काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न
तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे.
१.
प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light )
समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?
२.
दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने.
जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल?
दुप्पट?
सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो?
यालाच जोडून एक उपप्रश्न -
पृथ्वीवर मी ५० किमी प्रतितास वेगाने स्कुटर चालवत आहे. चंद्रावरुन पाहिल्यास ह्याच स्कुटरचा वेग कितीतरी जास्त वाटेल. सुर्यावरुन पाहिल्यास अजून वेगवान वाटेल. दिर्घीकेच्या केंद्रापासून पाहिल्यास अजून अफाट वाढलेला दिसेल. अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल.
यावरुन हा निष्कर्ष काढावा काय?
विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते.
३.
बिग बँग- विश्वाचा जन्म एका बिंदूच्या स्फोटापासून झालाय असे सर्वमान्य आहे. मात्र स्पोटाअगोदर जर तो एक बिंदू अस्तित्वात असेल तर असे अनेक बिंदू अस्तित्वात असले पाहिजेत. आणि त्यांच्या स्फोटांतून अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत.
multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का?
४.
पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही?
पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे?
उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही?
५.
प्रतीगुरुत्वाकर्षण -
गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय?
प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.
aschig: आपली आकाशगंगा आहे
aschig: आपली आकाशगंगा आहे तिथेच आहे - इतर दिर्घीका मात्र दूर-दूर जाताहेत.
केवळ गुरुत्वबलामूळे थोडंफार इकडे-तिकडे फिरणं सुरु असतं.
कळाले नाही. कशाच्या संदर्भाने आकाशगंगा आहे तिथेच आहे - आणि इतर दिर्घीका दूर जात आहे? आकाशगंगा हाच संदर्भ का?
कारण cosmic background radiations, हा संदर्भ धरतात आणि त्या संदर्भाने सगळेच विश्व दूर जाते आहे, (प्रसरण पावत आहे) आणि तेही दशलक्ष कि.मी. प्रती तास अशा काही वेगाने असे वाचनात आहे.
हा फंडा आता जुना झालाय का?
विश्व प्रसरण पावतेय मान्य पण
विश्व प्रसरण पावतेय मान्य पण त्याला काही अंत असेलच ना. त्या नंतर ते आकुंचन पावेल का? फ्रेड हॉएल,बॉन्डी,गोल्ड यांचा स्टेडी स्टेट सिद्धांत कशाशी संबंधित आहे?
विज्ञानदासू धन्यवाद
फ्रेड हॉएल आणि जयंत नारळीकर
फ्रेड हॉएल आणि जयंत नारळीकर यांचा स्टेडी स्टेट सिद्धांत कशाशी संबंधित आहे?<<<
फ्रेड हॉएल्,बॉन्डी,गोल्ड सिद्धांत...
१.बंदूकीच्या गोळीचा वेग हा
१.बंदूकीच्या गोळीचा वेग हा प्रकाशाच्या तुलनेने काहीच नसल्यासारखा आहे हेच बहुतेक लोकांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे वेग तेवढाच , जसे क्ष कोटीमध्ये मध्ये १ मिळवला तर एकूण बेरीज क्ष कोटी अशीच म्हणावी लागेल त्याला क्ष कोटी +१ असे म्हणणे योग्य नाही
२. वरीलप्रमाणे ..
उपप्रश्न - चंद्रावरुन किंवा अन्य ग्रहावरुन तुमचा वेग अजून कमी दिसेल अजून दूर गेल्यास हा वेग शून्य दिसेल कारण तुम्ही कापलेले अंतर जेथून पाहत आहात त्या अंतराच्या तूलनेत नगन्य असेल असे वाटते.
३................. अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत............. ती आहेतच प्रश्न फक्त जीवसूष्टी असेल कि नाही याचा आहे.
४. कदाचित विषाणू आहेत म्हणूनच पेशी चांगल्या विकसित झाल्या आहेत... विसाणूंचे काम पेशींची ताकद वाढविणे असू शकेल.
- झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही?...... आरक्षण मिळाले नसावे
५. प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात असू शकेल , जसे दोन सारखे ध्रुव किंवा पोल एकमेकाला दूर ढकलतात ... तसे पदार्थ असू शकतील विश्वामध्ये.
बरीच ऊत्तरे समाधानकारक आली
बरीच ऊत्तरे समाधानकारक आली आहेत त्याबद्दल धन्यवाद.
