जाता सातार्‍याला - "बारा मोटेची विहिर आणि दातेगड (सुंदरगड)"

Submitted by जिप्सी on 26 January, 2016 - 12:12

१. जाता सातार्‍याला . . . . .
२. "कास"ची फुलं "झक्कास"
३.रौद्र सौंदर्य - ठोसेघर धबधबा
४. "Mesmerizing" महाबळेश्वर
५.जाता सातार्‍याला - मेणवली, धोम, वाई परिसर
६.आसमंत
७.सातारा, कॅमेरा आणि बरंच काही...
==========================================================================
==========================================================================
व्हॉट्सअप व फेसबुकवर मध्यंतरी "बारा मोटेची विहिरीचा" फोटो आणि माहिती फिरत होती. माहिती खरीच होती पण जे फोटो व्हॉट्सअपवर फिरत होते ते गुजरात, पाटण मधील "राणीनी वाव" आणि "जयपुर-आग्रा रोडवरील "चांद बावडी"चे होत. "राणीनी वाव" व "चांद बावडी"च्याच तोडीची आपल्या महाराष्ट्रातील, सातारा जिल्ह्यातील शेरे लिंब गावची "बारा मोटेची विहिर" आहे.

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे "शेरी लिंब" नावाचे गाव आहे, या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीर आहे. शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत उदाहरण म्हणजे हि बारा मोटेची विहीर. हि विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी. साधारण शिवलिंगाचा आकाराची हि विहीर आहे. अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत. विहिरीस आलिशान जिना आणि आत उतरण्यास चोरवाटा आहेत. या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात. या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले. या विहिरीची खोली ११० फुट असून व्यास साधारण ५० एक फुट आहे. विहीर दोन टप्प्यात विभागली आहे. अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर. या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
(व्हॉट्सअप वरील माहिती)

अधिक माहिती या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
बारा मोटेपैकी अलिकडच्या ६ मोटा
प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४
दातेगड

दातेगडास भेट देण्यासाठी कराड-कोयनानगर मार्गावरल्या पाटण ह्या गावातून चाफोली रोडने १५ मिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. ही पायवाट थोड्या अंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस मिळते. या रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने पठारावर पोहोचता येते. तेथून साधारण २० मिनिटांच्या अंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते.
दातेगडावर जातांना वाटेतच एक भग्न प्रवेशद्वार लागते. या भग्न प्रवेशद्वारातून मार्ग काढल्यावर समोरच तटात खोदलेल्या १० ते १२ फुटी श्रीगणेशाच्या आणि हनुमानाच्या मूर्ती दिसतात. अशा प्रकारच्या मूर्ती फारच कमी किल्ल्यांवर आढळतात. समोरच असणार्‍या २० पायर्‍यांचा चढ चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहचतो. गड माथ्यावर डावीकडे वळल्यावर काही पायर्‍या खाली उतरतात. या पायर्‍या आपल्याला थेट ५० फुट खाली असणार्‍या विहिरीपाशी घेऊन जातात. ही विहिर म्हणजे वास्तुशास्त्रामधील एक अदभूत नमुना आहे. विहिरीच्या तोंडाशीच महादेवाची एक पिंड आहे. हे सर्व पाहून गडाच्या दुसर्‍या टोकाशी जावे. या ठिकाणी काही पाण्याची टाकी आढळतात. बाकी गडावर पाहण्यासारखे काही नाही. गडमाथा बराच निमुळता असल्याने फिरण्यास अर्धातास पुरतो.
(माहिती:- विकीपिडिया & ट्रेकक्षितिज.कॉम)

प्रचि १६
दातेगडावरील तलवारीच्या आकाराची विहिर
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

महाराष्ट्रात अजुन असाच काही "पाताळातील खजिना" दडलेला आहे त्यापैकी पालवण (जि.सातारा) व सामानगड (जिल्हा कोल्हापूर) हे माहित आहे. अजुन काहिची माहिती असल्यास इथे जरूर शेअर करा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.. असली विहीर मला प्रत्यक्ष बघायची आहे, कधी योग येतोय कुणास ठाऊक.. सध्या योगेश आहेच.

ही सगळी विहीर एका फोटोत मावेल, असा एखादा स्पॉट तूला मिळायला हवा होता.

शाहरुख आणि राणी मुखर्जीचा पहेली पाहिलास का ? त्यात अशा काही विहिरींचे अनोखे शॉट्स आहेत.

बापरे.. कुठे कुठे फिरत अस्तोस.. जिप्स्या नाव सार्थकच आहे Lol
किती पुरातन दिस्तंय हे सर्व.. ऑसम!!

मस्त. हेरिटेज बिल्डींग व्हायला हवी, पुढे व्यवस्थित सांभाळली जाइल. त्या लिंकमधले, विहिरीचे पाण्याने भरलेले फोटो मस्त...

