CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN : Pink Chaddi Campaign!!!!

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

CONSORTIUM OF PUBGOING, LOOSE AND FORWARD WOMEN

What is the Pink Chaddi Campaign?

The Pink Chaddi Campaign kicked off on 5 February 2009 to oppose the Sri Ram Sena. The campaign is growing exponentially (4,500 at this point in the life of our Consortium of Pub-going, Loose and Forward Women) and that is not surprising. Most women in this country have enough curbs on their lives without a whole new franchise cashing in with their bully-boy tactics. Of course, a lot of men have joined the group as well.

Here is we want to do with the Pink Chaddi Campaign. Join in. Be imaginative, have fun and fight back ......

read more: http://thepinkchaddicampaign.blogspot.com/
(i say send it to shiv sena, ABVP and all those who think they can decide how women should behave in Indian culture!!!)

प्रकार: 

बाप रे! आता वेगवेगळ्या रंगाच्या येणार मग. Happy
मृ, मग तू राणी कलरची पाठवू नको. सुप्रिया, तुला कसला रंग पाहिजे?

केदार,
ही बातमी खरी आहे.

New Delhi: In a bid to counter the ‘Pink Chaddi Campaign', Sri Ram Sene chief Pramod Muthalik has announced to exchange Pink Chaddis (Pink Panties) with sarees.

Talking to reporters, Muthalik said that the organisation will give sarees to those sisters who will gift them pink undergarments on Valentine Day.

Pramod Mutalik has rubbished the alleged pink chaddi campaign by pubgoers, and said that it is a tactic to shy away from the core issue of Indian culture.

The radical Hindu outfit has collected more than 900 sarees in this regard.

Earlier, a group of pubgoers have launched a ‘Pink Chaddi Campaign', in which they will gift a bagful of ‘Pink undergarments' to Sri Ram Sene chief Pramod Muthalik on Valentine Day.

It is 'Gandhigiri' with a difference for over 3,000 people, who have joined 'The Pink Chaddi Campaign' to send what else but bagful of pink undergarments to the office of the Mangalore pub attack masterminds Sri Ram Sene on February 14.

The campaign which started as a group on Facebook on February 5 by a young woman journalist has already enrolled more than 3000 members with many more circulating mails asking people to donate pink underwear to various temporary offices set up in different cities or to send the material directly to Sri Ram Sene office.

"I just could not believe seeing those men attack women so mercilessly. We had to respond in some way or the other because if we don't, then these guys will win. Pink chaddis are nothing but a metaphor to how disgusting they are," Nisha Susan, a journalist with news portal, said..

Nisha, who has also set up a blog with relevant contact details, claimed she has already collected over 500 pink undergarments.

She further said, "It is not the numbers that matter but the act itself. There is one woman who called up and told me that she has bought 100 of them dirt cheap in the market. One of my friend's mom too called up and said she will check out her wardrobe and collect as many as possible."

Incidentally, the group claims itself to be 'A Consortium of Pub-going and Forward Women.'

तुझी कल्पना झकास. Happy खरंच असं करता येईल आपल्याला.

बाकी या साड्या खादीच्या आहेत.. Happy

***
दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

आयला.

हे बघा http://exchangeyourchaddiforsadi.blogspot.com/

मी ब्लॉग सुरु केला आहे. आता तिथे डिटेल टाकतो. कोण कोण येतयं मदतीला. काही गरिबांना साड्या तरी मिळतील.

चला, आता खादीग्रामोद्योगवाल्यांना धंदा मिळेल!

पण ह्या सगळ्यांत मला एक कळलं नाही की हा फक्त बायकांचा प्रश्न कसा बनतो .. त्या सेनेच्या गुंडांनी तर पबमधल्या मुलं मुली, दोघांवरही हल्ला केला ना? मग बायकाच का फक्त पेटून उठल्या आहेत?

सशल, हो का? मी जी बातमी वाचली त्यात मुलींबद्दलच लिहिलं होतं.

पण आता ही बातमी वाचा.
(त्या साड्या 'माहेरच्या साड्या' ठरणार तर!) Happy

मी बहुदा चुकीचं वाचलं .. sorry!