>>कपि म्हणजे काय ?
<< If they weren't evolving they would have been extinct by now!>> हे पटते मात्र विषाणू evolve होत नाहीत असे म्हणायचंच नाही आहे. पेशी ज्याप्रकारे ऊत्क्रांत झाल्या, बहुपेशीय जीवांपासून मानवासारखा intelligent प्राणी तयार झाला त्यामानाने विषाणू फारच मागास वाटले.
<< पृथ्वीवरील संपूर्ण जीवन (९९%) हे उर्जेसाठी झाडांवर अवलंबून आहे.>> हो मान्यच आहे. पण म्हणुन झाडांनी आपल्यावर हुकूमत का नाही गाजवली? किमान हुकूमत गाजवण्याईतका त्यांचा विकास व्हायला हवा होता ना ..
(इथे प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायची सुविधा का नाही?)
माणूस तयार करणे हे
माणूस तयार करणे हे उत्क्रांतीचे ध्येय नाही, तसेच हुकूमत गाजवणे हेही नाही. Survival हे उत्क्रांतीचे कारण म्हणा, ध्येय म्हणा, आहे.
मानव, जिद्न्यासा, aschig,
मानव, जिद्न्यासा, aschig, उत्तरे आवडली.
धक्काबुक्की, तुमचा उत्क्रांती
धक्काबुक्की, तुमचा उत्क्रांती विषयी चांगलाच गैरसमज झालेला दिसतोय.
Unicellular to multicellular म्हणजेच फक्त उत्क्रांती नव्हे.
झाडांनी तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवून धमकी दिली की त्यांचा विकास झाला असे वाटते का तुम्हाला? झाडांची खाशी हुकुमत आहे बरं आपल्या पामर मनुष्य जातीवर! श्वास घेता (प्राणवायू), अन्न खाता आणि ज्यांच्यामुळे हे शक्य होते त्यांना अविकसित म्हणता? कमाल आहे!
इथे प्रतिसादाला उपप्रतिसाद
इथे प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यायची सुविधा का नाही?)
<<
कारण ही मायबोली आहे.
*
Monkey : Ape :: वानर : कपि.
*
झाडांची उत्क्रांती झालेली आहेच. अगदी हायस्कूल लेवलची बॉटनी वाचलीत तरी हे लक्षात येईल. एकपेशीय झाडांपासून (प्लँक्टन्स) उत्क्रांत होत होत, शेवाळ, नंतर त्याहीपेक्षा अधिक प्रगत, पण असेक्सुअल रिप्रॉडक्शन करणारी व नंतर आताची सेक्सुअल रिप्रॉडक्शनवाली झाडे तयार झाली आहेत.
आधीच्या पिढीपेक्षा, पुढच्या पिढीत सध्याच्या वातावरणातील बदलांत टिकून राहाणे, नैसर्गिक शत्रूंपासून बचाव (उदा पानांचे काट्यात रुपांतर किंवा चव कडू बनणे इ.) आपल्याच सारख्या इतर सजीवांशी अन्न मिळवण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा, या कसोट्यांवर अधिक सहजतेनं टिकून राहण्यासाठी पुढच्या पिढीत काही बदल होऊ शकतात. व हे बदल टिकून राहून नवी प्रजाती तयार होऊ शकते, याला उत्क्रांती म्हणतात.
ज्यावेळी ही स्पर्धा संपते, त्यावेळी अधिक उत्क्रांत व्हायची गरजही अनेकदा संपते. (अशावेळी त्या प्रजातीने अढळपद मिळवले आहे. It has found its evolutionary or ecological niche) उदा. झुरळ हा प्राणी लक्षावधी वर्षांपासून तसाच आहे, पुढे बदल नाहीत. जे बदल होतात, ते कीटकनाशकांना तोंड देण्याची क्षमता वाढणे इतकेच होतात. झुरळापासून सुप्पर ब्रेन असलेले झुरळ-मानव तयार होत नाहीत, कारण झुरळ प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी ते व्हायची आवश्यकताच मुळात नाही. तशी आवश्यकता उत्पन्न झाल्यास, वा अपघातानेही, कदाचित तसे होउही शकेल, परंतु यात असंख्य जर-तर असतात.
