Submitted by कनू on 2 February, 2016 - 06:55
नमस्कार,
माझा मुलगा पुढच्या महिन्यात एक वर्षांचा होईल . आम्ही त्याचा पहिला वाढदिवस एखाद्या अनाथालयात जाऊन साजरा करायचा विचार करत आहोत. तिथल्या मुलांना खेळणी, कपडे किवा जेवण द्यायचा विचार आहे .
मी कोथरूडला राहते .कोणी मला जवळपासचे अनाथालय सुचवि शकता का जिथे खरच मदतीची गरज आहे . तिथे मदत सुद्धा देऊ इच्छित आहे .
मायबोलीच्या सर्व मित्र मैत्रीणीना आगाऊ धन्यवाद .. मी नेहमी इथे रोमात असते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
http://www.apalaghar.com/ खूप
http://www.apalaghar.com/
खूप चांगले ऐकुन आहे "आपलं घर" या विषयी.. फेसबूक वर पण डिटेल्स आहेत.
मी बहुतेक मायबोली किंवा मिपा वरच नुकतच यांच्याविषयी वाचले आहे.
तुम्ही जर यदा कदाचित गेलाच तर तुमचा अनुभव ईथे नक्की शेअर करा हि विनंती!
धन्यवाद संदीप . कोणाला
धन्यवाद संदीप .
कोणाला ससूनच्या श्रीवत्स चा अनुभव आहे का ?
मातोश्री वृध्दाश्रमाच्या
मातोश्री वृध्दाश्रमाच्या जागेतही एक गरीब मुलांसाठीचे वसतिगृह / अनाथाश्रम आहे. वृध्दाश्रमांतील वृध्दांसोबतच या मुलांचीही काळजी घेतली जाते. बालसदन असे नाव आहे. तिथेही चौकशी करू शकता.
"Matoshree" Address
Rajaram Bridge, Riverside, Near Vitthal Mandir, Karvenagar, Pune - 411 052.
Tel: (020) 2541-2375
Email : matoshripune@gmail.com
matoshreepune@gmail.com
Web: http://www.MatoshreePune.com
http://www.matoshreepune.com/facilities.html
"अनाथालयास देणगी
"अनाथालयास देणगी देणेबाबत"
किंवा
"मुलाच्या वाढदिवसाबद्दल अनाथालयास मदत करणेबाबत"
असा बदल शीर्षकात करावा असे सुचवितो. मी स्वतः हा धागा 'कोणा बिचार्याला अनाथालयात जायला लागतंय?' असा विचार करून उघडायचं टाळत होतो.
धन्यवाद अरुंधती ... शनिवारी
धन्यवाद अरुंधती ...
शनिवारी मातोश्री मध्ये जाणार आहे
कनू श्रीवत्स चांगली संस्था
कनू श्रीवत्स चांगली संस्था आहे. जरूर भेट द्या एकदा.
मायबोली वर ध्यास पंथी पाऊले
मायबोली वर ध्यास पंथी पाऊले हा group पहा