मला ही चळवळ आवडली. खाकी चड्डी हे समाजाच्या मोठ्या वर्गात हिंदू मूलतत्त्ववादाचे प्रतीक मानले जाते (ते योग्य/अयोग्य हा मुद्दा नाही, पण ते तसे मानले जाते). तेव्हा चड्डीला महत्त्व आहे. गुलाबी रंग कारण तो 'बायकी' रंग मानला जातो, शिवाय व्हॅलेन्टाईन दिन, ज्या दिवशी हे लोक परत गोंधळ घालतात. तेव्हा त्या सेनेला गुलाबी चड्डी पाठवणे हे मला अतिशय सूचक वाटते.
.
आता हा प्रकार यापुरताच मर्यादित न रहावा हे मान्य. पण निदान हे केल्याने सेनेपर्यंत आणि इतर जनसामान्यांपर्यंत तरूणवर्गाच्या भावना/मत पोहोचतात आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्वरित व चमकदार पद्धतीने पोहोचतात. या गोष्टीस महत्त्व असतेच. तात्विक व सखोल विचार व्हावाच, त्याचबरोबर असे मार्ग अवलंबले तर परिणाम लवकर होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः इथे मुख्यत्वे तरूणवर्गाला आकृष्ट करण्याचा उद्देश असल्याने चळवळीच्या परिणामकारकतेच्या दृष्टीने मला हे योग्य वाटते.
.
आता राहिला ते कपडे वाया जाण्याचा प्रश्न... त्याची जर काळजी करायची असेल तर ती नंतर करावी असे मला वाटते. 'संस्कृतीच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला येणे' या मुद्द्यासाठी चळवळ सुरू असताना 'गरजूंना मदत' या उद्देशासाठी तिचा उपयोग करणे मला दोन कारणांसाठी अनुचित वाटते - एक म्हणजे तसे करून आपण मूळ उद्देशापासून फोकस दूर न्यायला अभावितपणे मदत करत आहोत (road to hell is paved with good intentions) आणि दुसरे म्हणजे दुसर्‍या कोणाची कल्पना, चळवळ यांचा आपण परस्पररित्याच आपल्या उद्देशासाठी वापर करत आहोत (मग तो उद्देश कितीही भला का असेना). जर आपण या चळवळीकडे तात्त्विक वा नैतिक नजरेने बघणार असू तर ही २ कारणे फार महत्त्वाची ठरतात.

    ***
    ... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !

    स्लार्टी तुझा तिसरा मुद्दा मान्य पण एक प्रश्न आता मला पडलाय म्हणून स्पष्टपणे विचारतो कारण नैतिकता म्हणत आहेस तर त्याचा संबंध मी पाहिलेल्या व अनुभवत असलेल्या भारतीय संस्कृतीत येतो. ( हा शब्द विचार करुन योजला आहे. Happy

    नैतिक नजरेने बघणार >>

    पिंक चड्डी की मधली असणार की बाहेरची? इतका वेळ मी तरी मधली असनार हे गॄहीत धरत होतो. कारण नुसतेच चड्डी असे लिहील्यामुळे माझे गॄहीतक चूक होत नाही. व तू ज्या नैतीक नजरेने म्हणतोस, त्याच नैतीक नजरेने मी पाहीलेल्या भारतीय संस्कृतीत अजुन तरी कोणी स्त्रीच्या* अडंरगारमेंट्स (चड्ड्या) भेट देत नाहीत.
    मग तरी द्याव्या का? मी पाहिलेल्या संस्कॄतीमूळेच पिंक अडंरवेअर भेट देउ नये असे वाटते. ( कोणी देणार असेल तर माझी काहीच हरकत नाही. Happy )

    * स्त्री लिहीले कारण तू गुलाबी रंग स्त्रियांचा ह्याचा उल्लेख केला आहेस.खाकी चड्डी हे प्रतिक संघाचे आहे. ते त्यांनी मेहनत घेऊन रुजविले आहे.

