कोक्पर - ६

Submitted by उदय८२ on 2 February, 2016 - 04:28

कोक्पर - ५

"साधा मोर्चा असेल मग तिथले पोलिस बघून घेतील. पोलिसांशी बोलून एके ठिकाणी थांबवायला सांग. मग "क्रॉसिंग" गेल्यावर जाऊ द्या... पण आपल्याकडून काहीच अॅक्शन नको. कीप मी अपडेटेड. ओव्हर अँड आऊट"

"दिमित्री, रुसलानला पाठवून पोलिसांशी बोलून घे. मोर्चा चौकाच्या आधीच थांबवायला सांग. लगेच. कुठे पोचला आहे तो.? ओव्हर"
"अकराशे मीटर सर. ओव्हर"
"ओके थांबवा... ओव्हर अँड आऊट." सूचना देऊन डेव्हिड रायनोकडे वळला.
"तू ब्लॅकबर्ड बरोबर त्यावर लक्ष ठेव आणि पोझिशन्स घेऊन ठेव तो पर्यंत मी मेसेज सगळ्यांना पोहचवतो. वॉकिटॉकी सगळ्यांशी एकदम कनेक्ट करून दे मला." रायनोने सगळ्या पॉइंट्सवरचे वॉकिटॉकी एकत्र सेट केले आता सगळ्यांना एकत्र एकमेकांशी बोलता येणार होते
"कमिंग ब्लॅककॅप कमिंग"
"रॉजर ब्लॅककॅप विल्यम्स ओव्हर"
"त्वरित निघा चौकाजवळ एक मोर्चा येत आहे त्याला पोलिसांच्या मदतीने तिथेच थांबवा. रुसलान आहे तिथे. ओव्हर"
"ठीक आहे संशयितांना रूम मध्ये बंद करून ठेवतो. आणि तिघांना पहार्‍यावर ठेवतो. ओव्हर"
विल्यम्स जीप घेऊन लगेच निघाला. तीनचार मिनिटांतच तिथे पोचला. रुसलान पोलिस अधिकार्‍यांशी बोलतच होता. मोर्चा आता हजार मीटर दूर दिसला.
"काय सिच्युएशन आहे लेफ्टनंट?"
"अजून लांबच आहे. तिथे काही पोलिस अधिकार्‍यांशी बोलणे होत आहे. तिथेच थांबायला आग्रह केला आहे"
"आग्रह ? ऑर्डर दे सरळ.. तू एक यूनोचा लेफ्टनंट आहे आणि तुझ्या बरोबर एक मेजर आहे. थांब तू"
"हॅलो इन्स्पेक्टर, आम्हाला ऑर्डर्स आहेत हा रस्ता मोकळा ठेवायला. तुम्ही तो मोर्चा तिथेच दूर थांबायला हवा." थोड्या कडकपणेच विल्यम्स बोलला.
"हे बघा मिस्टर,"
"मेजर विल्यम्स. कॉल मी मेजर"
"ठीक आहे मेजर विल्यम्स. सिव्हिलिअन्स बाबत काय करायचे ते आम्हाला शिकवू नका. तो एक शांततेने चाललेला निषेध मोर्चा आहे. त्यात काही महिला, मुले आणि वृद्ध लोक देखील दिसत आहे. आम्ही त्यांच्याशी बोलतो आहोतच आणि बॅरिकेड्स लावल्या आहेत. दिसतंय तुम्हाला?" पोलिस ऑफिसरदेखील गुर्मीतच बोलला.
"आमचे महत्त्वाचे काम होणार आहे आता. म्हणून सांगत आहे." विल्यम्स देखील वर होऊ बोलू लागला.
इतक्यात रुसलान जवळचा वॉकिटॉकी वाजू लागला.
"कमिंग वॉरहेड कमिंग."
