मधोमध खेचणारा भोवरा

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 January, 2016 - 13:53

मुखवट्याला म्हणाला चेहरा
खरा आहेस तू की मी खरा

धरेला काय वाटे नेमके
पहा उतरून खाली अंबरा

सुरामध्ये कसा गातोस तू
कुणी गाणे शिकवले पाखरा

निरिच्छेने जवळ घेऊ कशी
सुखांनो घ्या कुठेही आसरा

मुळांना लागता धक्का जरा
फुलांचा जीव होतो घाबरा

नदीचे पात्र दिसते शांत ,पण..
मधोमध खेचणारा भोवरा

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये ब्बात!
प्रत्येक शेर खास!!

>>>मुळांना लागता धक्का जरा
फुलांचा जीव होतो घाबरा>>>अहाहा...क्या बात है!

सहीच ग!

मला हे दोन खूप भावले ... Happy
<<निरिच्छेने जवळ घेऊ कशी
सुखांनो घ्या कुठेही आसरा

नदीचे पात्र दिसते शांत ,पण..
मधोमध खेचणारा भोवरा>>

धरेला काय वाटे नेमके
पहा उतरून खाली अंबरा

नदीचे पात्र दिसते शांत ,पण..
मधोमध खेचणारा भोवरा>>>> व्वाह! अप्रतिम!

मुळांना लागता धक्का जरा
फुलांचा जीव होतो घाबरा ...

नदीचे पात्र दिसते शांत ,पण..
मधोमध खेचणारा भोवरा >>> अगदी अप्रतिम...