फितुर

Submitted by हर्ट on 17 February, 2016 - 02:52

एक दोन दशकानंतर मी पुन्हा सिनेमा बघायला लागतो. जेंव्हा सिनेमे बघणे आपसुक सुटले होते तेंव्हा रंगीला, कुछ कुछ होता है, हम आपके है कौन हे सिनेमे बघितले होते. नंतर परदेशात आलो म्हणून असेल वा इतर जबाबदार्‍यांचे ओझे असेल मी अनेक सिनेमे असेच जाऊ दिले न बघता. कित्येक नवीन कलाकार मला दिसायला सारखेच वाटायचे आणि अजूनही नवीन कलाकार मला ओळखता येत नाही. गाणी तर एकही आठवत नाही. अजूनही आशिकीची गाणी गुंजतात आणि मेन हॉस्पिटलचा रस्ता आठवतो. त्याच्या भिंतीमागे टपर्‍यांची एक ओळ असायची आणि प्रत्येक टपरीवर अनुराधा पौडवाल गायची. बस! तिथेच सिनेमे बघणे संपले. अजूनही आशिकीची गाणी ऐकली की मन सुन्न होऊन जात आणि नवीन गाणी ऐकली की कान बंद करुन टाकावेसे वाटतात आणि नवीन हिरो होरोईन बघितले की नजर फिरवावी लागते. काहीच सापडत नाही. विरगुंळा हवा असतो पण तोही शोधावा लागतो आणि शोधता शोधता आपण थकतोही.

फितुर मी असाच जिवाला जरा तरी विरंगुळा हवा म्हणून रात्री ९ चे तिकिट काढले शुक्रवारी. जाहिराती इतक्या सुरु होत्या की खरा सिनेमा ९:३० ला सुरु झाला. तोवर लोकांच्या लाह्या खाणे, पेप्सी पिने सुरु होते. मधेमधे बटरचा नको तितका गंध नाकापाशी रेंगाळत होता. चायनीज, अमेरिकन, भारतिय जाहिराती बघून बघून न जमलेली फ्यूजन पाककृती चाखत असल्यासारखे वाटले. इतक्या सिनेमा सुरु झाला..

फितुर..

रात्रीची वेळ आहे आणि काळोखाच्या अस्तरावर बर्फाचे थर विखुरलेले आहेत. पाने गळून झाडावेलींच्या सापळ्यवर बर्फ थिजून झाड सुद्धा बर्फाचेच झाले आहे. पाचोळ्यांच्या पानांमधे बर्फ साचून जमीन धवलशुभ्र दिसत आहे. समोरचे हे दृश्य एखाद्या कवितेसारखे तरल आनंद देणारे वाटते.

खूप दिवसानंतर पडद्यावर अजन देवगण पाहतो आहे आणि 'तुमसे मिलने को जी करता है रे बाबा' हे गाणे आठवता आठवता 'ये हसी वादीया ये खुला आसमा' असे म्हणाणारी साडी नेसलेली मधु आणि तिचा गोरापान फुलासारखा छान नवरा स्वामी. त्याचे मरुम स्वेटर आणु नंतर मरुम स्वेटरमधे वावरणारे कॉलेज स्टुडन्टस. एकदम माझे जुने दिवस स्मरले. किती वर्षानंतर आपण भुतकाळात शिरतो आहे ह्याचे भान झाले. अजय देवगणची त्वचा जरड झाली आहे. त्याने ४० ची सीमा ओलांडली आहे. असा विचार करता करताच आपला चेहरा लपवून स्क्रीन वर न येताच नुसतीच डायलॉग म्हणणारी तब्बू. तिची बोलण्याची तर्‍हा इतकी वेगळी की ही तब्बूच आहे असे अधीर होऊन म्हणताना ती समोर येते आणि तीही प्रौढ दिसते पण अगदी हवीहवीशी तिची वेषभुषा आणि तिचे हावभाव बघून मन प्रसन्न होते. आठवतो तिचा नाच. कुठला तो सिनेमा नाव कधीच माहिती नव्हते पण 'रुक रुक रुक अरे बाबा रुक' म्हणणारी तबू आणि ही दोघीत किती तफावत.

सबंध सिनेमा किचकट वाटतो. काय चालले आहे ह्याची फार जुळवाजुळव करणे अवघड जाते. पण तरीही तब्बू मुळे हा सिनेमा प्रचंड आवडला आणि खास करुन कश्मिरमधले कोल्ड डेज. मला स्वतःला थंडी फार आवडते पण ती भावना गोठवत नाही तर ती भावनांना वितळवते. म्हणून आणखीच आवडते.