    हे गृहीतक चूकीचे असले तर मी तो ब्लॉग डिलीटतो कारण मग खरच ते नैतीक होणार नाही. आणि निदान मी तरी गोष्टी नैतीक असन्यावर भर देतो. ऑफकोर्स कपडे वाया गेले तर त्याचे मला काही वाटनार नाही. पण ते दुसर्‍यांना मिळतील हा विचार मात्र मीच लिहीला.

    (त टी. वरिल वाक्य हे शब्दछल नाहीत तर तू नैतीक, तात्विक लिहील्यामूळे प्रामाणिकपणे विचारले एवढेच. नाहीतर इतकावेळ मम ठेवले होते. आणि चड्डी चळवळ हा विषयच मी निर्मान केलेला नाही, त्यामूळे मी इथे हा प्रश्न विचारला त्याबद्दल उगीच माझ्याबद्दल गैरसमज निर्मान करुन घेऊ नयेत. Happy )

    काहीतरीच! आणि बायकांवर हात उचलणार्‍यांना चड्ड्या कशाला द्यायच्या? पिंक बांगड्या दिल्या तरी चालतील.

    पिंक बांगड्या दिल्या तरी चालतील >> अनुमोदन. पण दिल्या नाही, भरल्या तर. Happy तिथे एक टोळी उभी करुन, झाला वाद की धर त्याला नि भर बांगड्या असे करावे, मग मारामारी झाली तर जनतेचे व पर्यायाने पोलीसांचे पाठबळ हे त्या सेनेला विरोध करनार्‍यांच्या बाजूने होईल. मी तर म्हणेन की पब मध्ये जाणार्‍या भगिनींनी तिथे थांबून हे करावे. आमचे स्वातंत्र्य जात आहे म्हणत आहात तर ते स्वातंत्र्य प्राप्त पण करुन घ्यायला स्वत: काहीतरी करावे. (काहीतरी नाही.)

    चड्डीला, ते ही बायकांचा, हात घातल्यामूळे मासेस मध्ये ह्या चळवळीला (ह्याला चळवळ हा शब्द देणे योग्य नाही) काही पाठिंबा असेल का? ह्याची मला शंकाच वाटते, कारण वर लिहील्याप्रमाने कोणी सहज भेट म्हणून स्वतःच्या आया-बहिनींना चड्या वा ब्रा देत नाहीत.

    टायटल सारखेच उपहासात्मक म्हणूनही चड्डी भेट देण्याइतका भारतीय समाज (संस्कॄती नाही) पुढे गेलेला नाही. चूकीचा पायडां पडतोय.

    आपल्या समाजात स्त्रीची चड्डी भेट देणे ही नैतीक गोष्ट आहे का? हा प्रश्न पडला.

    केदार, सर्वप्रथम म्हणजे >>>'म्हणून हे साधन माझ्यासाठी तात्विक दृष्ट्या योग्य नाही.' <<< हे तुझ्याच एका पोस्टात होते, त्यामुळे मी तसा विचार मांडला आहे.
    परत एकदा, भारतीय संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण हा पिंकचड्डीवाल्यांचा मुद्दा नाहीये असे मला वाटते. >>>"Most women in this country have enough curbs on their lives without a whole new franchise cashing in with their bully-boy tactics"<<< तेव्हा त्यांनी 'भारतीय संस्कृतीत स्त्रीया काय घालतात, काय भेट देतात' याचे विचार करण्याचे कारण काय ? त्यांचा मुद्दा त्यांच्या स्वातंत्र्यावर आलेला घाला हा आहे. तेव्हा पिंकचड्डीवाले 'संस्कृतीरक्षणा'साठी करत आहेत हे तुझे गृहितक चुकीचे आहे. अर्थात, 'ही भेट देणे हे संस्कृतीविरोधी आहे' अशी बोंब मारूनसुद्धा आपण त्यांच्या उद्देशापासून लक्ष विचलित करू शकतो.
    तात्या, काहीतरी करायला पाहिजे (काहीतरीच नव्हे) हे मान्य. पण ही 'सहज भेट' नव्हे. किंबहुना, अशी भेट देणे हे संस्कृतीरक्षकांना किती झोंबू शकते याचा अंदाज असल्यानेच अशी भेट देण्यात येत आहे. दुसरा मुद्दा यात सहभागी असलेले लोक अंतर्वस्त्रांबाबत तुमच्यासारखाच विचार करतील असेही नाही. तुम्ही जी संस्कृती म्हणत आहात, त्याच समाजाचा भाग असलेल्या अनेक लोकांचा अनेक गोष्टींबाबतचा दृष्टीकोन बदलला आहे.
    विरोध कायद्याच्या चौकटीत असावा हा आग्रह मान्य, पण तो संस्कृतीसंमत पद्धतीनेच व्हायला पाहिजे या आग्रहाचे कारण मात्र कळत नाही.
    शेवटी... चड्डी भेट देणे हे 'अनैतिक' कसे होते हो ? ते भारतात रूढ नाही, शिष्टसंमत नाही, संस्कृतीला धरून नाही हे मान्य, पण ते अनैतिक मुळीच नव्हे (भारतात नवर्‍याला एकेरीने हाक मारणे, मद्यपान करणे, इ. गोष्टी वरील तीनपैकी नाहीत, पण म्हणून त्या अनैतिक होत नाहीत).
    अरे हो, चळवळ शब्द खटकणे समजू शकतो. मलाही खटकला सुरुवातीला, पण नंतर तो नक्की का खटकतोय याची मला सापडलेली कारणे मलाच न पटल्यामुळे तो राहू दिला आहे.

