार्थियों पर लगा कर जेल में डाल दिया गया और फिर
शुरू हो गयी देश भक्ति और देश द्रोही की बहस।
हर टीवी, अखबार, सोशल मीडिया, हर जगह ये बहस हो रही
है।
ये सच मुच देश भक्ति का जोश है या फिर असल मुद्दों से
ध्यान भटकाने का तरीका???
बीजेपी पहले भी ऐसे घटिया और नीच तरीकों का इस्तेमाल
करके जनता का ध्यान असल मुद्दों से भटकाती रही है।
अब ज़रा गौर कीजिये पिछले कुछ दिनों में हुई बातों से जिन
पर आपका ध्यान नहीं गया क्योंकि बीजेपी ने इस तरिके से
आपका ध्यान भटका दिया
1) मोदी सरकार ने देश के गौरव PSLV (हांजी वही PSLV
जिसने दूसरे देशों के उपग्रह भी अंतरिक्ष में पहुंचाए हैं और देश
का नाम रौशन किया है) को प्राइवेट कंपनियों को बेचने
की तैयारी कर ली है
2) देश की अर्थव्यवस्था चरमरा रही है। सेंसेक्स धड़ाम से नीचे
गिरा है
3) अंतर्राष्ट्रीय बाजार में क्रूड आयल के दाम गिरने के
बावजूद भी देश में पेट्रोल डीजल के दाम नहीं गिरे क्योंकि
मोदी जी ने पेट्रोल डीजल पर एक्साइज ड्यूटी बढ़ा दी है।
4) जीडीपी के नए फॉर्मूले के हिसाब से आंकड़े तो ऊपर जा
रहे हैं पर IIP के आंकड़े पाताल में घुसते जा रहे हैं।
5) मोदी जी के विरोध के बावजूद अमेरिका पकिस्तान को
विमान बेच रहा है। मोदी जी की चमचागिरी और विदेश
नीति की हवा निकल रही है।
6) मोदी सरकार ने उद्योगपतियों का 1.80 लाख करोड़ का
ऋण माफ़ कर दिया। बैंक घाटे में चले गए।
7) लेकिन किसानो की फसलें नहीं खरीदी गयी ना ही
उनको आर्थिक सहायता दी गयी। जो धान पिछले साल
सरकार में 2100 में खरीदी थी वो अब्की बार प्राइवेट
कंपनियों ने 900-1000 में खरीदी। किसानो पर कर्ज बढ़ता
जा रहा है और उसकी मोदी जी को फ़िक्र नहीं।
लेकिन उद्योगपतियों का कर्ज माफ़ करने के लिए पैसे हैं
मोदी जी के पास। दुसरे देशों को बांटने के लिए पैसे हैं मोदी
जी के पास।
8) बाजार में मंदा पड़ा है। जमीन के भाव 25% रह गए। सभी
व्यापारी खाली बैठे हैं। भ्रष्टाचार चरम पर है।
लेकिन, एक ही झटके में, मोदी जी ने अपने प्यादों की
सहायता से लोगों का ध्यान इन सब मुद्दों से भटका कर, खुद
ही बनायी हुई बहस में फंसा दिया।
इसे कहते हैं राजनीति !
लेकिन क्या हम इतने नासमझ हैं?
- फेसबुक फॉर्वर्ड
https://www.facebook.com/speakupindia1/photos/a.165250586917276.33185.16...
व्वा, व्वा आज दोन ठेवणीतील
व्वा, व्वा आज दोन ठेवणीतील आयडी जे फक्त प्रशासकांच्या विपूत इतर सदस्यांच्या "कागाळ्या" करण्याकरता राखीव ठेवले होते, ते अड्डा गॅंगला मैदानात उतरवावे लागले. हेच रांकुच्या धाग्याचे यश म्हणावे का?
राकु, वरती तुम्ही राहुल
राकु, वरती तुम्ही राहुल गांधिंच्या भाषणांचा उल्लेख केलाय.आता तुम्हिच सांगा ज्यांना फक्त भाषणच येते त्यांनी विकासासाठी काय केले? दिड दोन वर्षात देशात जो उन्माद वाढलाय त्याबाबत तुमचे काय मत आहे. भाषण ऐकुन घटकाभरचे मनोरंजन होते मुलभुत प्रश्नांचे काय? देशात सध्या ज्या प्रश्नांहुन गदारोळ माजलाय त्याबाबत पंप्रना दोन मिनिटाचे एक वक्तव्य देता येउ नये.काय उपयोग त्या भाषणकलेचा.गोरगरिबांना भाषणची नाही, राशनची गरज आहे.
कट्टेकरांना राकुच्या मदतीला
कट्टेकरांना राकुच्या मदतीला उतरावे लागत आहे यावरून कळते
नविन वाचक, राकुंच्या धाग्याला
नविन वाचक, राकुंच्या धाग्याला यश मिळणे महत्वाचे नाही तर देश जो अपयशाच्या गर्तेत सापडलाय तो यशाकडे जाणे महत्वाचे आहे.विद्यार्थि संघटनांमध्ये सरकारबद्दलच नव्हे तर एकुनच देशाबाबत असंतोष तयार होतोय तो चिंतनिय आहे.