फितुर हा शब्द उच्चारला की 'चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ..' हे गाणे आठवते कारण ह्याच गाण्यात अशीही एक ओळ आहे - "सांग कशी तुजविनाच पार करू पुनवपूर ?
तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर !"

माझ्यासाठी ह्या सिनेमाचा कथा लिहिणे जरा जड आहे कारण कथा लिहिणे हे माझ्या लेखनक्षमतेत बसत नाही. पण हा सिनेमा मला मधेमधे फार आवडला. 'तबु' चे कधी 'तब्बू'चे तर कधी 'तॅबु'चे डायलॉग आणि अजय देवगणचे पुन्हा एकदा सिनेमात दिसणे आवडले. तो जेंव्हा सिनेमात आला होता तेंव्हा त्याच्या इतका दिसायला हलकाफुलका हिरो फक्त तोच होता. कत्रिना कैफचा हा मी पहिलाच सिनेमा पाहिला आहे आणि ती छान दिसते आणि छान बोलतेही. असो.

इति फितुर चित्रपट परिक्षण समाप्तम Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी,

खूप छान लिहिले आहे !!
फक्त चांदण्यात फिरताना मधले फितूर आणि हे शिर्षक फितुर ह्यात फरक आहे असे मला वाटते.
बेफी, डॉ. साहेब व इतर जाणकार मंडळी जरा प्रकाश टाकाल का हो ?
ह्या चित्रपटाचे शिर्षक फितुर हा उर्दु शब्द असुन त्याचा अर्थ बहुदा obsession,madness किंवा अगदी Unsoundness of intellect or mind अश्या अर्थी पण वापरतात.
भटांनी "तुज वारा छळवादी अन्‌ हे तारे फितूर" हे ह्या अर्थी नक्कीच वापरले नसेल असे वाटते. फार फार तर त्याचा अर्थ दगाबाज असा होउ शकेल, पण तो ही अगदी लाडिकपणे घ्यावा Wink

कतरीना आवडली ना? झालं तर मग. पैसे वसूल. आता जरा दुसर्‍याही नवीन नट-नट्यांचे पिक्चर बघा. नजर फिरवावीशी वाट्णार नाही.
अगदीच आशिकीच्या काळात आहात अजुनही हे वाचुन जरा आश्चर्य वाटले.
बादवे, राहुल रॉय, अनु अगरवाल आवडते आहेत का?
अजय देवगण बद्दल चांगलं लिहिलंय की वाइट काही कळत नाहीये. एकुण तो पॅरॅग्राफच डोक्यावरुन गेलाय.
तसंच ते तबु, तब्बु आणि तॅबु बद्दल.

<<<<तो जेंव्हा सिनेमात आला होता तेंव्हा त्याच्या इतका दिसायला हलकाफुलका हिरो फक्त तोच होता.>>>> इथे कर माझे जुळती.

सस्मित, मलाही तू काय लिहिले ते फार कळले नाही Happy

आमच्यावेळी अजय देवगणला टुकार हिरो समजले जायचे पण नंतर त्याच्या अभिनयाने तो हिट ठरत गेला.

आमच्यावेळी तब्बुला काहीजण फक्त तबू म्हणायचे, काहीजण तब्बु असा ब ला ब लावून उच्चार करायचे, तर काहीजण थोडे वेस्टर्न स्टाईल टॅबु म्हणायचे. आले का लक्षात आता Happy

फितूरचे दोन्ही अर्थ ह्या सिनेमाला लागू पडतातः

१) तब्बूचा प्रियकर तिच्याशी प्रतारणा करतो म्हणून तो फितूर ठरतो.
२) कतरिनाच्या प्रियकराला बालपणापासून कतरिनाचे वेड दाखवले आहे. ती त्याला हवीच असते. तो तिला विसरत नाही. म्हणून तोही फितूर ठरतो.
आणखी एक तिसरा अर्थ सुद्धा लावता येईल.
३) तब्बूला आपल्या मुलीला सुद्धा कुणी धोका देईन म्हणून ती कतरिनाला लंडनला पाठवते आणि तिचे लग्न एका श्रीमंत मुलाशी लावायचा प्लान करते. तिला एक भय (ऑबसेशन) असते की कतरिनाचा प्रियकर आपल्या लेकीशी प्रतारणा करेन. म्हणून हिडन मीनींग ह्या अर्थी हाही एक अर्थ आपण लावू शकतो.

