कुठेतरी फाटतेय

Submitted by बाळ्याभयंकर on 10 February, 2016 - 23:50

आजकाल की नई एक फॅशन झालीय. अरविन्द केजरीवाल ला शिव्या घालणे. त्याला शिव्या घातल्या की लोकांना वाटते गेली आपली पितरे स्वर्गात. आणि त्यात पण जो जितक्या जास्त पोटतिडकीने शिव्या घालेल तो जास्त भारी. लोक त्याच्या त्या लेखाला अगदी डोळ्यात पाणी वगैरे आणून वाचतात आणि धन्य जाहलो या पुण्यलोकी वगैरे अभिमान बाळगतात. मी तर एक बापाला स्वत:च्या मुलीला हे बघ भिकारी माणूस म्हणून केजरीवालला दाखवताना पाहिले आणि मुलीने जेव्हा "भिकाली" असे शब्दात म्हटले तेव्हा तो बाप म्हणाला, "आता माझा जीव गेला तरी हरकत नाही". 

आमची तरी काय चूक?जे सांगितले, ऐकवले  जाते आम्हाला, तेच बोलतो.पूर्वीपासूनचा धर्म आहे आमचा. आम्ही follower खूप भारी आहोत. दुसऱ्याने सांगितले किंवा दाखविले की काहीही विचार न करता आम्ही अंधपणाने फ़क्त follow करतो. "तो सांगतोय न असे म्हणजे काहीतरी असेलच की", "मुर्ख आहे का तो"," तू स्वत:ला जरा जास्तच शाहणा समजतोस " आणि सरतेशेवटी "तू आणि तुझं नशीब बाबा" असे म्हटले की आपली जबाबदारी संपली. आम्ही परत आमचे उकिरडे फुंकायला मोकळे. मग दूसरा कुणीतरी परत कायतर तिसऱ्याबद्दल वाइट बोलतो आणि आम्ही मग परत त्याच्याबद्दल गॉसिप करायला मोकळे. 

"भ्रष्टाचारी आहे तो केजरीवाल"- "हो अहो खरच निर्लज्ज मेला" असे बायकोने म्हटले की नवरा जणू काही मीच त्याला भ्रष्टाचारी सिद्ध केले अशा अविर्भावात रात्री सुखाने झोपतो. आता माला सांगा IRS मधे असलेल्या माणसाला (फुल फॉर्म माहिती असावा IRS च) जिथे पैशाच्या राशीच्या राशि वाहतात तिथे या बाबाला भ्रष्टाचार करता आला नसता. अहो १०० कोटींचे घर बांधून ठेवले असते आतापर्यंत. आणि BMW audi पण असल्या असत्या. बिज़नेस क्लास ने फिरायची खाज आहे ना त्याला ... Bmw करता नसती आली त्याला IRS मधे राहून. उगाचच १५ वर्षांनंतर त्याला सद्बुद्धि दिली देवाने भ्रष्टाचार कर म्हणून. देव पण ना....छे! 

"अण्णांचा वापर करून सोडून दिले"-" संधिसाधु, कुठे फेडेल हे पाप": नुसता भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडायचे होते. हे राजकारण कशाला join करायचे. उठायचे आणि दर 3 महिन्याला जंतरमंतर वर बसायचे उपोषणाला. साधी गोष्ट कळत नाही. तलाव खूप घाण असेल तर त्यातली घाण काढण्यासाठी तळ्यात नाही उतरायचे. काठावर बसून सगळ्यांना दाखवायचे बघा किती घाण आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला एखादा अवार्ड मिळाला असता. "युवा" चित्रपट फक्त बघण्यासाठी पुढे हो आम्ही. त्यात पण विशेष romance आणि love नाही. त्यामुळे तिथे काय दाखवायचे होते हे आमच्या डोक्यावरून गेलेले. अण्णा ऐकत नाहीत पॉलिटिक्स join करायला, मग अण्णांचे ऐकायचे होते ना. तरुणाईने फक्त शाहरुख़ बघावा आणि काहीही न करता फक्त राजकरण्यांविरुद्ध तोंडाची वाफ वाया घालवावी. कैच्चा काय राव!

"काय ती अभद्र भाषा PM विरुद्ध": अरे हो विसरलोच. सत्ययुग आहे ना हे. गेल्या कित्येक शतकांपासून रामराज्य आहे ना इथे, मग? तो केजरीवाल जर ग्रेट असेल तर त्याने राम असले पाहिजे. मग भले त्याच्या बायकोबद्दल घाणेरडे जोक्स केले जावोत, त्याच्या मुलाना दररोज धमक्या मिळू देत किंवा त्याच्या मुलाना हे मीडियावाले जाऊन बापाबद्दल आदर वाटतो का असे खोचकपणे वीचारु देत. आता मोदिसाहेब पण रामवतारच. त्यांच्या दिव्य कर्तृत्वसमोर आम्ही अंधारच. हे सगळे फक्त मेडियाच करते आहे हो, मोदींचा सुतराम सम्बन्ध नाही. ते तर केजरीवालला सगळे काम करू देतात दिल्लीत. केजरीच मुर्ख. राग नाही आला पाहिजे बघा. आणि असं बघा, मोदिसाहेब जर केजरीला भगोड़ा, खांसीवाला, मफलरवाला म्हणाले तर तो तर त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी केजरीवाल नाव नाही घेतले. मोदी असतील हो ग्रेट, त्यांच्याबद्दल राग नाही आणि ते देशाला उच्च पातळीवर नेउन ठेवतीलही पण म्हणून केजरीवाल सारख्या क्षुद्र माणसाच्या एवढ्या वाकड्यात जाण्यासारखे काय आहे त्याच्यात?

कशाची धास्ती आहे एवढी म्हणतो मी? पोलिस तुमच्या ताब्यात, मीडिया तुमच्या हातात, कायदाकानून तुमच्याकडे...संपवून टाका ना केजरीवालचा विषय मोदिसाहेब. का खरच सांगायचं झालं तर कुठेतरी फाटतेय? 

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users