      ***
      ... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !

      हे वाचा..

      गुलाबी चड्ड्यांचा परिणाम..

      http://www.dnaindia.com/report.asp?newsid=1229995

      ***
      दिखला दे ठेंगा इन सबको जो उडना ना जाने...

      धन्य आहे! टायटल मधला उपहास काय, चड्डी मधली नैतिकता काय, गुलाबी रंगाचा संदर्भ काय, तरूणवर्गाला आकृष्ट करणे काय, त्यावर नविन ब्लॉग काय आणि आणखिन काय.. ज्याचा मूळ पायाच ठीसूळ आहे त्या गोष्टीवर इतकं बौध्धीक वाया..? वाह! economy slowdon is a funyy thing they say... I am convienced!!!
      जे "रामनाम" आपल्या संस्क्रूतीत पावित्र्य, त्याग, कर्तव्य, मोक्ष, पराक्रम याचं प्रतिक आहे आज ते नाव अशा कुठल्या चड्डी "वळवळीशी" जोडल जातंय हे ज्यांन्ना उन्नत, प्रगत अन बौद्धिकतेचं लक्षण वाटतय देव त्यांचं भलं करो.

      पेशव्या, आणि above all तू तुझ्या रंगीबेरंगी वर या गोष्टीचा उल्लेख करावास..? अवधूत गुप्ते च्या भाषेत मित्रा "तोडलस" .. Sad

      पिंकचड्डीवाले 'संस्कृतीरक्षणा'साठी करत आहेत हे तुझे गृहितक चुकीचे आहे >>

      प्ल्च. प्ल्च स्लार्टी हे माझे गृहीतक नाही. एका पोस्ट मध्ये तर मी, "कारण त्यात सेनेनी 'भारतीय संस्कॄती' की काय ते उगीच आणले आहे." हे देखील लिहीले आहे वर आणि तुला उत्तर दिलेल्या नैतीक पोस्ट मध्ये देखील मी संस्कॄती रक्षणाची जबाबदारी घेतली नाही. मला काय नैतीक वाटले ते लिहीले. तू भलतच काहीतरी आता माझ्यावर लादतोयस. Happy

      अर्थात, 'ही भेट देणे हे संस्कृतीविरोधी आहे' अशी बोंब मारूनसुद्धा आपण त्यांच्या उद्देशापासून लक्ष विचलित करू शकतो. >>> हम्म. मी बोंब अजुन मारली नाही, इथे फक्त लिहीले, त्याचा प्रचार, प्रसार अजुनतरी केलेला नाही. ( एक ब्लॉग टाकला आहे पण आंतरजालावर मायबोली व्यक्तीरिक्त त्याची कोणी दखल घेतली असेल असे मला वाटत नाही).

