काय बोलणार यावर ?

Submitted by उडन खटोला on 1 February, 2016 - 12:21

आज मुंबईत एका माॅलमध्ये फिरत असताना माझ्या समोर एक अडीच तीन वर्षांचा गोड छोकरा अखंड बडबड करत आईसोबत चालला होता. ती बाई कुणाशी तरी मोबाईलवर बडबडत होती...याला ते कळलं नव्हतं. एका क्षणात काय झालं कुणास ठाऊक, त्या बिनडोक बाईने क्षणार्धात मुलाच्या तोंडावरच जोरात हात उगारला (कानशिलात मारल्यासारखं केलं) पण मारलं नाही...त्या इवल्याश्या जीवाने एकदम दचकून पापण्यांची केविलवाणी फडफड केली आणि पोरगं बिचारं काहीतरी मोठ्ठा अपराध केल्यासारखे गप्प झाले. हे दोन सेकंदाचं दृश्य बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं यार....ती बाई आहे हे एक सेकंद विसरून तिला तुडवून काढावं की काय असा क्रुर विचार आला डोक्यात...

हे xxxXX पालक आपल्या पोरासोबत असतानाही स्वतःच्या विश्वात दंग असतात. आपण इवल्याश्या जीवाचा किती अपमान करतोय हे या XxXX च्या ध्यानीमनीही नसतं. एखाद दिवशी मी स्वतःवरचा ताबा सुटून एखादा किंवा एखादीला भर रस्त्यात मारहाण केली नाही म्हणजे मिळवलं यार....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उडन खटोला, दोनदा तुम्ही कुणाला तरी मारहाण करण्याची इच्छा व्यक्त केलीत.
तर प्लीज तसे करू नका.
एखाद्या स्त्रीला किंवा कुणालाही अशी मारहाण केलीत तर ती 'विनाकारण' समजली जाईल.
पोलिसांपुढे किंवा कोर्टातही हे कारण व्हॅलिड धरले जाणार नाही.
उगाच मोठाला दंड किंवा काही वर्षे तुरुंगात रहावे लागेल.
ते अवॉईड करायचे असल्यास 'मानसिक दृष्ट्या आजारी' असे सर्टीफिकेट कुठूनतरी मिळवावे लागेल, ज्या आधारे असा तुम्ही केलेला हल्ला 'झटका' म्हणून कदाचित दयेच्या नजरेने बघून कोर्ट सजा कमी करून औषधोपचारांकरिता हॉस्पिटल मध्ये रवाना करेल.

उडन खटोला,

या प्र्संगातुन तुम्ही स्वता:हा साठी एक धडा घ्या की तुम्ही तुमच्या मुलांशी असे वागणार नाही.

तुमच्या जवळच्या मित्र-आप्तेष्टांना सांगा मुलांशी असे वागु नका.
आपण एवढेच करु शकतो..

एकंदरीतच संवेदनशीलता कमी झाली आहे उडन खटोला. तुमचा उद्वेग पोचला. काहींना वरकरणी अनावश्यक वाटणार्‍या ह्या धाग्यात खरे तर एक मोठा विषय दडलेला असावा. पण असो! ती चर्चा होणे संभवेलच असे नव्हे.

अवांतर - फिरत्या न्यायालयाचे एकदम तीन तीन न्यायाधीश येथे घोंघावले हे पाहून अंमळ मौज वाटली.

-'बेफिकीर'!

समांतर किस्सा सांगते. आम्च्या घरीच एक गोड मुलगा असाच वैतागला. व मॉलमधे फरशीवर झोपला... आता करा म्हणाला काय शॉपिंग करता ते. तेव्हा त्याच्या वैतागून कदाचित त्याला फटका देऊ घालणार्‍या आईला एका मॉल मधल्या बाईने समजुतीच्या स्वरात सांगितले....त्याची चूक नाहीये...त्याला का मारता....त्याचे वय तरी आहे का एवढे ४ तास शॉपिंग एन्जॉय करण्याचे. आणि आईचे डोकेजागेवर आले. बघे सुद्धा बरीच मदत करू शक्तात...चांगलेच बोलून, हे समजले.

फेसबुकवर हि पोस्ट "सचिन मधुकर परांजपे (पालघर)" यांनी टाकलेली आहे. तुम्ही तेच असाल तर ओके.
अन्यथा तुमचा हा धागा प्रताधिकार कायद्याचा भंग करतो आहे (भले तो एक छोटा परिच्छेद का असेना) एवढेच निदर्शनास आणून देऊ इच्छिते. धन्यवाद !!!

हे नाव अनेकदा वाचल्यासारखं वाटलं. यांचे बरेच चाहते असावेत मायबोलीवर. अनेकांनी त्यांचे लेख माबोवर शेअर केलेले दिसताहेत. वाचायला पाहीजे मुळातूनच..

http://www.maayboli.com/node/40066

उद्धटपणावर इलाज
http://www.maayboli.com/node/50296

त्याचं आणि माझं बजेट आणि क्रयशक्ती
http://www.maayboli.com/node/36471