"रॉजर डेव्हिड कमिंग ओव्हर"
"सर तात्सुओ.. इथे मी गच्चीवर बघण्याकरिता आलेलो आहे. उत्तरेकडून 35°01'21.8"N 40°27'25.2"E ला तो मोर्चा थांबलेला आहे. तिथून काही लोक मधल्या रस्त्याने आत आपल्याकडे येत आहे. ओव्हर"
"कॉपी. तू लक्ष ठेव फक्त आणि एकदम गच्चीवर ओपन होऊ नकोस. आत रूममध्येच थांबून लक्ष ठेव. काही गडबड असेल तर लगेच सांग. ओव्हर"
"सर जॉर्जी हिअर मला देखील तेच दिसत आहे. बरेच लोक आता आतल्या रस्त्याने येत आहेत. मोर्चात जीप-कार देखील आहेत. काही मधोमध आहेत आणि आजूबाजूला माणसे असल्याने नीट दिसत नाही. ओव्हर"
"ठीक आहे. जॉर्जी आणि तात्सुओ. तुम्ही मोर्च्यावर लक्ष ठेवून राहा. ओव्हर"
"कमिंग अॅर्नॉल्ड कमिंग."
"रॉजर अॅर्नॉल्ड कमिंग ओव्हर."
" तात्सुओ त्या मोर्चावर लक्ष ठेवत आहे. तू त्याच्या खालच्या रस्त्यावर आणि 120 डिग्री नॉर्थ रस्त्यावर लक्ष ठेव. ऑल्विन मशिदीमागच्या रस्त्यावर लक्ष ठेवेल. ओव्हर"
"ठीक आहे. ओव्हर अॅड आऊट."
"कमिंग टीम बी कमिंग."
"रॉजर सार्जंट सुलेमान, कमिंग सर, ओव्हर."
"सुलेमान, दगडी घराच्या मागचा सगळ्या परिसरावर आपली माणसे तैनात आहेत ना? अॅर्नॉल्ड तात्सुओच्या पॉइंटवर लक्ष देणार आहे"
या सगळ्या सूचना देत असतानाच रायनोला ब्लॅकबर्ड कडूनं महत्त्वाची सूचना आली की ऑपरेशन क्रॉसिंग सात मिनिटांत पोहचत आहे.
"डेव्हिड, दे आर कमिंग"
"बी अलर्ट बॉइज" डेव्हिड थोडा चिंतेत होता. हल्ला होणार आहे हे माहीत होते. पण कुठून कसा हे सांगायच्या आधीच युसुफ मरण पावला होता.
"सर सार्जंट जॉर्जी. मोर्चा थांबल्यामुळे बरेच ट्राफिक थांबले आहे. काही कार आतल्या रस्त्यातून यायचा प्रयत्न करत आहेत. माझे लक्ष आहे. "
इकडे विल्यम्सला देखील माहिती मिळाली "ऑपरेशन क्रॉसिंग" जवळ येत आहे.
"ऑफिसर, ऑफिसर सगळ्यांना बाजूला घ्या. आमच्या गाड्या येत आहेत." विल्यम्स लांबून येणार्‍या गाड्यांकडे बघून ओरडला. लांबून दोन चिलखती हम्वी त्यांच्या मागे एक व्हॅन त्याच्यामागे अजून एक हम्वी अशी टीम एकमेकांत शंभरेक फुटांचे अंतर राखून वेगात येताना दिसल्या. त्यांच्यावर "ब्लॅकबर्ड" होते. तिथून त्यांना पुढच्या सूचना दिल्या जात होत्या. पहिल्या दोन हम्वी चौकातून पुढे निघून गेल्या. त्यातली एक डेव्हिडच्या इमारतीशी पोचली असता अचानक तिच्यासमोर इमारतीच्या मागच्या रस्त्याने एक कार जोरदार ब्रेक मारून आडवी थांबली. रायनो काय झाले बघायला गच्चीच्या दुसर्‍या बाजूस पळाला तेव्हढ्यात कारमध्ये जोरदार स्फ़ोट झाला. दोन्ही हॅम्वी थांबल्या. व्हॅन बरोबर सुपर मार्केटच्या थोडे पुढे थांबली. मागची हम्वी चौकातच थांबली. स्फ़ोटाच्या आवाजाने मोर्चात जणू भूकंपच झाला. सगळे लोक सैरावैरा धावू लागले. चौकाकडे , गल्ल्यांत, मशीदीच्या मागच्या रस्त्याने असे, लोक पळू लागले. या गोंधळात मोर्चामधील एक टोयोटा ट्रक वेगाने समोरील लोकांना चिरडत चौकाकडे येऊ लागला.