जसे, उडणारा प्राणी बनवायचा असेल, तर त्याच्या वजन व मेटॅबॉलिझमला लिमिट्स येतात, त्यानुसार साईझ लिमिट होते. चिमणीएवढा मच्छर बनत नाही, अन पंखवाली माकडे बनू शकत नाहीत. कारण पंख हलवायला लागणारी उर्जा, ती शरीरभर पोहोचवणारी रक्ताभिसरणसंस्था, तितके वजन उचलायला लागणारी पंखाची साईज. ते बनवण्यासाठीचे मटेरियल असे हजार अडथळे मधे असतात. त्याचप्रमाणे झुरळाचा मेंदू माणसासारखा (हुशार?) बनत नाही, अन माणसाचे नाक कुत्र्यासारखे वा कान वटवाघळासारखे काम करीत नाहीत.
शिवाय, मी म्हटलो, त्याप्रमाणे उत्क्रांती लिनियर नाही. म्हणजे १० लाख वर्षांपूर्वी एक श्री. मूळमाकड होते. त्यांना २० मुले झाली, पैकी एक मुलगा, दोन पायावर चालायचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याला अन्न मिळवण्यात काही अॅडवांटेज मिळाला. नंतर त्या २० ना प्रत्येकी २० मुले झाली. पैकी या उभ्या चि.मूळमाकडाच्या १ पोराने उभे राहण्याचा प्रयत्न केला. हे अनेक पिढ्यांनंतर सगळे कुटुंब उभे राहून चालणारे तयार झाले. दरम्यान यांच्या चुलत-चुलत-चुलत बांधवांपैकी काही मूळमाकडच होते, काहींची झाडांवर अधिक चटकन चढण्यासाठी उत्क्रांती होत होती. काहींची विशिष्ट फळे खाण्यासाठी, काहींची इतर काही.
अर्थात, आधी हजार माकडे होती, त्यापासून हजार माणसे बनली नाहीत. ओके?
त्यामुळेच आज आपल्याला माकड व माणूस दिसतो तसेच मधले हुशार कपि देखिल दिसतात. पैकी प्रत्येक प्रजाती त्यांच्या 'नीश' अर्थात स्वतःसाठीच्या खास अढळपदी पोहोचलेली आहे.
ही झाली उत्क्रांतीची ढोबळ व बेसिक कन्सेप्ट.
यानुसार विचार करू जाता व्हायरस उत्क्रांत का झाले नाहीत, किंवा झाड-मानव का निर्माण झाला नाही हा प्रश्नच बेसिकमधे चुकीचा आहे, हे लक्षात येते.
राहिला प्रश्न हुकुमत गाजवण्याचा.
आता एक गंमत पहा.
'सजीव' असण्याचा बेसिक इन्स्टिंक्ट कोणता? तर स्वतःच्या प्रतिकृती बनवून स्वत:चे (अर्थात स्वतःच्या प्रजातीचे) अस्तित्व टिकवून ठेवणे.
बरोबर?
आता, झाडांनी तयार केलेली फुले, परागणासाठी आवश्यक असलेल्या स्पेशल किटकांचा 'वापर' करून घेण्यासाठी डेवलप केलेली गंध, रंग इ. आयुधे. बिया वाहून नेण्यासाठी केलेला प्राण्यांचा वापर : त्यांना दिलेली फळांच्या गराची लाच, ज्यामुळे त्यांच्या बिया गिळल्या जावून दूरवर उत्सर्जित होतात अन उगवतात.
इतकेच नव्हे, तर आपण जी झाडे 'पेरतो', त्यातही त्या झाडांच्या वंशसातत्यासाठी आपण तन-मन-धनाने प्रयत्न करतो. त्यांच्या बिया जतन करतो, त्या पेरतो. त्यांना खत पाणी खाऊ घालतो. किटकनाशके फवारून कीड लागू देत नाही. प्राण्यांना त्या झाडांची हत्या करू देत नाही, अँड सो ऑन.
इन शॉर्ट त्यांचे वंशसातत्य टिकवण्यासाठी आपण झटत असतो.
मला सांगा, एकादा गुलाम, त्याच्या मालकाची सेवा करताना दुसरे काय करत असतो?