      इथे आपले मत मांडने = त्यांचा लक्षाला विचलीत करणे वा बोंब मारणे हे आहे काय? हा पायंडा चु़कीचा मला का वाटला हे लिहीले अनेक गोष्टींवर आपण जसे मत देतो, तसे ह्याही बाबतीत लिहीले. ह्यात काही चुकले असे (अजुनही) वाटत नाही, पण जर ती बोंब असेल तर नक्कीच मी आधी माघार घेतो.

      शेवटी नैतीकता ग्रेटर गूड मध्ये असते असे वाटते. जर आज चड्ड्या देण्यानी काम साधत असेल (ती लिंक) तर ते उद्या चड्ड्या काढून हिंडल्यावरही (कश्याचा तरी निषेध वा गौरव म्हणून Happy ) साधू शकते नाही का? त्यासाठी ओव्हरऑल संस्कृतीला मी मध्ये आणत नाही.

      हे संस्कृतीरक्षकांना किती झोंबू शकते >> ते संस्कृतीरक्षक आहेत असे तुला वाटते का?

      एक लक्षात घे की मी त्या सेनेचा नाही. त्यांनी अयोग्य केले आहे ह्याबद्दल दुमत नाहीच.

      economy slowdon is a funyy thing they say... I am convienced >> च्यायला योग, तुला इतका वेळ लागला. Happy अरे मायबोलीच्या आणि इतर आतंरजालिय मराठी साईटांच्या पोस्टीवरुन तो अंदाज आधीच आला.

      केदार, तू सेनेचा नाहीस असे मला मुळीच वाटत नाही. तू त्यांचे समर्थन कुठेही केले नाहीयेस आणि स्पष्ट विरोधच केला आहेस हेही मी जाणतो. मी तुझ्यावर कुठलेही विधान लादत नाहीये, पण एकीकडे संस्कृतीला तू मध्ये आणत नाहीस असे म्हणतोस आणि मग >>> मी पाहिलेल्या संस्कॄतीमूळेच पिंक अडंरवेअर भेट देउ नये असे वाटते<<< हेही विधान तुझेच आहे. मग इथेतरी संस्कृतीला आणायची गरज काय ? चड्डीवाले हे जर मुळातच संस्कृतीसाठी मैदानात आलेले नाहीत तर त्यांनी त्या मैदानात 'लढताना' मात्र संस्कृती पाळावी (अंडरवेअर भेट देउ नये) ही अपेक्षा करावी का ? हा विचार आपण स्वतःशी करावा.
      इथे आपले मत मांडणे = लक्षाला विचलित करणे आहे की नाही हेही आपले आपणच ठरवावे.
      तू बोंब मारत नाहीयेस आणि मारणारही नाहीस, पण लवकरच ते विविध प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होईल अशी भीतीही मला वाटते. त्याला आपल्याकडून कोणतीच निमित्तमात्र बत्ती लागू नये असे मला वाटते. त्यामुळे ते लिहिले आहे.
      संस्कृतीरक्षक म्हणजे श्रीरामसेनेची लोक... ते मी त्यांना उपहासाने म्हणालो. ते फक्त भक्षक आहेत. संस्कृतीची चाड असणे फार सोपे व सहज आहे, नैतिकतेची चाड असणे हे तसे नव्हे.
      .
      योग, कुठल्या गोष्टी ठिसूळ आहेत याविषयी तुझी मते मला अत्यंत वस्तुनिष्ठ वाटतात - ज्यात तुला रस तेच भरीव. इथे केलेली आर्थिक मंदी, इतरांची प्रगल्भता, बुद्धीमत्ता, ठिसूळ पाया, वाया बौद्धिके, कोणाला काय महत्त्वाचे वाटावे यांवरची सबगोलंकार विधाने सारेगम बाफवरही केली असशील अशी आशा करतो, म्हणजे इथे जे आहे त्याला निव्वळ औद्धत्य न म्हणता निखळ प्रामाणिकपणा म्हणता येईल.