"आपल्यावर हल्ला झाला आहे. आय रिपीट वी आर ऍटॅक्ड." विल्यम्सने वॉकीटॉकीवर लगेच संदेश पाठवला आणि आपली रायफल L85 घेऊन पोझिशन मध्ये आला. ट्रक मधून एका माणसाने रॉकेट लॉन्चर काढून चौकात थांबलेल्या हॅम्वीवर फायर केले.
"इन्कमींग" विल्यम्स जोरात ओरडला आणि त्याने रुसलान व पोलिस ऑफिसरवर झेप घेऊन त्यांना दूर ढकलले. रॉकेटचा स्फोट त्याच्या बाजूलाच झाला. विल्यम्सला जबर मार बसला. शरीराची डावी बाजू पूर्णं जखमी झाली.
"मेजर विल्यम्स हिट. आय रिपीट मेजर विल्यम्स हिट. मेडीक मेडीक." रुसलानने वॉकीटॉकीवर मेसेज पाठवला. तरीही त्याला बाजूला सारून विल्यम्सने आपल्या रायफलीतून फायर करायला सुरुवात केली. रॉकेट लाँच करणार्‍याला दिमित्रीने टार्गेट केले. विल्यम्सने जोरदार फायरिंग करून ट्रक थांबवला.
इथे डेव्हिडच्या लक्षात आले की हल्ला झाला आहे. त्याने सगळ्यांना पटापट सूचना दिल्या.(हल्ला झालेला दिसताच सर्वांना पटापट ऑर्डर्स सोडत डेव्हिडने स्वतः गच्चीवर पोझिशन घेतली. रायनोने गच्चीच्या टाकीवर पोझिशन घेतली. डेव्हिडचे सर्व लक्ष मार्केटजवळ थांबलेल्या व्हॅनवर होते. त्यातच त्या "पुढार्‍यांना" ठेवले होते. दगडी घराच्या मागच्या बाजूने देखील आता स्फोटांचे आणि गोळीबाराचे आवाज येऊ लागले. अतिरेक्यांनी त्या दिशेने प्रवेश मिळवला होता आणि त्यांची टीम बी शी जोरदार चकमक सुरू झाली. अॅर्नॉल्डने आता तात्सुओची बाजू सोडून दिमित्रीच्या मागच्या बाजूकडे वळला. किमान दहापंधरा जीप-व्हॅन भरून हल्लेखोर दक्षिणेकडून येत होते.
"कमिंग डेव्हिड कमिंग"
"रॉजर डेव्हिड कमिंग ओव्हर"
"साऊथकडून हेवी अॅटॅकर्स येत आहेत. टीम बी बरोबर टीम सी पाठव. लवकर. ओव्हर."
"कॉपी.. टीम सी तुम्ही टीम बी ला जॉईन करा हेवी ट्रूप्स येत आहेत. सुलेमान सिचुएशन सार्जंट ड्युक बरोबर शेअर करा.. शक्य तिथे लेजर टार्गेट तयार करा. अॅर्नॉल्ड पुढे बघून घेईल क्लिअर ऑल ऑफ देम.. टीम ए मशीद कव्हर करा आणि टीम डी व्हॅन कव्हर करा. ओव्हर... "
"रॉजर दॅट सर" सुलेमान ने रिस्पॉन्स दिला
"कॉपी सर.. वी आर ऑन द वे.. ओव्हर अँड आऊट." टीम सी मधला लेफ्टनंट ड्युकने उत्तर दिले.
