एक व्हॅलेन्टाईन

Submitted by धक्का on 14 February, 2016 - 02:33

काल :
स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं.

तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध,
बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण,
ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान.

तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला...

काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहे. मला आवडलं. थोडक्यात आणि सरळसोट प्रेमकहाणी..... तरी त्यातली वेदना पोचलीच. ट्रॅजिक मुवी पाहिल्यावर होतं तसं झालं वाचुन.

बाय द वे, हे लिखाण वाचुन माझ्या एका फेवरिट माबो लेखकाची आठवण झाली. आता हरवला आहे तो. अशीच शैली होती त्याची. थोडक्यात पण एकदम थेट.

Sad