कोक्पर - ५

Submitted by उदय८२ on 27 January, 2016 - 04:07

कोक्पर - ४

सुलेमानच्या चेहर्‍यावर पुढे काय हा प्रताप करणार आहे असे भीतीदायक प्रश्नचिन्ह उमटले.

"युसुफ मी तुला विचारतोय तेल कुठून चोरणार होतास?" युसुफकडून काहीच उत्तर आले नाही तेव्हा डेव्हिड उठला आणि खोलीत फ़ेर्‍या मारू लागला. युसुफ त्याच्याकडे वेड्यासारखा पाहू लागला. फिरता फिरता डेव्हिडने सिगार खिशातून काढला. सिगारकटरने मागील भाग कट करून शांतपणे सिगार सुलगावली. कटरशी खेळत खेळत घड्याळात पाहिले. साडेचार वाजले होते. एव्हाना सगळे स्नायपर आपापल्या जागी पोहचले होते. बर्‍याच टीमची सर्च ऑपरेशन्स संपत आली असतील. संशयितांची तपासणी रायनो आणि विल्यम्स करणार असल्याने डेव्हिडकडे तसा बराच वेळ होता. दहा मिनिटे फिरून झाल्यावर डेव्हिड थांबला आणि युसुफकडे वळला. तीनचार पावलांतच युसुफ जवळ पोहचला.....

एक किंकाळी आणि युसुफच्या उजव्या हाताच्या पंजातून रक्ताची धार वाहू लागली. त्याच्या उजव्या हाताची तर्जनी सिगारकटरने उडवली होती. युसुफच्या चेहऱ्यावर राग, वेदना दिसू लागल्या. श्वास जोरजोरात चालू होता. दातांखाली ओठ दाबून तो वेदना सहन करण्याचा प्रयत्न केला. पण निष्फळ ठरला. कारण सिगारकटर आता रक्ताला चटावलेला होता...
"युसुफ तेल कुठून चोरी करणार होतास सांगतोस की? "
"अश्फाक सालेमने पाठवले. अश्फाक सालेम ने कामगिरी दिली आहे" युसुफ तिसरे बोट उडवल्यानंतर किंचाळला. युसुफला इंग्लिशमध्ये बोलताना बघून सुलेमान तोंडात बोटच घालायचे बाकी होता.
"तरीच अजून पर्यंत तुझे तोंड बंद होते.. अश्फाककडे कामगिरी सोपवली आहे. सांग आता नीट."
"माझ्या पोराला जाऊ द्या. तो यात सामिल नाही," अकिलकडे बघून युसुफ दयनिय नजरेने म्हणाला.
"नक्कीच, जर तू मला सांगितले तर. नाहीतर... " कटरचा आवाज करत डेव्हिड म्हणाला.
"तू नक्कीच नरकात जाशील ह$%^&.. "
"हो आणि मला तोच हवा आहे. कारण या मार्गावर चालून तुम्हाला जन्नत नशीब होणार आणि तुझ्यासारख्याबरोबर मला जन्नत वाटून घ्यायची नाही... मी आपला नरकातच बरा." डेव्हिडने हसत उत्तर दिले. "आता बोल लवकर"
" अश्फाकचा स्लिपिंगसेल अॅक्टिवेट झाला आहे. त्या नेत्यांना हल्ला करून सोडवायचा बेत आहे. त्यांच्या जोडीला स्लिपिंग सेल्सची फोर्स देखील आहे. तेल म्हणजे नेते म्हणून तेलाची चोरी असा कोड होता "
"आम्ही इथे असताना देखील हल्ला होणार? "
"हो... तीनचार दिवस झाले. याची पुरेपूर तयारी चालू आहे.. "
"आणि हमला विफल झाला तर...? "
",,,,,,,, "
सुलेमानने डेव्हिडकडे पाहिले. युसुफ हसू लागला होता.
"हल्ला आम्ही विफल करणारच तेव्हा काय? "
"आमच्याबरोबर आमचा देव आहे; आम्ही निष्फळ होऊच शकत नाही"
डेव्हिडने झटक्यात पिस्तूल काढले आणि अकिलच्या पायावर गोळी झाडली.. ठ्ठो...
"अल्लाऽऽ अम्मीऽऽ "
"ह$%^&, मा$%^& सैतानाची अवलाद आहेस तू. "
"हल्ला विफल झाला तर युसुफ?" पिस्तुलीची नळी आता अकिलच्या दुसर्या पायाकडे वळली.
"नाहीऽऽ. हल्ला विफल झाला तर किंवा तसे वाटू लागले तर मी आणि फ्रंट्लाईन३ हे स्लिपरसेलला संदेश पाठवणार होतो की "कोक्पर"ला तयार करा म्हणून"
"कोक्पर ? हे काय आहे युसुफ?" डेव्हिड किंचाळला. पण उशीर झालेला. अकिलच्या पायाच्या दिशेने झाडलेली गोळी युसुफने अचानक मूव्ह होऊन मध्ये येऊन डोक्यावर झेलली. कवटीची शकले उडाली. सुलेमान जागच्या जागीच उडाला. युसुफने योजना सांगण्याआधीच आत्मघात केला होता.
"सर.. "कोक्पर" काय आहे हे कळायला हवे होते. " सुलेमान हताश होऊन म्हणाला.
"कळेल आपल्याला.. सध्या आपल्यावर हल्ला होणार आहे हे नक्की आहे. इतकी तर माहिती आपल्याला मिळाली. हल्ला निष्फळ झाला तरच कोक्पर ना? त्यासाठी आपल्याला हल्ला निष्फळ करायला हवा... " बोलता बोलता तो उभा राहिला आणि त्याने अकिलच्या डोक्यात शांतपणे गोळी घातली. सुलेमान बघतच बसला.

