|| अक्कलकोट ||

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 20 February, 2016 - 12:13

चालली आरती
सळसळे वट
कृपेचा वर्षाव
देवाच्या दारात

काय हवे तुज
विचारते ज्योत
मागता येईना
विसरलो खंत

मागितले प्रेम
तयाच्या नामाचे
ज्ञान भक्ती अन
वैराग्य ते साचे

फुटावे अंकूर
बुद्धीला भाग्याचे
पानांतून यावे
आशिष प्रेमाचे

आणि काय हवे
ओढाळ मनाला
परत बोलावी
तुझिया पदाला

विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर -

तुमच्या मुळे सुचलेली कविता

माझे अवधुत स्वामी

कशाला मी कुठे जाऊ
देवळामध्ये त्यांना शोधू
ईथेच माझे स्वामी
जळीस्थळी त्यांना पाहू

कधी संकट येता
नाम स्मरण पहिले
धावूनच येती स्वामी
कित्येकांनी हे द्रुष्टांतले

असाबी निस्सीम भक्ती
नको उगाच अवडंब
स्वामींना नाही लागत
सोन्या चांदीचे तबक

उदी लावता त्यांची
कशी होते अनुभुती
दर्शने स्वामी मुर्ती
मनाची घडे शांती

अजानबाहू त्यांचे रूप
डोळ्यांमध्ये साठवून
भक्ती उरातून स्फुरे
मनामध्ये चित्र आठवून

भिऊ नको आहेत पाठी
समर्थ औदुंबर निवासी
ब्रम्हांड नायक योगी
माझे अवधुत स्वामी

धन्यवाद मुक्तेश्वर ,मंदार निधी विभाग्रज,,,मंदार त्यांच्या बद्दल लिहावसे वाटणे आणि सुचणे,,,,लिहले जाणे हा माझ्यासाठी तरी कृपेचाच भाग आहे .ती तुम्हालाही लाभली ,कविता वाचून आनंद झाला