जबाबदारी - मुलींची आणि मुलांची

Submitted by उडन खटोला on 25 January, 2016 - 12:32

नमस्कार मंडळी
आज एका नवीन अन संवेदनशील विषयावर चर्चा करून आपली मते आजमावायची आहेत ...

आजकाल भारतीय / हिंदू समाजामध्ये एकच अपत्य होऊ देण्याची प्रथा रूळली आहे. आईवडिलांची आर्थिक परिस्थिति ,मुलांच्या शिक्षणावर होणारा अफाट खर्च याबरोबरच मुलगा-मुलगी समान समजून "मुलाची वाट पाहत अधिक अपत्ये " वाढवण्या विरुद्ध सरकारचा जोरदार प्रचार तसेच अन्य काही घटक या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल किंवा पती -पत्नीना अधिक मुले होऊ देणे योग्य वाटत नसल्याने म्हणा , समाजात एकच अपत्य असणार्‍या अथवा एकच मुलगी असणार्‍या कुटुंबांची संख्या प्रचंड वाढत असलेली दिसून येते...

अतिप्राचीन भारतीय हिंदू संस्कृतीतील आध्यात्मिक समजुतीनुसार मातापित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पुत्राने त्याचे उत्तरकार्य अथवा श्राद्धकर्म केले असता त्या पितरांस सद्गती लाभते असा शास्त्रादेश असल्याने "घराण्याचा कुलदीपक " म्हणून एक तरी मुलगा हवाच ... असा हट्ट असे. आज मुलांप्रमाणेच मुलीदेखील उच्चशिक्षण घेवून पैसा कमावत असतात व जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे आहेत , असे असताना एक करूणाजनक चित्र देखील डोळ्यासमोर उभे राहत आहे ,ज्यामुळे एकाच अपत्यावर थांबण्याचा अथवा एकाच मुलगी पुरे म्हणण्याचा हा हट्ट उद्या तुम्हालाच खड्ड्यात टाकणारा ठरू शकेल अशी सार्थ भीती वाटते ... त्यासाठीच हा लेखनप्रपंच ......

समाजात अनेक ठिकाणी असे दृष्टीस पडते की एकच मुलगी असलेल्या घरांत मुली शिक्षित होवून नोकरी करून स्व-निर्णयाने नवरा निवडतात , तो कदाचित (बर्‍याच वेळेला ) आंतरजातीय अथवा आई-वडिलांच्या मर्जीविरुद्ध असतो . मग लग्नानंतर नाइलाजाने जावयाशी जुळवून घेतले जाते .अथवा कटुता तशीच राहते ..आणि ... आईबाप वृद्ध होतात ,अन एके दिवशी या जगाचा निरोप घेतात ..मग जावयाला आयती प्रॉपर्टी मिळते ..... म्हणजे त्याची फुकट मजा .....

इकडे ज्या आईबापाने आपल्या स्व-कमाईचा मोठा हिस्सा खर्चून मुलीला चांगले शिक्षण व सोयीसुविधा दिलेल्या असतात ,त्याचे त्यांना काय रिटर्न्स मिळतात? नुसत्या मायेपोटी एवढा मोठा त्याग करणे कितपत सयुक्तिक? आज अनेक ठिकाणी अशी परिस्थिति आहेकी मुलगी व जावई करोडपती असून महिन्याला लाखात उत्पन्न असताना देखील मुलीचे आईबाप मात्र हलाखीच्या परिस्थित जगत आहेत... म्हणून मला वाटते की यास्तव एकच अपत्याचा हट्ट सोडावा आणि हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे ... आणि ते उपकार म्हणून नव्हे तर आईबापाणी तुमच्या पालन-पोषण/ शिक्षणावर केलेल्या खर्चाची परतफेड म्हणून...!

आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेमका प्रॉब्लेम नाही कळाला.
मुलगी दिवे लावते त्यामुळे प्रॉपर्टी जावयाला मिळते हा प्रॉब्लेम असेल तर इच्छापत्र करून समाजाच्या (बिरादरी वाला समाज) नावे प्रॉपर्टी करू शकता की !

मुलगा अथवा मुलगी दोघांनाही आई वडलांची देखरेख करणे बंधनकारक आहेच.अर्थात बर्‍याच ठिकाणी केली जात नाही हे कडू वास्तव आहे.

मग जावयाला आयटी प्रॉपर्टी मिळते ..... म्हणजे त्याची फुकट मजा .....>>>>>>> शक्य असतं तर बरेचजणांनी आपापल्या इस्टेटी , आपल्याबरोबर वरती नेल्या असत्या.