        ***
        ... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !

        स्ला, व्वा!!! Happy

        काही म्हणजे वीसेक वर्षान्पुर्वी एक विचारधारा आली होती
        घराबाहेर गुढीपाडव्याला उभारत असलेल्या गुढीला घरच्या घरन्दाज बाईची साडी बान्धावी का???
        गुढी म्हणजे कुणाचे तरी अर्थात त्याकाळी राजेमहाराजान्चे व रामायणकाळात श्रीरामाचे स्वागत! त्याकरता घरच्या बाईची वस्त्रे उघड्यावर टान्गण्यामागचे प्रयोजन काय?
        की तेव्हा गुढीला केवळ कापड बान्धत व कालौघात परकिय आक्रमणाच्या प्रभावाने "साडी" बान्धायची प्रथा पडली गेली?????
        (त्यावेळेस आवाहन केले गेले होते की गुढी ऐवजी भगवा ध्वज वापरा, गेलाबाजार साडीतरी बान्धू नका, मी आजवर साडी न बान्धण्याचे व केवळ कापड लावुन गुढी सजविण्याचे करत आलो आहे! :))
        आता या विषयाचा नी या गुलाबी चड्ड्यान्चा काय बरे सम्बन्ध???
        तर,
        ज्यान्ना आपापली किन्वा आपापल्या आयाबहिणीन्ची/बायामुलिन्ची अन्तर्वस्त्रे कुठेतरी पाठवायची असतील, पाठवोत बापडे! (नीट धुतली तरी अस्तील की नाही काय की, नविन का कुणी पाठवणारे? Proud तस गृहित धरु नका बाबान्नो! अन तसल्याच चड्ड्या तशाच कुणाला तरी "दानही" देऊ नका!)
        पण घरातील धुतलेल्या कपड्यातील अन्तर्वस्त्रे देखिल उघड्यावर वाळत न टाकण्याचे अलिखित नैतिक बन्धन पाळणार्‍या समाजाला, या गुलाबी चड्ड्या पाठवण्याच्या "उपक्रमाने" काय फरक पडणार हे? हे न कळे!
        "अन्तर्वर्स्त्रे" अर्थात गुलाबी चड्ड्यान्वरुन मला आपल ते गुढीकरता वापरत असलेल्या "बाह्यवस्त्राची" आठवण झाली, इतकेच! Proud
        ...;
        आपला, लिम्बुटिम्बु

        जे "रामनाम" आपल्या संस्क्रूतीत पावित्र्य, त्याग, कर्तव्य, मोक्ष, पराक्रम याचं प्रतिक आहे आज ते नाव अशा कुठल्या चड्डी "वळवळीशी" जोडल जातंय हे ज्यांन्ना उन्नत, प्रगत अन बौद्धिकतेचं लक्षण वाटतय देव त्यांचं भलं करो.

        >>>
        हेच रामनाम पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतिक, स्वत:च्या बायकोवर अन्याय करणारे पण वाटते. ते पण ह्याच संस्कृतीतले लोक आहेत. रामनाम पवित्र वाटणारे अनेक लोकांना अनेक 'माझ्या' मते अन्यायकारक व्यवस्थापण न्याय्य वाटतात. असो. स्लार्टीने माझ्या मनातला मुद्दा वर मांडलाच आहे.
        माझ्यासारख्या अनैतिक (म्हणजे नैतिकता ही कशीही वाकवता येण्याजोगी अतिशय बहुगुणी गोष्ट आहे असे समजणार्‍या) माणसाला 'राम' ह्यासारखे ९०च्या दशकातले सर्वोत्कृष्ट राजकिय हत्यार दिसत नाही.

        मुळात मुतालिक संघाच्या कामातून बाहेर पडलेले एक स्वयंसेवक होत. भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे चिडून जाउन त्यांनी उत्तर कर्नाटकातून निवडणुक लढवली व पडले. पुढे श्रीराम सेनेची स्थापना केली पण हिचे मुळ त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमध्येच आहे.
        मग पब मध्ये जाउन 'मुलींवर' हल्ला हीच घटना का? ह्याला २ प्रबळ कारणे.
        १. मुतालिकच्या मागे संघाची फळी नाही, पर्यायाने विहिंप आणि बजरंग दलाची देखील नाही. मुतालिक सवर्ण. त्यामुळे दलित/ओबीसी तरुणांची फळी नाही. उरले उच्चजातीय बेकार अथवा उच्चभ्रु (पैश्याच्या दृष्टीने) वर्गात स्थान न मिळणारे तरुण.
        २. पब मधे जाणार्‍या मुली ह्या आपल्याला मिळत नाहीत, त्यांचा 'क्लास' वेगळा इ.इ. न्युनगंड/रिआलिटी ठासुन भरलेले असतात. असे हल्ले करण्यासाठी चिथावणे फार सोपे असते. संघाच्या प्रचारकाला बौद्धिकाची महती पटवुन देण्याची आवश्यकता नाही.