पहिला सिद्धांत हा स्टेडी
पहिला सिद्धांत हा स्टेडी स्टेट थेयोरीचा...त्यात विश्व रिजिड(मराठीत बदल न घडणारे अशा अर्थाने म्हणूयात) मानले एका मोठ्या व्याप्तीला समोर ठेऊन.पण मग इकडे विश्वाची घनता स्थिर रहायला हवी होती.पण याच्या उलटे होताना,यातिघांनी असा नियम मांडला की विश्वाची घनता एकसारखी ठेवण्यासाठी काही नविन पदार्थांचे वा कणांचे जन्म होत असावेत.पण ही थियोरी एनर्जी कॉन्झरवेशन थि. च्या विरोधात जात असल्याने पुढल्या थि.चा जन्म होएल-नारळिकरांकडून झाला.
त्यानंतर त्यातील पुढचा अवतार हा क्वासी स्टेडी स्टेट थि. चा आला.
ज्यात ठराविक कालावधीत ठराविक कालावधीच्या अंतराने विश्वाचे आकुंचन-प्रसरण होते असा सिद्धांत होता. विश्व स्फोटाची स्थितीला विश्वाचे आकारमान शून्य गृहीत धरले जाते.परंतु ते तसे होत नाही. विश्वाचा आकार वाढला की ते आकुंचन पावू लागते आणि आकार कमी झाला असता नव्याने विश्वातील बदल घडतात ज्यात नवीन घटकांचा जन्म होतो.यातून बाहेर पडणार्या प्रारणांनी विश्वाचे पुन्हा प्रसरण होऊ लागते. (रेफ. करा : बोसॉन च्या अस्थित्वाच्या शोधाचा प्रयोग)
अधिक :
मानव हा माकडांपासून उत्क्रांत झाला कन्वर्ट नव्हे. माकडांपासून म्हणजे कपीवर्गीय(एप्स)
आणि ते आपले कझिन्स आहेत.
प्रत्येक सजीवाची पूर्णोत्क्रांती झाली आहे व अजून होते आहे.त्याला तुलनेत बसवाल तर सगळेच अजून अविकसित दिसतील.
पैकी प्रत्येक प्रजाती
पैकी प्रत्येक प्रजाती त्यांच्या 'निशे' अर्थात स्वतःसाठीच्या खास अढळपदी पोहोचलेली आहे. << महत्वाचे
एकादा गुलाम, त्याच्या मालकाची सेवा करताना दुसरे काय करत असतो? << परफेक्ट सांगितलत झाडांबद्दल
दीमा मस्तं पोस्ट. फक्त तेवढं
दीमा मस्तं पोस्ट. फक्त तेवढं 'निशे'चं 'नीश' करा.
जिज्ञासा, मानव, आशिष, अतुल पाटील ह्यांच्या पोस्टी आवडल्या.
थँक्स मृ. यूएस इंग्लिशमधे ते
थँक्स मृ. यूएस इंग्लिशमधे ते चक्क "नीच" ऐकू येतंय.
मी ऐकलेला उच्चार लिहिला होता. करतो दुरुस्त.
दीमा झकास!
दीमा झकास!
दिमा तुमचा प्रतिसाद आवडलाच .
दिमा तुमचा प्रतिसाद आवडलाच . आणि त्यामुळे झाडांकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदलला.
मात्र तुमच्या प्रतिसादातून 'झाडे ही मानवापेक्षा जास्त प्रगत आहेत' असा अर्थ प्रतित होतोय.
तुम्हालाही असंच काहिसं म्हणायचं आहे काय?
नाही. दोघांच्या प्रगतीच्या
नाही.
दोघांच्या प्रगतीच्या दिशा वेगवेगळ्या आहेत. दोघे आपापल्या जागी सर्वाधिक प्रगत आहेत. म्हटले तर दोघेही एकमेकांवर हुकूमत गाजवीत आहेत.
लहानपणी सायन्सफिक्क्षन लिहिण्याचा प्रयत्न करताना, क्लोरोफिल त्वचेत असलेला मानव, हातापायाची बोटे जमीनीत खुपसून क्षार/पाणी अन उन्हापासून अन्न मिळवताना कल्पिला होता
गूगल अर्थ वर करता, तसे या जगाला झूम आउट करा. दुरून, या विश्वाच्या अनंत स्पेस-टाईमच्या संदर्भात या उत्क्रांती, प्रकाशाचा वेग इ. हालचाली पहायचा, समजून घ्यायचा प्रयत्न करा. वेगळे चित्र दिसेल.
दीमा पोस्ट आवडली.... पुन्हा
दीमा पोस्ट आवडली.... पुन्हा वाचावी, मनन करावी अशी आहे.