इमारतीच्या खाली थांबलेल्या हम्वी मधून सैनिक बाहेर येऊन व्हॅनच्या आजूबाजूला जमले होते. व्हॅन मधून पुढाऱ्यांना बाहेर काढून मार्केटच्या मागील घरात घेऊन गेले. हल्लेखोर आता मशीदीच्या मागच्या बाजूने आणि दगडी घराच्या बाजूने येऊ लागले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार फायरिंग चालू होते. मधूनच पेट्रोल बॉम्ब, हातबॉम्ब घेऊन हल्लेखोर घराच्या छतांवरून सैनिकांवर फेकायचा प्रयत्न करत होते परंतु त्यांची चाल स्नायपर्स निष्फळ ठरवत होते. तात्सुओ आणि अल्विन यांनी मशिदींच्या बाजूने येणार्‍या हल्लेखोरांना एकेक करून टिपायला सुरुवात केली. तात्सुओने गच्चीवरून मोर्चातल्या गाड्यांना टार्गेट करायला सुरुवात केली. तर डेव्हिडच्या इमारतीच्या मागच्या बाजूला असणार्‍या जॉर्जी आणि सॅमीने टीम ए ला सपोर्ट देत इमारतीच्या मागच्या बाजूच्या रस्त्यावरून येणार्‍या हल्लेखोरांना लक्ष्य करणे सुरू केले. विकी आणि अल्विनने टीम डी ला सपोर्ट करत रस्त्यावर लक्ष केंद्रित केले.
"मेजर विल्यम्स हिट. मी त्याला इमारतीकडे पाठवत आहे. सर. ओव्हर"
"रॉजर. पाठवून दे लवकर ओव्हर"
डेव्हिडने वायरलेस रेडिओवरून जनरलला परिस्थिती कळवली. पुढारी असणारी व्हॅन सुरक्षित आहे हे कळवले. मोर्चातूनच हल्ला झाला हे देखील कळवले.
"टीम डी, आतल्या लोकांना व्हॅन बरोबर इमारतीच्या समोर आणण्याचा प्रयत्न करा ओव्हर." डेव्हिडने सूचना दिली.
"निगेटिव्ह वॉरहेड.. तुमच्या मागच्या बाजूने मोठ्या संख्येने हल्लेखोर येत आहे. तसेच समोरून देखील काही वाहने येत आहे. ओव्हर." ब्लॅकबर्डने वरून नजर ठेवून असल्याने पुढील धोका लगेच कळवला.
"कॉपी.. जॉर्जी पूर्वेकडून वाहने येत आहेत लक्ष ठेव... ओव्हर" " रायनो पुढे मी लक्ष देतो तू मागून येणार्‍या वाहनांवर लक्ष ठेव."
दगडी घराशी तुफान धुमश्चक्री चालू होती. सुलेमान आणि टीम बी व टीम सी ने हल्लेखोरांना थोपवून धरले होते. मधूनमधून लेजर टार्गेटचा वापर करून ते अॅर्नॉल्डची मदत घेत होते. हल्लेखोरांनी त्या बाजूच्या इमारतींवर कब्जा करून तिथून फायरिंग चालू केले होते. सुलेमानने सार्जंट ड्युकला पॉइंट देऊन काही साथीदारांसोबत पुढे इमारतीकडे सरकायला सुरुवात केली.
"कमिंग अॅर्नॉल्ड कमिंग"
"रॉजर.. अॅर्नॉल्ड ओव्हर"
"सुलेमान हिअर.. मी समोरच्या इमारतीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तिथून एमएमजी मधून फायरिंग होत आहे. आमच्या टीमला पुढे जाता येत नाही आहे. मी दोनतीन साथीदारांना घेऊन पुढे जातो. लेझरचा प्रयत्न करतो. ओव्हर"
"ठीक आहे सुलेमान... स्प्रिंग बदलताना पुढे हो ओव्हर"
सुलेमान आपली एम203ने समोरच्या इमारतीकडे लक्ष ठेवून हळूहळू पुढे सरकू लागला. एमएमजी मशीनगन्स स्प्रिंग बदलण्यासाठी थांबताच सुलेमान आणि साथीदार धावतच इमारतीजवळच्या भिंतीशी गेले. मागून ड्युक त्यांना कव्हरींग फायर देतच होता.
