अनाथालयाविषयी माहिती हवी आहे

Submitted by कनू on 2 February, 2016 - 06:55

नमस्कार,

माझा मुलगा पुढच्या महिन्यात एक वर्षांचा होईल . आम्ही त्याचा पहिला वाढदिवस एखाद्या अनाथालयात जाऊन साजरा करायचा विचार करत आहोत. तिथल्या मुलांना खेळणी, कपडे किवा जेवण द्यायचा विचार आहे .

मी कोथरूडला राहते .कोणी मला जवळपासचे अनाथालय सुचवि शकता का जिथे खरच मदतीची गरज आहे . तिथे मदत सुद्धा देऊ इच्छित आहे .

मायबोलीच्या सर्व मित्र मैत्रीणीना आगाऊ धन्यवाद .. मी नेहमी इथे रोमात असते Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.apalaghar.com/
खूप चांगले ऐकुन आहे "आपलं घर" या विषयी.. फेसबूक वर पण डिटेल्स आहेत.
मी बहुतेक मायबोली किंवा मिपा वरच नुकतच यांच्याविषयी वाचले आहे.
तुम्ही जर यदा कदाचित गेलाच तर तुमचा अनुभव ईथे नक्की शेअर करा हि विनंती!

मातोश्री वृध्दाश्रमाच्या जागेतही एक गरीब मुलांसाठीचे वसतिगृह / अनाथाश्रम आहे. वृध्दाश्रमांतील वृध्दांसोबतच या मुलांचीही काळजी घेतली जाते. बालसदन असे नाव आहे. तिथेही चौकशी करू शकता.

"Matoshree" Address

Rajaram Bridge, Riverside, Near Vitthal Mandir, Karvenagar, Pune - 411 052.
Tel: (020) 2541-2375
Email : matoshripune@gmail.com           
matoshreepune@gmail.com
Web: http://www.MatoshreePune.com

http://www.matoshreepune.com/facilities.html

"अनाथालयास देणगी देणेबाबत"
किंवा
"मुलाच्या वाढदिवसाबद्दल अनाथालयास मदत करणेबाबत"

असा बदल शीर्षकात करावा असे सुचवितो. मी स्वतः हा धागा 'कोणा बिचार्‍याला अनाथालयात जायला लागतंय?' असा विचार करून उघडायचं टाळत होतो.