वळण

Posted
4 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago
Time to
read
<1’

अनेकदा टोकाची भांडणे झाली
महिनोंमहिने शीतयुद्धे चालली

रडूनपडून आदळआपट झाली
तुझी...माझी वाट वेगळी म्हणताना
निरोप-समारोप घेऊन झाले
केलेले उपकार.. राहीलेली परतफेड
ह्यावर अवमान-अपमान करुन झाले

सगळा गुंता नकोसा झाला
सोबत नकोशी झाली
एकमेकांच्या सावल्याही नकोशा झाल्या
आहे ते जगच नकोसे झाले

पण कुठेतरी आग विझायची बाकी होती
ओघळलेल्या आसंवामधून
आतमधे दडलेला ओलावा दिसायला लागला
भांडता भांडता भावना उलगडायला लागल्या
नवी वाट निवडताना जुन्या वाटेवर पाउल जड झाले
आणि धुमसत धुमसत प्रेम नावाचे एक वेगळेच प्रकरण सुरु झाले!!!

बी

प्रकार: 

कविता उतरत नव्हती आणि ती जशी लिहिली तशी पोस्ट केल्यानंतर लगेच तुझा प्रतिसाद बघून कविता थोडेतरी उतरली असे वाटले म्हणून डोळ्यात पाणी आले.

बेफीकीर, हे गद्य नाही हे मुक्तछंदी आहे.