मस्त धागा....... जाता जाता,
मस्त धागा.......
जाता जाता, हे सगळे एक मेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ या चालीवर सुरु आहे. अगदी जीवाणु वन्स्पती आणि प्राणी... आणि बायोमिमिक्रि हा शब्द जरी हल्ली हल्ली कानावर पडत असला तरी अगदी पुर्वीपासुन ते आज पर्यंतच्या सगळ्या क्षेत्रातल्या संशोधनात त्याच्या प्रचंड हातभार लागला आहे.
एक गोष्ट वाचनात आली होती.
एक गोष्ट वाचनात आली होती. सध्या रेफ. आठवत नाहीय. काही वनस्पती मध्ये एक्का मुलद्रव्याचे रुपांतर दुसर्या मुलद्रव्यामध्ये करण्याची क्षमता असते. त्यासाठी काही प्रयोगाचे वर्णन दिले होते. त्या वनस्पती मध्ये तांबे आढळले होते पण त्याला देण्यात आलेल्या खतां मध्ये, माती मध्ये अथवा पाण्यामध्ये तांब्याचा पुर्णपणे अभाव होता. तेंव्हा हे प्रकरण झेपले नव्हते. कुणाकडे याला सपोर्टीव किंवा हे बोगस असल्याचा काही रेफ. असेल तर प्लिज शेअर करा.
फायटोमाइनिंग असू शकेल। पण
फायटोमाइनिंग असू शकेल।
पण स्वत:च एलिमेंट कनव्हर्शन शक्य वाटत नाही झाडांमधे।
दीड मायबोलीकर, उत्क्रांतीवरची
दीड मायबोलीकर, उत्क्रांतीवरची तुमची पोस्ट आवडली.
दिमा, खूपच सुंदर पोस्ट!
दिमा, खूपच सुंदर पोस्ट!
मापृ > हा फंडा आता जुना झालाय
मापृ
> हा फंडा आता जुना झालाय का?
नाही. आपला रेफरन्स हे बरोबर आहे. बिग बँग विविक्षीत ठिकाणी झाला नव्हता तर सर्वत्र झाला होता - आपण आहोत तिथेही.
दिमा, छान. जे जिव आजही आहेत तीच त्यांच्या उत्क्रांत असल्याची पावती.
निपा, सोनही असंच मिळ्वून देण्याबद्दल काही लोक बोलतात पण ते श्रिमंत होत असतील तर लोकांना लुबाडूनच
किकु,
> तसे पदार्थ असू शकतील विश्वामध्ये.
किंवा नसतीलही. कसं ठरवायचं, कोणती गणीतं मांडायची?
> ती आहेतच प्रश्न फक्त जीवसूष्टी असेल कि नाही याचा आहे.
तुम्ही इतर ग्रह आणि विश्व यात गफलत करताहात बहुधा
> जसे क्ष कोटीमध्ये मध्ये १ मिळवला तर एकूण बेरीज क्ष कोटी अशीच म्हणावी लागेल त्याला क्ष कोटी +१ असे म्हणणे योग्य नाही
कोटी छोटा करत-करत कुठवर आणला तर हे लागू होईल? लाख + १? हजार + १? १ +१?
किमयाशास्त्रामध्ये एका
किमयाशास्त्रामध्ये एका मूलद्रव्याचे रूपांतर दुस-या मूलद्रव्यात करता येते ना? जसे की पा-याचे(मर्क्युरी) रूपांतर सोन्यामध्ये(गोल्ड).
जर काही चुकत असेल तर सांगा. या विषयावर किमयागार नावाचे पुस्तक आहे बहुतेक.
http://www.scientificamerican
http://www.scientificamerican.com/article/fact-or-fiction-lead-can-be-tu...
जरा अवांतर होइल पण वेळ असेल
जरा अवांतर होइल पण वेळ असेल तर झकास करमणुकिसाठी वाचाच.... (अगदी प्रतिमायबोली प्रतिसाद)
http://www.finishing.com/229/87.shtml
माझ्यामते वनस्पती जास्त प्रगत
माझ्यामते वनस्पती जास्त प्रगत आहेत. एका जागेवर बसून आपली उत्क्रांती साधतात. इतर प्राणी, पक्षी, कीटक सर्वांना कामाला लावतात.
दिमा उत्तम प्रतिसाद.