आले का लक्षात आता तरी ::)

बादवे, राहूल रॉय आणि अनु अगरवाला मुळीच आवडलेले नाहीत Happy आशिकी फक्त गाण्यांसाठी चांगला आहे.

हो अमरावतीला पाहिला होता पहिला घायला. आवडला होता.

त्यानंतर मीनाक्षीचा दामिनी पाहिला होता पण तिच्या इतकीच दिव्या भारतीही आवडली होती. आमच्या रुममधे तिचे अनेक पोस्टर्से चिकटवले होते Happy क्रेझी होते ते दिवस. माधुरीचे एक पुरुषभर उंचीचे पोस्टर लावले होते आम्ही. जुहीचे होते. आयशाचेही होते.. Happy

अजूनही आशिकीची गाणी ऐकली की मन सुन्न होऊन जातं आणि नवीन गाणी ऐकली की कान बंद करुन टाकावेसे वाटतात >>> कुमार सानु ची गाणी आवडली होती? बरं !!!!! (त्यातल्या त्यांची आशिकीची बरी होती म्हणा)

नविन गाणी पण खुप छान आहेत. क्लासीकल बेसची आहेत, उच्च मिनिंगफुल लिरिक्स असलेली आहेत, खुप टॅलेंटेड गायका/गायिका आहेत. पुर्वी सुद्धा दोन दर्जांची गाणी असायची तशीच आताही असतात. तेव्हा पण 'ट' दर्जाची गाणी असायचीच की. 'पुर्वी आणि आता' हा मेंटल ब्लॉक काढुन ऐकली तर कित्येक सुंदर गाणी ऐकायला मिळतील. मला सांगा मी लिस्ट करुन देते. Happy

नविन गाणी पण खुप छान आहेत. क्लासीकल बेसची आहेत, उच्च मिनिंगफुल लिरिक्स असलेली आहेत, खुप टॅलेंटेड गायका/गायिका आहेत. >>

संगीतकार आहेत का धड एकतरी हल्ली बॉलीवुडमधे Happy सगळे काही संगीतकारावर अलवंबून असते. रियाज असतो का गायकांचा हल्ली पुर्वीसारखा. तबला पेटीची साथ असते का गाण्याला की सगळे काही ई-वाद्यांवर बसवलेले गाणे असते .

आत्ताच्या गायकांशी जर तुलना केली तर कुमार सानु नक्की चांगला गायक म्ह्णावा. आशिकी मधे भावपुर्ण गाणी आणि संगीत होते.

माधुरीचे एक पुरुषभर उंचीचे पोस्टर लावले होते आम्ही>>> पुरुषभर हा शब्द चुकीचा वाटला इकडे.. बाईभर बरोबर वाटतोय Wink

कुमार सानु आदर्श असेल तर मग तुलनाच नको. Proud कारण तुमचा आदर्श गायक माझ्या लिस्टमधे ऑल मोस्ट शेवटच्या ३-४ मधे बसतो.

ऐकाहो गाणी. पुष्कळ टॅलेंटेड संगितकार आहेत. नविन सगळ्याच नाही पण काही गायकांची गायकी ऐका. रियाझ केल्याशिवाय इतकं तयारीने गावु शकतील का?

अहो प्रत्येक पिढी ही वेगळी असते. तुमच्या पिढीत जे होते तेच चांगले आणि आताच्या पिढीत जे आहे ते वाईट असा आग्रह का धरत आहात?

मनिमाऊ, माझ्यावेळी जे गायक आणि संगीतकार होते ते अजरामर आहेत. कुमार शानू आशिकीमधे आवडला का असा तुझा प्रश्न होता मी त्याचे उत्तर दिले. तो आदर्श गायक वगैरे नाही पण हल्लीच्या गायकांच्या तुलनेनी त्याची गाणी मला भावपुर्ण वाटतात आणि अजून लक्षात आहेत त्याची गाणी. हल्लीची गाणी हिट अशी होतच नाही. ती आपल्यापर्यंत पोचत नाही. पुर्वी ट्यून वाजली की गाणी कळायची.