"सर हा तर... "
"युसुफ पेक्षा खतरनाक अतिरेकी आहे. बाराव्या वर्षीच याने ओलीस ठेवलेल्या पत्रकाराचा शिरच्छेद केलेला. इथे येताना माझ्याकडे अपडेटेड माहिती आली होती. त्यात युसुफ आणि अकिलची माहिती होती. मगाशी जो हल्ला झाला त्या जीपमधूनच हे दोघे आले होते असा माझा संशय आहे. कारण त्या जीप मधल्या एकदोघांचे फोटो मी हेडक्वार्टरला पाठवले होते. हे दोघे त्यांच्याच टीम मध्ये असतात अशी माहिती मिळाली. आणि युसुफला कितीही टॉर्चर केले तरी तो तोंड उघडणार नाही म्हणून अकिलला टार्गेट केले. फोटो काढलेले का? घराची सगळी तपासणी झाली? "
"हो सर," बाजूला उभा असणार्‍या सार्जंटने सांगितले.
"मग वाट कसली बघताय? उचला यांना; खाली घेऊन चला. " चार सार्जंट्सनी दोन्ही मृतदेह खाली आणले.
"अतिरेक्यांचा धर्म नसतो" असे म्हणतात ना. मग यांना दफन केले काय आणि जाळले काय कुणाला फरक पडतो?" डेव्हिड हसत सुलेमानला म्हणाला.
डेव्हिडच्या इशार्‍यावर एका सार्जंटने जीपमधला पेट्रोलचा एक्स्ट्रा कॅन आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकले आणि डेव्हिडने तोंडातला सिगार त्यांच्यावर फेकून दिला.
"यांचे काम संपले आणि आपले देखील. नो नीड टू टेक केअर. मूव्ह सार्जंट्स."