वेग आणि त्याची गणिते हा प्रकार डोक्यावरून गेला.
मला एक वेगळाच प्रश्न पडलाय. उत्तर अगदी सोपेही असेल. . तर प्रश्न असा. पृथ्वी सुर्यावर आदळत नाही कारण ती सुर्याभोवती फिरते. आणि सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्यूगल फोर्स समान होतात. पण मुळात पृथ्वी सूर्याभोवती का फिरते?. गृहाला स्थिरकक्षा कशी प्राप्त होते. ?
किमयाशास्त्रामध्ये एका
किमयाशास्त्रामध्ये एका मूलद्रव्याचे रूपांतर दुस-या मूलद्रव्यात करता येते ना? या विषयावर किमयागार नावाचे पुस्तक आहे बहुतेक. > अच्युत गोड्बोलेंचे किमयागार यावर नाही. किमयागार मधे अशा संशोधनाच्या मागे लागलेल्या शास्त्रज्ञांचा उल्लेख आहे. पुस्तक मुख्यतः शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध यावर आहे.
मी जी किमयागार वाचली ती तर
मी जी किमयागार वाचली ती तर वेगळीच होती.
>> तर प्रश्न असा. पृथ्वी
>> तर प्रश्न असा. पृथ्वी सुर्यावर आदळत नाही कारण ती सुर्याभोवती फिरते. आणि सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्यूगल फोर्स समान होतात. पण मुळात पृथ्वी सूर्याभोवती का फिरते?. गृहाला स्थिरकक्षा कशी प्राप्त होते. ?
प्रत्येक खगोलाला (तारे, ग्रह इत्यादी) गुरुत्वाकर्षण असते. या खगोलाभोवती दुसरा खगोल (पहिल्याच्या तुलनेने खूप छोटा) एक ठराविक वेग निश्चित असेल तर ठराविक अंतरावरील कक्षेत फिरत राहतो. विश्वातल्या कोणत्याही खगोलाभोवती एखाद्या स्थिर कक्षेत दुसऱ्या छोट्या गोलाने फिरण्यासाठी त्याची फिरण्याची गती किती असावी (Orbit Velocity) याचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या फॉर्म्युल्या नुसार हि गती त्या मोठ्या खगोलाच्या वस्तुमानाच्या वर्गमूळाच्या समप्रमाणात असते. तसेच कक्षा जितकी लांब असेल तितकी त्या कक्षेत फिरत राहण्यासाठी आवश्यक गती पण कमी असते. म्हणूनच, एखाद्या ताऱ्याच्या जवळ फिरणाऱ्या ग्रहाची गती जास्त तर दूरवरून फिरणाऱ्या ग्रहाची गती कमी असते.
सूर्याभोवती किती अंतरावर फिरण्यासाठी एखाद्या ग्रहाला किती वेग आवश्यक आहे हे सुद्धा अर्थात याच फॉर्म्युल्याने ठरते. जेंव्हा सूर्यापासून ग्रह निर्माण झाले तेंव्हा सूर्याच्या पृष्ठभागातील तप्त घटकद्रव्य मोठ्या प्रमाणात वेगाने बाहेर फेकले गेले असावेत. त्या सगळ्या तुकड्यांना अर्थात वेगवेगळी गती होती. कालांतराने ज्याच्या त्याच्या गतीनुसार सूर्याभोवती त्या त्या कक्षेत ते स्थिर झाले. त्यामुळे प्रत्येक ग्रह त्या त्या कक्षेत ठराविक गतीने फिरत आहे. म्हणूनच बुध सर्वात जास्त वेगाने तर नेपच्यून सर्वात कमी वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
अवांतर: एखादी कक्षा सोडून बाहेरच्या कक्षेत जाण्यासाठी गती वाढवावी लागते. तिलाच Escape Velocity असे म्हणतात. पण बाहेरच्या कक्षेतच स्थिरपणे फिरत राहण्यासाठी आधीच्या कक्षेपेक्षा गती कमी असावी लागते. कक्षा सोडण्यासाठी म्हणून वाढवलेली गती कमी केलीच नाही तर ग्रह सूर्यापासून कायमचा बाहेर निघून जाईल. याउलट, ठराविक कक्षेत राहण्यासाठी लागणाऱ्या गतीपेक्षा त्याची गती कमी झाली तर तो ग्रह सूर्याकडे खेचला जाऊन त्यात विलीन होईल.
Pages