नेहमीप्रमाणे फोटो भारी.
ही सगळी विहीर एका फोटोत मावेल, असा एखादा स्पॉट तूला मिळायला हवा होता>> अगदी हेच मनात आले.

इथे फोटो व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
हे बघितल्यावर कळते की आपले पूर्वज काय अन किती कसे महान होते.
कशी असतील ना ती माणसे भव्यदिव्य? तेव्हा तिथे वावरणारी, जगणारी, हे सगळे उपयोगात आणणारी?
आपल्याला उपयोगात आणणे राहुदेच, बघायला जाणेही शारिरिक दृष्ट्या अशक्य बनत चालले आहे पिढी दर पिढी गणिक...

मस्त फोटो आणि माहिती. मी सातारला खूप वेळा जाते . मला ही असा गोष्टीत रस आहे. आता इथे जाईन नक्की.

माझ्या माहिती प्रमाणे उन्हाळ्यात गारवा मिळवणे हा उद्देश असे असा महाला सारख्या विहीरी बांधण्यामागे.

जिप्स्या मस्तच.

खरेच काय पूर्वीचे कलाकार पण होते ना.

मागे मी माझ्या माहेरच्या विहीरीबद्दल लेख लिहीला होता. त्यालाही जीना आहे.

http://www.maayboli.com/node/30374

मस्त !

बापरे! तो गडदी महाल बघायला सुंदर दिसतो. अजून मजबुत आणि काळाशार दगडांचा आहे. ही चित्रे बघून वाटत तेंव्हाची लोक नक्की कशी राहत असतील. इतक्या उंचावर, दगडाच्या घरात. पहाडावर. इतक्या असुरक्षित परिस्थितीत. काय ते राजे आणि शत्रुंच्या स्वार्‍या. सगळे अजब वाटते.

सुंदर आहेत सगळे फोटो.. प्रचि १९ पाय-यांचा आवडला.

प्रचि १८ आणि २० पाह्ल्यासारखे वाटले. तु सामानगडाचा उल्लेख केलायस. बहुतेक मी तिथे गेलेय आणि असलीच विहिर तिथे पाहिलीय.

छान फोटो ..

पहिल्या फोटोंत जी विहीर दिसते ती १२ मोटेच्या विहीरीपैकी अष्टकोनी विहीर असावी असं वाटतं पण आकार मात्र अष्टकोनी कळून येत नाही फोटोत ..

मोट म्हणजे काय ते विसरले .. कोणी सांगू शकेल का?

मस्त फोटोज !
मोट म्हण्जे दोन लाकडांवर एक चाक लावलेलं असतं आणि त्यावरुन दोरी सोडुन पाणी काढलं जातं ते.
प्रचि ११ मध्ये ३ मोटांसाठीचे खाचे दाखवले आहेत.

श्री, त्याला रहाट म्हणतात ना? की रहाट आणि मोट एकच?

वरच्या फोटोत कळत नाही ते पुली सारखं स्ट्रक्चर .. हे रहाट प्रकरण मी लाकडीच बघितलेलं आहे .. ते तसं असेल तर इतक्या वर्षांनंतर टिकणं कठीण असेल .. पण वरच्या फोटोत आहे तसं काही दगडी बांधकाम आणि रहाटापेक्षा थोडं वेगळं काही असेल असं वाटतंय ..

>> प्रचि ११ मध्ये ३ मोटांसाठीचे खाचे दाखवले आहेत

तीन नव्हे सहा .. Happy

हो बरोबर , ते रहाट आणि चामड्याची पिशवी म्हणजे बहुतेक मोट, माझा गोंधळ झालाय.
वर आहे त्या फक्त खाचा आहेत , त्यात रहाट लागेल आणि मोट/दोर बैल जोडुन ओढ्ली जाते. दोन खाचांमध्ये पाणी जाण्यासाठी पाट आहे.
सशल तिथे फक्त ३ रहाट / मोट उभे करता येतील.mot.jpg

छान फोटो. Happy
१२ मोटा म्हणजे इतका जास्त पाणी साठा, किंवा इतका मोठा व्यास ह्याचं प्रतिक आहे ना?
त्या विहिरीभोवती महाल का बांधलाय? त्याचा उपयोग कसा करतात? रहायला का? प्रची ७ मध्ये गोल विहीर वाटत्येय, आणि ११ मध्ये (जिकडे ६ मोटा दाखवल्यात) तिकडे आयात/ चौरस. असं का? ह्या दोन वेगळ्या विहिरी आहेत का?
का खाली गोल, आणि वर महाल बांधायला सोपं म्हणून वरचा शेप चौकोनी केलाय?

Pages