परवा चायनीज दुकानात गेलो. एका ठिकाणी गोठवलेल्या ताज्या तिसर्यांचे पाकीट दिसले. नेटवर मिळालेली सोप्पी पाककृती आणि मी केलेले बदल पुढीलप्रमाणे.. उत्तम झाल्या चवीला.. सोबत चित्र देत आहे..
पाककृती मधे सुका/सुके इत्यादी शब्द हे तयार होणार्या पदार्थाचे विशेषण आहे.. मुळ तिसर्या ताज्या न वाळवलेल्या आहेत...
१. एक पाकीट तिसर्या.
२. १ मोठा कांदा बारीक कापून.
३. काद्यांएवढे खोबरे (ओला नारळ).
४. १ टीस्पून तिखट.
५. १/२ टीस्पून हळद.
६. चवीला मीठ.
७. एक टेबलस्पून कोकम आगळ
८. १ टीस्पून मालवणी मसाला..
९. १ ते १/२ टेबलस्पून तेल.
तिसर्यांचे पाकीट उघडून ४/५ तास ठेवा म्हणजे त्या सर्वसाधारण तापमानाला येतील.
त्यातले सगळे पाणी काढून टाका. मी पेपर टॉवेल वापरून कोरड्या करून घेतल्या.
तेलावर कांदा परता. अर्धवट शिजला की त्यात खोबरे टाकून दोन्ही थोडे तपकीरी होईपर्यंत परता.
आता त्यात तिसर्या टाकून ३ ते ४ मिनिटे परता (मी घेतलेल्या आधीच शिजलेल्या होत्या त्यामुळे खूप वेळ शिजवल्यास रबरी होतील).
उरलेले जिन्नस टाकून १ ते २ मिनिटे ढवळून घ्या आणि लगेच खा...
मालवणी मसाल्याची पाककृती दिसली.. नसेल तर गरम मसाला घालता येईल.
नाही हो.. तिसर्यांचे थोडेफार
नाही हो.. तिसर्यांचे थोडेफार पोलिसांसारखे आहे.. तुम्ही कधी कुणाला पोलिसांनी 1st Degree किंवा 2nd Degree दाखवल्याचे वाचलेय्/ऐकलेय का? नाही.. सरळ 3rd Degree दाखवतात..
..
किंवा भूमिती बघा..
आकृतीबंध १ किंवा दोन रेषानी होऊ शकतो का? नाही... त्रिकोण हा पहिला आकॄतीबंध.. तश्या तिसर्याच. पहिल्या किंवा दुसर्या नाहीतच...
पहिला,दुसरा म्हणजे शिपल्याचे
पहिला,दुसरा म्हणजे शिपल्याचे दोन भाग असतिल, दोन्ही भाग काढुन झाल्यावर आत जे काय दिसत ते तिसर्या !!>>
साॅरी प्राजक्ता पण हसणं कंट्रोलच नाही होत आहे.
अगं, त्याचं नावच तिसर्या आहे.
सध्या खुप जास्त पडल्यात
सध्या खुप जास्त पडल्यात तिसर्या. दरवेळी एकशिपी खाऊन कंटाळाच आलाय. त्यामुळे करुन बघेन ही रेसिपी.
मस्तच .. देसायांनु.. आजच
मस्तच ..
देसायांनु.. आजच खाडीतल्या ३०ऱ्या होत्या घरी..
पहिल्या किंवा दुसर्या
पहिल्या किंवा दुसर्या नाहीतच... >>> अरेरे! तिसर्या खात नाही तेव्हा दुसर्या घेतल्या तर चालतील का असं विचारणार होते
बरं मग ब्याडवर्डटाटे घालू म्हणता?
गोगा भारी स्पष्टीकरण
गोगा भारी स्पष्टीकरण
गोगा! स्पश्टिकरण लय भारी,
गोगा! स्पश्टिकरण लय भारी, निधी सॉरी काय त्यात?
आम्हाला मास्याविषयी तेवढच माहिती आहे जेवढ त्याला आमच्याबद्दल!
तिसर्^या, दश्या एकदम धमाल.
तिसर्^या, दश्या एकदम धमाल. मला आवडत नाहीत तिसर्^या पण इकडच्या स्वारीसाठी चायनीज दुकानात शोधल्या पाहिजेत. मला वाटतं फ्रेश पण मिळतात, काचेआडून पाहिल्यासारखं वाटतं पण साफ करणे वगैरे माहित नाही. माझी आज्जी तिसर्^या फॅन होती.
वाह, मस्तंच आहे रेसिपी
वाह, मस्तंच आहे रेसिपी
मस्त दिसतेय. चव कशी असते
मस्त दिसतेय. चव कशी असते तिसर्यांची ? असे तयार सोललेले मिळाले तर करुन बघायला आवडेल.
प्राजक्ता, तुझं लॉजिक भारीच
प्राजक्ता, तुझं लॉजिक भारीच एकदम. पटकन पटलं. आणि गोगांचे स्पष्टीकरण पण मस्त ! तिसर्या तर कधी खाणार नाही पण बाकी अशी माहिती वाचायला मजा आली.
आम्ही शिंपल्या आधी स्वच्छ
आम्ही शिंपल्या आधी स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतो. अगदी जरास म्हणजे पाव वाटी पेक्षा कमी पाणी घालून ५ मिनिटे किंवा त्या उघडेपर्यंत उकडतो. ताज्या शिंपल्या शिजल्या कि उघडतात. खराब उघडत नाहीत त्या फेकून द्यायच्या. उघडलेल्या शिम्पल्यातले गोळे काढून घ्यायचे. खाली जे पांढुरके पाणी राहते ते पण चाळणीने (चहासाठी वापरतो तशी, पण चहाची वापरू नये) गळून घेतो कारण त्यात वाळू असते. ते पाणी अजिबात फेकायचे नाही कारण सगळी चव त्यातच असते. वाफवलेले गोळे मसाल्यात मंद आचेवर फक्त ४-५ मिनिटे शिजवावेत, नाहीतर वातड होतील.
त्यामुळे तुम्ही जे म्हटलंय पाणी फेकून दिले ते खटकल.
सुख्या शिंपल्या बनवताना
सुख्या शिंपल्या बनवताना बर्फाबरोबर आलेलं पाणी घातलं तर त्या 'पचपचित' होतात. तेव्हा या पाककृतीत पाणी अजिबात ठेवायचे नाही.
शिंपल्यांचे पाणी स्वयंपाकात वापरतात हे बरोबर आहे...
Pages