डेव्हिडने वॉकीटॉकी काढून अॅर्नॉल्डला कॉन्टॅक्ट केला.
"कमिंग विल्यम्स कमिंग."
"रॉजर."
"नवीन अपडेट आले आहे. त्यातले दोन जण दगडी घराच्या पुढच्या इमारतीत मिळाले. काही माहितीही हाती लागली आहे. सेंटरब्लॉक वर या लगेच. ओव्हर"
"ठीक आहे. मी पोचतोच. ओव्हर अँड आऊट."
डेव्हिड जीपने इमारतीकडे निघाला. रायनो तिथेच असणार होता. फक्त विल्यम्स पोहचला की नाही माहीत नव्हते. तो इथे आधीपासून असल्याने काही माहिती असण्याची शक्यता जास्त होती.
सहा मिनिटांत डेव्हिड इमारतीशी पोहचला. दहा-बारा लोकांना पकडून वरच्या मजल्यावर घेऊन जात होते.. रायनो आणि विल्यम्स नुकतेच पोहचत होते. डेव्हिडने लॅपटॉप काढून नव्याने आलेली माहिती त्यांच्या टॅब्सवर पाठवली.
"विल्यम्स ही नवीन माहिती आली आहे; त्यातले दोन मला सापडले. बाकीचे बघ यांच्यात काही आहेत का? यांनी त्यातल्या कोणाला पाहिले आहे का?"
"ठीक आहे.. मी इथे चेक करतो. मेजर मायकल निघालाय."
" हंऽऽ ठीक आहे. इन्फॉर्मेशन आहे की या नेत्यांना सोडवण्याचा जोरदार प्रयत्न होणार आहे आणि त्यांना माहीत आहे आपण इथे आहोत"
"तरी देखील? " रायनो म्हणाला
"हो... तरी देखील आपण वर डिस्कस करू. मला लॉटस यांनापण सांगायचे आहे. चल लवकर"
रायनो आणि डेव्हिड वर निघाले. अचानक थांबत डेव्हिड म्हणाला, "विल्यम्स तुला ’कोक्पर’ काय आहे, माहीत आहे?? "
" ’कोक्पर’? शब्द ऐकलेला नाही. कशाबद्दल आहे? "
"तेच शोधायचे आहे. तू तुझ्या ओळखीतल्यांना विचार. मला उत्तर हवेच." डेव्हिड गच्चीवर पोहचून जनरलला सॅटेलाईट फ़ोन लावला. विलिअम्स खालीच थांबून राहिला.
"कमिंग लॉट्स कमिंग ओव्हर"
"रॉजर लॉट्स ओव्हर"
"सर मला अपडेट्स मिळाले. त्यानुसार मला दगडी घराच्या मागच्या इमारतीमध्ये युसुफ आणि अकिल सापडले. मघाच्या हल्ल्यातूनच ते आले होते असे दिसते. जैश लिबरेशनचा म्होरक्या अश्फाकने तो हल्ला केला होता आणि त्या नेत्यांना सोडवण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्यांना माहीत आहे आम्ही इथे आहोत. तरी ते हल्ला करणार आहे. ओव्हर. "
"त्यांच्याकडून काय मिळाले. काही नकाशे वगैरे? ओव्हर"
"नाही फक्त दोन बंदुका आणि काही पैसे. त्यांचे काम फक्त मेसेज पोहचवण्याचा होते... ओव्हर"
"कसले मेसेज? ओव्हर"
"हल्ला निष्फळ झाला तर कोक्परला तयार करण्याचे सांगायचे होते. ओव्हर."
"कोक्पर?? कुणाला सांगणार होता? ओव्हर."
"तेच विचारत होतो. पण त्याने आत्मघाती प्रकार केला. ओव्हर"
"घाई केलीस वॉरहेड. लक्षात ठेवायला हवे होते की तो फिदायीन पथकाचा सदस्य आहे. ओव्हर"
"इट वॉज माय मिस्टेक. ’कोक्पर’ या शब्दाचा अर्थ माहीत करून घ्यायला हवा सर. ओव्हर."
"ठीक आहे. मी तो शब्द इंटेलिजंट्स कडे फॉरवर्ड करतो. त्यांच्याकडून नक्कीच कळेल ओव्हर."
"तो पर्यंत... एक मिनिट थांबा सर, ओव्हर" डेव्हिडचा वॉकीटॉकी वाजत होता
"वॉरहेड कमिंग ओव्हर"
"दिमित्री कमिंग सर; माझ्या उजव्या बाजूने काही जमाव फलक घेऊन येतो आहे. ओव्हर."
डेव्हिडने रायनोला ब्लॅकबर्डकडे डिटेल्स विचार म्हणून सांगितले.
"किती मोठा आहे? ओव्हर."
"कळत नाही माझ्यापासून किमान पंधराशे मीटर वर आहे. हातांत फलक आणि बॅनर आहेत. ओव्हर"
"फलकावर काय लिहिले वाच. ओव्हर"
"लोटस कमिंग चौकापासून पंधराशे मीटर नॉर्थवरून एक मोर्चा जमाव येत आहे. काय आदेश ओव्हर?"
"आपल्याला त्यांच्यात हस्तक्षेप करायचा नाही आहे. लक्षात ठेव. ओव्हर"
मधेच हळू आवाजात रायनोने जमाव तीनचारशेचा असल्याचे सांगितले
"लोटस कमिंग. ब्लॅकबर्ड तीनचारशेचा जमाव सांगत आहे. ओव्हर"
"ठीक आहे दहा मिनिटांत ऑपरेशन क्रॉसिंग तिथून पास होईल. जमावाला काहीच करू नका. ओव्हर"
"वॉरहेड कमिंग..मोर्चा सरकारविरोधी आहे असे वाटत आहे, ’नो वॉर' वगैरे असे लिहिलेले फलक आहेत. ओव्हर" दिमित्रीने वॉकीटॉकीवरुन संदेश दिला.
"लोटस कमिंग. सरकार विरोधी वॉर विरोधी असे फलक दिसत आहेत ओव्हर" डेव्हिडने दिमित्रीचेच वाक्य पुन्हा उच्चारले.
"साधा मोर्चा असेल मग तिथले पोलिस बघून घेतील. पोलिसांशी बोलून एके ठिकाणी थांबवायला सांग. मग "क्रॉसिंग" गेल्यावर जाऊ द्या... पण आपल्याकडून काहीच अॅक्शन नको. कीप मी अपडेटेड. ओव्हर अँड आऊट"

:क्रमशः

कोक्पर - ६
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं.....