"सर मला एमएमजी दिसत आहे. पण हल्लेखोर नाही. लेझर लावता येत नाही आहे. ओव्हर"
"अँगल बदलून बघ ओव्हर"
"निगेटिव्ह समोर इमारतीच्या भिंतीकडून जाणाऱ्या रस्त्यांवर त्यांची नजर आहे. ओव्हर" सुलेमान फायरिंग चालू ठेवूनच बोलत होता.
"मला इथून जितक्यांना टिपता येईल तितके टिपतोय. पोझिशन चेंज करता येत नाही दिमित्रीवर देखील लक्ष ठेवायचे आहे ओव्हर." अॅर्नॉल्ड मनातल्या मनात विकीला दोष देत सुलेमानला बोलला.
"कॉपी. मी ग्रेनेड वापरून बघतो. ओव्हर. अँड आऊट" सुलेमानने रायफलमध्ये ग्रेनेड भरले आणि इमारतीवर निशाण साधले. धुड्डुम.. नेम अचूक लागला होता.. ड्युकने टीमला ताबडतोब पुढे पाठवले आणि इमारतीपाशी जाऊन हल्लेखोरांवर फायरिंग सुरू केली.
डेव्हिडने सेंट्रलब्लॉकच्या गच्चीवरून आणि त्याखाली असणार्‍या हम्वीमधल्या सैनिकांनी मोर्चा सांभाळला होता. त्यांनी डेव्हिडच्या साथीने एकाही हल्लेखोराला व्हॅनजवळ जाऊ दिले नव्हते. विल्यम्सदेखील जखमी अवस्थेत काही वेळात तिथे पोचला. गच्चीवर नेऊन मेडिकल टीमने त्याच्यावर तात्पुरते उपचार सुरू केले. डेव्हिडचे लक्ष देखील अर्धे विल्यम्सवर आणि अर्धवट व्हॅनवर लागून राहिले होते.
"टीम ए आणि डी शक्य तितक्या लवकर इमारतीची मागची बाजू क्लिअर करा. आपल्याला व्हॅन आणखी जवळ आणायची आहे. प्रयत्न करा. विकी तू मागची बाजू बघ. अल्बनला समोर लक्ष देऊ दे... मला लवकरात लवकर व्हॅन जवळ आणायची आहे." टीम ए मधील काही सैनिक मशिदीशी थांबले व बाकीचे मागील रस्त्याशी गेले. रायनोदेखील वरून हल्लेखोरांवर फायरिंग करतच होता. उत्तरेकडून आलेल्या हल्लेखोरांची संख्या दक्षिणेकडून आलेल्या हल्लेखोरांच्या तुलनेत कमी होती. जोरदार फायरिंग सुरू होते. अशा परिस्थितीत कुणालाच आपली पोझिशन सोडता येत नव्हती. रायनो खाली उतरण्याचा विचार करू लागला. वरून टार्गेट करण्यापेक्षा खाली मैदानात उतरणे जास्त त्याला आवडत असे. प्रथमोपचारांनंतर विल्यम्स थोडा स्थिरावला होता डावी बाजू जखमी झाल्याने त्याला स्नायपर सांभाळणे शक्य होत नव्हते. खाली बसून विल्यम्स डेव्हिडला मदत म्हणून दुर्बिणिने टार्गेट्स पाहून सांगू लागला. आणि डेव्हिड व्हॅनजवळ येऊ पाहणार्‍या हल्लेखोरांना टिपू लागला.
सगळ्यांना लवकरात लवकर गाड्या पुढे पाठवायच्या होत्या म्हणून रायनोने तो भाग क्लिअर करण्यासाठी खाली उतरण्याचा निर्णय घेतला. रायनो खाली आल्यावर व्हॅनजवळ गेला. त्या नेत्यांना लवकरात लवकर पुढे काढा म्हणून ऑपरेशन कमांडरने सूचना केली. रायनोने हम्वीमधे बसून थेट जळत असलेल्या कारवर धडक मारली आणि सुसाट पुढून येणार्‍या कारवर आदळवली. हम्वीमधल्या सैनिकांनी तुफान गोळीबार चालू केला त्यांना वरून विकीचीदेखील साथ मिळाली. रोडब्लॉक बर्‍यापैकी कमी होऊ लागला.