सभासद, छान पोस्ट शेअर केलित
सभासद, छान पोस्ट शेअर केलित मुख्य म्हणजे ती हिंदीत आहे धन्यवाद.
कुलकर्णींच्या ह्या
कुलकर्णींच्या ह्या धाग्याचासुद्धा अनुल्लेख करण्याची धमक एक जण दाखवू शकला नाही. अरे अरे, किती हळवे झाले आहेत पराभूत पक्षाचे खंदे समर्थक!
अरे रे काडी लावायला सारखे
अरे रे काडी लावायला सारखे यायला लागते किती ते पराभूत मानसिकता कट्टेकरांच्या मनात ओतप्रोत भरली आहे
(No subject)
(No subject)
कट्टेकर्यांचे भन्नाट चित्रे
कट्टेकर्यांचे भन्नाट चित्रे
बेफि, अनुल्लेख कशासाठी
बेफि, अनुल्लेख कशासाठी करायचा? त्यांनि त्यांची मते मांडली आपण आपली मते मांडायची. रोहितचा जिव गेला अनुल्लेख करा,खैरलांजी घडले अनुल्लेख करा, देशात वर्णवर्चस्व पसरवले गेले अनुल्लेख करा, हजारो वर्षे देवधर्माच्या नावाने माणसातली विचारशक्ति निर्जिव केली गेली त्याचा अनुल्लेख करा.अनुल्लेखाने काहीही साध्य होत नसते ते जिवंतपणाचे लक्षण नव्हे.
बेफि, राकुंची एक विचारप्रणाली
बेफि, राकुंची एक विचारप्रणाली आहे.त्यांची राजकिय विचारप्रणाली मला रुचली नाहितर मी प्रतिवाद करतो मात्र त्यांची धार्मिक विचारप्रणाली मला आवडते. मागे पुराणातील कथांवर त्यांनी सडेतोड हल्ला केला होता.
तुम्ही मात्र त्या धाग्याचा अनुल्लेख केलात.
अनुल्लेखाने काहीही साध्य होत
अनुल्लेखाने काहीही साध्य होत नसते ते जिवंतपणाचे लक्षण नव्हे.
<<
काय म्हणता पगारे?
खैरलांजी घटनेच्या वेळी असला काही जिवंतपणा दिसला नव्हता तात्कालीन सरकारमध्ये !
पगारे, तुमच्यासाठी चाहे ऊपर
पगारे, तुमच्यासाठी
चाहे ऊपर कितनी भी मिट्टी डाल दो, चाहे जितना गहरा दबा दो, डॉ. रोहित वेमुला श्मशान की राख झाड़कर फिर उठ खड़ा होगा और मास्टरों की आंख में आंख डालकर पूछेगा - हमें मारा क्यों द्रोणाचार्य...
बेफि तुमच्यासाठी राकुंचा तो
बेफि तुमच्यासाठी राकुंचा तो धागा....
http://www.maayboli.com/node/57162
दिसामाजी काहीतरी ते लिहावे
दिसामाजी काहीतरी ते लिहावे ।

प्रसंगी अखंडित वाचीत जावे ॥
....
धन्यवाद, सकुरा
धन्यवाद, सकुरा
पगारे, जर काँग्रेस ने मा.
पगारे,
जर काँग्रेस ने मा. राहुलजी गांधी साहेबांना सर्व अधिकृत जबाबदा-यांतुन मुक्त केले व मा. राहुलजी गांधी एखाद्या सामान्य मानसाप्रमाणे राजकीय अज्ञानवासात राहुन जीवन कंठु लागले,
तर त्यानंतरही मा. राहुलजी साहेबांना घाबरुन मा. राजेशजी कुलकर्णी साहेब व मा. भाजपजी साहेब किंवा इतर कोणीही त्यांचा नावाचा उल्लेख करुन, त्यांच्या प्रत्येक वक्त्यव्यामागे पडतील, त्यांच्या प्रत्येक कॄतीवर हल्लबोल करतील असे तुम्हाला वाटते का? का?
राहुल गांधींनी भाजपाची
राहुल गांधींनी भाजपाची चांगलीच गोची केली आहे. त्यांनी उठवलेल्या एकही मुद्द्याचे प्रतियुत्तर भाजपाकडे नाही. त्यामुळे भाजपाचे नेते बिथरले गेले आणि जीवे मारण्याची, डोक छाटून टाकायची धमकी देत आहे. यावरून काँग्रेसच्या विरोधकांकडे काँग्रेसला रोखण्यासाठी असे प्राणघातक हल्ले करणे हा एकच रस्ता आहे हे कळून येते. गांधींना रोखण्यासाठी, इंदीरांना रोखण्यासाठी, राजीवजींना रोखण्यासाठी असे ह्ल्ले विरोधकांनी केले होते. कारण वैचारिक मुद्द्यांनी रोखण्याची पात्रता विरोधकांच्या अंगी अजिबात नाही आहे. या नपुंसकतेच्या भावनेतून हल्ले झाले असे माझे ठाम मत आहे. काल भाजपाचे नेते असेच काही बरगळत होते. यावरून त्यांची आणि त्यांच्या पक्षाची लायकी काय आहे हे जगभरातील सुसंस्कृत लोकांना दिसून आली.
Pages