स्नेहसंमेलनात प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्या साठी मराठी किंवा हिंदी 2 ते 3 ओळीतील शायरी सुचवा

Submitted by सुधीर जी on 15 February, 2016 - 12:54

स्नेहसंमेलनात प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्या साठी मराठी किंवा हिंदी 2 ते 3 ओळीतील शायरी सुचवा
उदा:-
सूर्याला आग आहे
चंद्राला डाग आहे
प्रेक्षकां कार्यक्रम छान चालला आहे
तर टाळ्या वाजवणे भाग आहे

अशाच अजून पाहीजेत
गुगल बाबा ला विचारून झाले त्यांनाही माहित नाही
हिंदी पण चालतील

उद्याच स्नेहसंमेलन आहे
तेव्हा त्वरित सुचवा मायबोलीकरहो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो आपल्या कवींकडून प्रेरणा घ्या कि जरा ,

जो नही वाजवेगा टाळी !
मै कर दुंगा उसकी पोळी :p
इ.इ. काहीपण ..

आजकाल लोकांना काहीच्या काही आवडते. तुम्ही काय शब्द वापरता त्यापेक्षा ते कसे फेकता त्यावर आहे सगळं. Wink

>> तुम्ही काय शब्द वापरता त्यापेक्षा ते कसे फेकता त्यावर आहे सगळं.

बरोब्बर आहे. मी कॉलेज मध्ये असेच काही बाही तेंव्हा सुचेल बोलायचो. आता जे सुचले ते इथे देत आहे.
बघा उपयोगाला येते का.......

आली रे आली आता माझी बारी आली (२),
इतना अच्छा परफॉरमन्स हुवा है, तो....
.........जोर से बजनी चाहिए ताली
*

आजारी पडल्यावर घ्यावी गोळी,
सणवार असल्यावर खावी पोळी (२)
आणि....
कार्यक्रम आवडल्यावर... ???
हा बरोबर...... वाजवावी टाळी !
तो बजावो जोरसे ताली
*

दाणे दाणे पे लिख्खा है खानेवाले का नाम
गाणे गाणे पे लिख्खा है गानेवाले का नाम
और हातो हातों पे लिख्खा है... ताली बजानेवाले का नाम
तो बजावो अपने अपने हातोंसे जोर की ताली
*

आल्याच पाहिजेत आल्यात पाहिजेत
खूप खूप टाळ्या आल्याच पाहिजेत
अहो इतक्या सुंदर परफॉरमन्स साठी
एकदा जोरदार टाळ्या... झाल्याच पाहिजेत
*

जिस तरह किसी प्यासे को पाणी की जरुरत होती है
जिस तरह किसी मरीज को दवाओंकी जरुरत होती है
ठीक उसी तरह भाइयों और बहनों.......
इन सारे कलाकारोंको तालियोंकी जरुरत होती है
तो हो जाए एक बार जोर जोर से तालियां
*