        कर्नाटकात (दक्षिण भारतात) पहिल्यांदाच आलेले भाजपा सरकार आणि थोडीसी रिजिड भुमिका असलेला टिपिकल प्रचारक मुख्यमंत्री. बंडखोर भडक माथ्याच्या स्थानिक नेत्याला पकडून अनेक जण अनेक कारणांकरता अश्या गोष्टी करत असल्याचे शक्यता नाकारता येत नाही.

        मेंगलोरमधे ख्रिस्ती नागरिक अनेक, काही सॉफ्टवेअर कंपन्या ह्यामुळे पब मधे जाणार्‍या मोजक्या स्त्रीया आणि ह्याच्याकडे परकीय संस्कृती आणि तीत आपल्याला स्थान नसणे अश्या विचारांचे अनेक तरुण (मी जेव्हा तरुण म्हणतो तेव्हा तो भारतीय राजकारणातला तरुण असतो. वय वर्षे १८ ते ५०) असे वातावरण अतिशय पोषक ठरले. असे पोषक वातावरण भारतात अनेक शहरात आहे.

        संस्कृती रक्षणापेक्षा आहे रे/नाही रे मधली वाढत जाणारी दरी आणि तिचा भयावह वेग हे असे काम करण्यासाठी उपलब्द असलेल्या मनुष्यबळाचे खरे कारण आहे. ह्याचा फायदा अगदी सुमार दर्जाचा राजकारणी सुद्धा घेइल.

        त.टी.: मी कुठल्याही धोरणाचा/पक्षाचा/संस्कृतीचा पाइक नाही. मला वाटलेली कारणीमिमांसा वर उधृत करण्यात आलेली आहे.

        >सबगोलंकार विधाने सारेगम बाफवरही केली असशील अशी आशा करतो
        slarti Happy
        नाही केली कारण तिथली चर्चा निकाल योग्य वा अयोग्य इतपतच मर्यादीत होती अन तर्कबुध्धीस धरून होती "माझ्या मते". अर्थात मा.बो. वरील इतर बाफ. सारखाच तिथेही जात पात, राजकारण, संस्कृती, ड्रेस मटेरियल वगैरे वगैरे नेहेमिचे विषय इतरांन्नी आणलेच आहेत तेव्हा ती सबगोलंकार (शब्द आवडला) चर्चा करायचं क्रेडीट अन कुवत खचितच माझी नाही. in fact इथे माझ्या पेक्षा इतरांची प्रचंड बौध्धीक आहे जे ती "चड्डी" या विषयावर वाया घालवत आहेत असे मला वाटत होते, तेव्हडे लिहीले. त्यावर(ही) आक्षेप नसावा?
        >योग, कुठल्या गोष्टी ठिसूळ आहेत याविषयी तुझी मते मला अत्यंत वस्तुनिष्ठ वाटतात - ज्यात तुला रस तेच भरीव.
        मित्रा, खरच तसं असतं तर... (अस किमान एक तरी गुर्‍हाळ असावं ना जिथे आपल्या आवडीचा "रस" मिळतो.. पण छ्या जिथे पेशव्याने ही निराश केले तिथे तुम्हा आम्हा पामरांची काय कथा?) Happy

        पण लवकरच ते विविध प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होईल अशी भीतीही मला वाटते. त्याला आपल्याकडून कोणतीच निमित्तमात्र बत्ती लागू नये असे मला वाटते >>

        चांगली गोष्ट असेल तर त्याला डर काह्याची बाबा? अशी भिती वाटायचे काही कारणच नसावे मग? आणि कोणी एखाद्याने विरोधी मत मांडले, तर हे देखील त्यांचा कार्याचा आड येते हे नविनच वाटले.