सैनिकांनी हल्लेखोरांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे त्यांची ताकद हळूहळू कमी होऊ लागली. सतत होणार्‍या फायरिंगऐवजी आता थांबून थांबून होऊ लागली याचाच अर्थ त्यांची संख्या कमी होऊ लागली होती. अधूनमधून स्फोटांचे आवाज येत होते. रोडब्लॉक असल्याने ते क्लीअर करण्याचे काम टीम डीला दिले गेले. पूर्वेकडून हल्लेखोर लावत असलेले रोडब्लॉक टीम डी बरोबर उध्द्वस्त करत रायनो पुढे सरकत होता.
"कमिंग डेव्हिड कमिंग"
"रॉजर डेव्हिड ओव्हर"
" टीम डी बरोबर मी रायनो. ब्लॅकबर्डच्या सूचनेनुसार पूर्वेकडचे रोडब्लॉक क्लिअर करत आहे.. माझा सिग्नल मिळेपर्यंत नेत्यांची व्हॅन पुढे पाठवू नका ओव्हर"
"कॉपी. मी पुढील सूचना मिळेपर्यंत व्हॅन इमारतीजवळ आणून ठेवतो. ओव्हर अॅड आऊट"
व्हॅनच्या दिशेने अधून मधून गोळीबार होतच होता. जीप देखील भरधाव धडकवण्याचा प्रयत्न केला होता. पण टीम ए ने त्यांचा प्रयत्न विफल केला. हल्लेखोरांना व्हॅन मध्येच नेते आहेत हे आधीच कळले होते. त्यानुसारच त्यांची योजना तयार होती. डेव्हिडने जनरलला संपर्क साधला त्यांच्याशी बोलता बोलता त्याची स्नायपर गन मधूनच लक्ष्य टिपत होती.
"लोटस, त्यांचा हल्ला कमी होऊ लागला आहे. त्यांनी जागोजागी टायर जाळून रोडब्लॉक केले आहेत. टीम डी बरोबर रायनो पूर्वेकडचे रोडब्लॉक काढण्याचे काम करत आहे. तो पर्यंत मी व्हॅन माझ्या इमारतीजवळ घेऊन येऊ का? ओव्हर"
"ब्लॅकबर्ड काय सांगत आहेत? ओव्हर"
"निगेटिव्ह. रोडब्लॉक आणि मागील रस्ता क्लिअर झाल्याशिवाय आणू नकोस असे सांगितले ओव्हर"
"बरोबर आहे. आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. क्लिअर झाल्याशिवाय अजिबात आणू नकोस. आणि व्हॅनच्या जवळपास कोणीच जाता कामा नये. शूट देम. "
"लोटस कोक्पर बद्दल काही माहिती मिळाली का? ओव्हर"
"नाही. जशी मिळेल तसे लगेच सांगेन.. लवकरात लवकर त्यांना पुढे पाठवा. ओव्हर अँड आऊट."
डेव्हिडकडे आता पर्यायच राहिला नाही. मागील रस्ता आणि रोड्ब्लॉक क्लिअर झाल्याशिवाय त्याला व्हॅन स्वतःजवळ आणता येणार नव्हती. हुकूम तो शेवटी हुकूमच. खरं तर सातशे मीटरवर असणार्‍या व्हॅनवर लक्ष ठेवणे अवघडच होते. हल्लेखोरांचे मुख्य टार्गेटच ते असल्याने कुठून ही हल्लेखोर त्या दिशेने येत होते. डेव्हिडने पंधरावीस टार्गेट्स शूट केले होते. गोळ्यांच्या आणि बॉम्बस्फोटाच्या गोंगाटातही तो सर्वत्र लक्ष देत होता.

कोक्पर - ७

क्रमशः
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users