रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दत्ता दत्तींचं आणि माईंचं वागणं बोलणं व्हॅलिड वाटतं. बघायला सुरवात केलीये री मालिका.
ती देविकाची आई किती कृत्रिम बोलते! ती तिची आई न वाटता घरकामाच्या मावशी वाटतात. मेकप चुकलाय Lol

अरे काय हे??? पुर येउन गेला नुकताच प्रतिसादान्चा असं वाटतंय!
काळ्या कोटानी मस्तं पिल्लु सोड्लंय...
आणि ठोशा बै काय त्या सुसल्या ची बाजु घेत असते? सवतीची मुलगी घरात येतेय , नवरा अचानक गेला म्ह्ट्ल्यावर थोडा वेळ लागणारच ना अ‍ॅक्सेप्ट करायला त्या माई ला ?

बाकी मंतरलेल्या चहा चा फार कै उपयोग झालेला नै दिसत.. नै तर अभि काळ्या कोटाला पाहुन घरीच थांबला असता!!!

>>ती देविकाची आई किती कृत्रिम बोलते! ती तिची आई न वाटता घरकामाच्या मावशी वाटतात. मेकप चुकलाय. << Lol
अगदी, आरडाओरडाच जास्त वाटतो त्यांचा.
बहुदा भूतं रात्रीच खेळतात आणि आपल्याला फक्त दिवसाचेच सीन्स दाखवतात वाटतं! ते पण घाबरत असतील भुताक! Scared

अभिराम पुन्हा गाणी गात सासुरवाडीक गेलान>>>>>>:हाहा: अरे काय धमाल पोस्टी टाकतायत सगळे. तो अभिराम माका चिन्मय मान्डलेकरचा धाकला भाव वाटतलो. तसाच तोन्डवळो हाय त्याचा. काल दत्ता उर्फ मराठी रजनीकान्त जास्तच चिडला होता. दत्ती तर कुठल्याही क्षणी घरातल्या प्रत्येकाच्या तोन्डासमोर हातवारे करुन आरती ओवाळेल असे वाटते.:फिदी: पान्डुक बघुक माज्या जीवाक जीव इलो. माका वाटलो ह्यो खपला की काय अण्णासारखा.

काल बेरीनाना परत हातवारे करत कसरती करत होते.Resting in bed

काल बेरीनाना परत हातवारे करत कसरती करत होते >>>

मी वाटच बघतंय..

कायम घराबाहेरच झोपवतंत
माका कोणी घर देता का घर

हे कधी म्हणतात ते याची

नव्या प्रोमो मध्ये ठोम्याचे कै चालले होते खिडकीतनं हात बाहेर काढुन ?! Biggrin

आणि बेरीनाना काय बोलले सांगा ना प्लीज.. काहीच नै कळलं Uhoh

कालचा भाग पाहिल्यावर वाटले कि सिरियल 'भाउबन्दकी वर' जाते की काय? भुताटकी सम्पली? पण उद्याचा भागाची झलक पाहुन वाटले भुताटकी शिल्लक हाय!! बाकी माशाबाला अभिनय जमु लागलाय असे वाटते, कालचा भागत जरा टोन् डाउन वाटला. काळ्या कोटाने भारी पिल्लु सोडलेय.. आता माशाबाने विचारवे काही लिहुन थेवलेय क?? सुसल्या आणी काळा कोट काहीतरि साटेलोटे आहे खरे. नाहीतर तिच्या कडे मोबाइल आणी काळ्या कोटाचा नम्बर कसा आला?
हे मान्गराची जमीन म्हणजे काय??

हे मान्गराची जमीन म्हणजे काय??>>>११११
हो मला सुद्धा काही शब्दांचे अर्थ नाही कळत आहेत ( कारण घाटावरचे आहोत आम्ही):) Happy Happy
काल पण पांडू कोणीतरी आलो आलो म्हणून ओरडत होता ते सुद्धा नाही कळलं...

राधोदय +१, सगळे म्हणत आहेत भाशे वाट लावलीय पण आम्हा घाटावरच्या लोकाना कोकणी, मालवणी मधला फरक कळत नाय, त्यामुळे भाशे ऐवजी बाकि गोश्टीवर भर...

सगळे म्हणत आहेत भाशे वाट लावलीय पण आम्हा घाटावरच्या लोकाना कोकणी, मालवणी मधला फरक कळत नाय>>>११११
मला तर साधे साधे उच्चार पण नाही कळत...इलो गेलो इतकंच समजत...जास्त कठीण असलं कि छपरावरून जातं:( Sad Sad

काल बेरीनाना परत हातवारे करत कसरती करत होते >>>

मी वाटच बघतंय..

कायम घराबाहेरच झोपवतंत
माका कोणी घर देता का घर

हे कधी म्हणतात ते याची >> Rofl

हे मान्गराची जमीन म्हणजे काय??>>>११११ >> मांगराची नव्हे, मांगरावरची आहे ते. एखाद्या जागेचे नाव असेल ते. कोकणात अशी जुन्या पिढींपासून चालत आलेली जागेची नावं प्रचलित असतात. उदा. मोरवावरची जागा, घसरवाट. Happy तसंच नाव असेल हे.

हो मला सुद्धा काही शब्दांचे अर्थ नाही कळत आहेत ( कारण घाटावरचे आहोत आम्ही)
काल पण पांडू कोणीतरी आलो आलो म्हणून ओरडत होता ते सुद्धा नाही कळलं... >> तो राखणदार आलो म्हणून ओरडत होता. राखणदार म्हणजे जागेचा रखवालदार नाग.

त्या सुसल्याला गाडा रे नेउन कुठे तरी.....
एकतर गावात जन्म झाला तिचा आणि तरीही एव्ह्ढी भिक्कार मालवणी बोलते

कालच्या भागात अभिच्या सासूकडची मंतरलेली पावडर संपली होती वाटतं.. टाकल्यान नाय ती.. Wink

पांडोबाक बघून बरा वाटलां. Happy

नाथाच्या नाथीला पण वाटा हवासा झालाय. Uhoh

वकील लयच चाप्टर दिसताय.. आपलो वाटो पण पाडून घेतल्यानं. रस्त्याकडेची जमीन म्हणजे मोक्याची जमीन. तीच बरी अण्णांनी याला दिली.

मला कळलंय बरं का सुसल्या नी काल परकर पोलके का घातले पुन्हा ते... कुर्त्याला खिसा नसतोय नाssss!!!
मोबाईल कुठे ठेवला असता मग? आणि मोक्याच्या वेळी सगळ्याना शॉक देऊन काढता कसा आला असता???

निधी Biggrin

ठोकळीचे काल जरा वेगळे एक्स्प्रेशन्स बघायला मिळाले. सुधारला काय अभिनय. मी रिपीट २ मि. बघितली, तिच्या नवऱ्याशी बोलताना. नवरा चांगला करतो आता अभिनय.

धन्सं अन्जू !

मी रिपीट २ मि. बघितली, नवऱ्याशी बोलताना
नवरा चांगला करतो आता अभिनय. >>> Biggrin ठो़कळी चा नवरा म्ह्णतेयस..हे उशिरा लक्शात आले माझ्या!! :p

हा ती पोस्ट टाकल्यानंतर वाचतांना मलापण वाटलं की माधव किंवा ठोकळा लिहायला हवं होतं कंसात. Lol

पण कंटाळा केला.

Pages