ल्लीची गाणी हिट अशी होतच नाही. ती आपल्यापर्यंत पोचत नाही. पुर्वी ट्यून वाजली की गाणी कळायची.>>>>>>>>. कारण मुळातच गाण्याच पीक कमी येत होत.जे येत होत ते ठरावीक गायक्/गायिकांच्या गळ्यातुन येत होत.आताशा स्पर्धा वाढली आहे,,बर्याच नवीन लोकांना स्कोप मिळतो आहे.बर्याच वेगळ्या पदधतीची आनि वेगळ्या धाटणीची गाणी तयार होत आहेत.आपला कान त्या त्या काळाला साठी ओपन ठेवला तर नवीन गाणीही बरीच्च्च चांगली आहेत. Happy

नाही अंकु, चांगली गाणी आपल्यापर्यंत पोहचतातच. देवदास मी सिंगापुर मधेच पाहिला कारण त्या सिनेमाची गाणी इथे पोहचली होती. स्पर्धा तेंव्हाही होती. आशा लता ह्यांनाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्यांच्यावेळी उलट प्रश्न अजून बिकट होता. गाण्यांचा आपल्याकडे फार मोठा डेटाबेस नव्हता तेंव्हा अनुकरण करुन जरी गायचे म्हंटले तर ते शक्य होत नसे. त्यावेळी शास्त्रिय संगीत होते पण खयाल वगैरे हिन्दी सिनेमाला उपयोगी नव्हते. मी तर म्हणेल आत्ताच्या तुलनेनी लताआशा रफी मुकेश ह्यांचा जमाना खूप बिकट होता. ही लोक क्लासिकल बेस गाणी का नाही आणत सिनेमात? दरवेळी नाकात आणि झोपेत स्वप्नात गायल्यासारखे का गातात? कसले भकंस सडकछाप कर्णककश्श संगीत असते!! मी पिढीबद्दल नाही म्हणत आहे मी फक्त आजच्या संगीताबद्दल इथे लिहित आहे.

बी, तुम्ही कित्तीतरी वर्षांनी सिनेमे पहायला सुरूवात केलीत हीच छान गोष्ट वाटत्येय मला.
अजय देवगणमुळे का होऊना पण तुम्ही स्वतःच्या तरूणपणीच्या जीवनात रमलात ही सुद्धा छानच गोष्ट आहे.
आपण भूतकाळात रममाण होऊन जगू शकत नाही, वर्तमानातील जीवनाचा आस्वादही घ्यायला हवा.

१-२ दशकांनी तुम्ही सिनेमा पाहिल्याने आनंदित झालात आणि तो आनंद आमच्याशी वाटून घेतलात म्हणून धन्यवाद!

ममा, कुमार सानु ने बरीच चांगली गाणी दिली आहेत. मला आवडतो त्याचा आवाज आणि गाणी पण.

बी, जुने आणि नवे तुलना केलीत तर काहीच आवडणार् नाही. आताही बरीच सुंदर गाणी आहेत. गायक गायिका संगीतकार आहेत. तुम्हाला आवडो न आवडो. पण आहेत.

मला तर अगदी
मेल सिंगर मधे-
सैगल-मुकेश-किशोर-रफी-जगजीत सिंग-यशुदास-कुमार सानु-सोनु निगम-ए आर रहमान-हरीहरन-शंकर महदेवन
बरोबर
नुसरत फतेह अली-राहत फतेह अली-मोहित चौहान-अंकित तिवारी-अतिफ असलम-अर्जित सिंग-हनी सिंग-हिमेश रेश्मिया यांचीही

फीमेल सिंगर - गीता-लता-आशा-उषा-सुमन-अनुराधा-अलका-कविता-साधना-उषा उथ्हप-श्रेया-सुनिधी-चित्रा
बरोबर
रागेश्वरी-रीचा-तुलसी कुमार-मोनाली ठाकुर यांचीही
गाणी आवडतात. Happy
(कुणी राहिला/राहिली का? Happy

संगीतकारांचं पण असंच. आता लिहित नाही.

सस्मित, रेखा भारद्वाज ( कबिरा मान जा, इकतारा ) आणि सोना मोहापात्रा ( तलाश - जिया लागे ना) ही दोन नावं लिहायला हवीत. बी क्लासिकल बेस गाण्याबद्दल बोलताहेत तर त्यांनी ही गाणी ऐकायला हवीत.

अंकु + १

शक्य असल्यास तूनळीची लिंक पण द्या Happy नक्की ऐकेन.

धन्यवाद..

सर्व अभिप्राय आवडले. तुमच्या बहुमुल्य वेळेबद्दल मनापासून आभार Happy

रुक रुक रुक गाणं >>>>> पिकचरः विजयपथ

मराठी फितुर आणि हिंदी मधल्या फितुरचा अर्थ वेगळा आहे ना?

Pages