        असो. तुझ्या (प्रसारमाध्यमांचा) भीतीमूळे मी इथेच थांबतो. माझ्याकडून ह्या चांगल्या गोष्टीला बत्ती नको. Happy

        चांगली वाटत नाही म्हणूनच टीका करत आहे केदार. मत मांडणे हे चूक आहे असे नसून ते मत चूक की बरोबर याचा विचार आहे.
        दुसरे म्हणजे माझ्या भीतीने, प्रसारमाध्यमांच्या भीतीने तरी का थांबावे ? हा कसला मुलामा ? तुला पटले असेल तर चालू ठेव.

          ***
          ... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !

          संस्कृती रक्षणापेक्षा आहे रे/नाही रे मधली वाढत जाणारी दरी आणि तिचा भयावह वेग हे असे काम करण्यासाठी उपलब्द असलेल्या मनुष्यबळाचे खरे कारण आहे. ह्याचा फायदा अगदी सुमार दर्जाचा राजकारणी सुद्धा घेइल.

          मेंगलोरमधे ख्रिस्ती नागरिक अनेक, काही सॉफ्टवेअर कंपन्या ह्यामुळे पब मधे जाणार्‍या मोजक्या स्त्रीया आणि ह्याच्याकडे परकीय संस्कृती आणि तीत आपल्याला स्थान नसणे अश्या विचारांचे अनेक तरुण..

          अतिशय योग्य मिमान्सा.

          Unbelievable! Sad

          खरंय स्वाती! कुठल्या कायद्याच्या आधाराने त्या गुंडांनी त्या मुलीला अन तिच्या मित्राला पोलिस स्टेशन मधे नेलं. पोलिसांनी सुद्धा त्यांनाच आधी अटक का नाही केली? मूर्खपणा आहे . टण्याचं विवेचन अगदी बरोबर आहे या सेनेच्या बाबतीत! एम एल ए च्या मुलीच्या प्रकरणावरून सुद्धा हे गुंड धडा शिकले नाहीत म्हणजे कहर आहे!

          त्या वडिलांनी रेप ची केस दाखल केलीय त्या मनुर वर हेही लिहीले आहे की त्यात. पुर्ण माहिती शिवाय निष्कर्ष काढने चूकीचे ठरेल. त्यांनी पोलीसांकडे नेले, स्वतः काही केले नाही, ह्यातच सर्व येते. कायद्यानुसार उगीच असे नेणे गुन्हा आहे पण पोलीसांनी त्यांना अटक केली नाही म्हणजेच कुठेतरी, काहीतरी पाणि मुरतेय.
          आजकाल suspected Sangh Parivar activists असे लिहीन्याची फॅशन झाली आहे.
          मत बनवताना सावधाण. जर खरे असेल तर त्यासारखे लाछंनास्पद काही नाही, पण अजुन नक्की सत्य माहीती नाही.

          ती मुलगी १६ वर्षाची म्हणजे अल्पवयीन. त्याआधारे नेले असेल. आणि त्यामुळेच त्या मनुरला अटक झाली असेल.

          अगदी बरोबर. पण इथे वेगळीच अहमहमिका असते, ज्यात, एखाद्या विचाराच्या संस्थेला टारगेट केले जाते. मी काही परिवारात नाही, पण डोळस आहे.
          तो मनुरच खरा दोषी आहे कारण ती मुलगी अल्पवयीन आहे, त्याने तिला फसवीले, हे आर्टीकल वाचूनही लक्षात येते.
          येथे त्या बातमीदाराने हिंदू -मुस्लीम इश्यू करायलाच नको आहे. चाईल्ड अब्यूजचा प्रॉब्मेल आहे हा खरा.
          पण व्हू पॉईंट काही वेगळाच असेल तर ह्या गोष्टी लक्षात येत नाहीतच. असो.

          LOL स्लार्ट्या, चाबूक! तोडलंस!!! Proud ~~D

          Pages