म्हणून मला वाटते की हे कायद्याने कंपल्सरी करावे की मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या उत्पन्नातील ठराविक वाटा लग्नानंतर आईबापाला दिलाच पाहिजे
<<
असा कायदा ऑल्रेडी आहे.

शक्य असतं तर बरेचजणांनी आपापल्या इस्टेटी , आपल्याबरोबर वरती नेल्या असत्या.
<<
लय भारी Lol

मग जावयाला आयटी प्रॉपर्टी मिळते ..... म्हणजे त्याची फुकट मजा Lol

बालपण आठवले. लहानपणी मला जेव्हा परीक्षेत कमी मार्क पडायचे तेव्हा वाटायचे की शिकून काही तीर मारता आले नाहीत तर एखादी बड्या बापाची एकुलती एक पोरगी पटवावी, जेणे करून तो टपकल्यानंतर त्याची जायदाद आपली Wink

पुढे वयात आल्यावर कॉलेजात अशी एक श्रीमंत मुलगी हेरलेली. ७०-८० टक्के कामही झालेले. पण जसे तिच्याबद्दल जवळून जाणून घेऊ लागलो तसे लक्षात आले की मुलगी प्रचंड अहंकारी आहे. उगाच या नादात बायकोच्या ताटाखालचे मांजर आणि सासर्‍याच्या हातचा कुत्रा व्हायची वेळ यायची. एकवेळ हे देखील परवडले, पण त्या का रे दुरावा मधील अदितीच्या जय सारखे बिनशिंगाचा रेडा बनावे लागले तर आणखी हालत. त्यापेक्षा एखादी गरीबाघरची गाय बघा आणि मस्तवाल बैलासारखे जगा.

मग जावयाला आयटी प्रॉपर्टी मिळते >>
आजकाल आयटीतले लोक बरीच प्रॉपर्टी बनवायला लागलेत. या आयटीवाल्यांचं खरंच कायतरी करायला पायजे.

इयत्ता सातवी मधे मला प्लेटॉनिक लव्ह झाले होते. पन त्या मुलीच्या दूरच्या काकांना प्लेटॉनिक या शब्दाचा अर्थ काहीतरी जबरी झांगडगुत्ता असा वाटल्याने त्यांनी प्लेटॉनिक गुप्तीच्या सहाय्याने त्या लव्हबद्दल चर्चा केल्याने पुढे थेट योग्य वयात लव्ह न होताच लग्न झाले.

Proud

निर्लज्ज युक्तीवाद !

सासर्‍याची प्रॉपर्टी म्हणे जावयाला मिळते !

नवरा , त्याचे आईबाप यांच्या सर्व संपत्तीचा उपभोग सून घेत नसते का ? की , ती लग्नानंतर झाडाखाली जाऊन झोपते ?

नवरा दारुडा असेल , बायकोचा पगार व माहेरची इस्टेट मोडून खात असेल तर ते चूक आहे. पण कर्तबगार स्वावलंबी असेल तर बायको / माहेरच्यानी त्रागा करुन घेउ नये.

नवर्‍याची व बायकोची वाडवलिर्जित एस्टेट त्यांच्या भावी पिढीकडे सुरक्षितरीत्या जाते का , इतके बघणे महत्वाचे आहे.

सासर्‍याच्या इस्टेटीचा जावई फारसा उपभोग घेत नसतो. सासर्‍याचे शेत , बंगला यात जावई स्वतःचा नोकरी धंदा सोडून जाईल का ? उलट , बायकोच नवर्‍याकडल्या गोष्टींचा जन्मभर उपभोग घेत असते.

इतका त्रागा होत असेल तर मुलीनी स्त्रीसत्ताक पद्धत आणावी

..

हा लेख वाचला तेव्हा मला इथे जामोप्या प्रतिसाद द्यायला आणि आपलं तेच तेच दु:ख उगाळायला नक्कीच येणार हे वाटलं होतं. आणि झालंही तसंच. Wink

Proud

दोन नोकर्‍या करुन माझा संसार मी चालवतोय ... सासर्‍याची इस्टेट ( १ एकर शेत ) यदाकदाचित मला मिळालीच तर मी तर त्याचा आनंदाने उपभोग घेणार .

माझ्या एकुलत्या एक मुलीला व जावयालाही माझी इस्टेट आनंदाने देऊन टाकणार !

मागच्या पिढीतल्या लोकानी मनसोक्त संसारसुख भोगून पोरं काढली , म्हणूनच नव्या पिढीला एका अपत्यावर थांबावे लागत आहे. त्याबाबत पश्चाताप न करता उलट नवीन पिढीच आमचं खाते म्हणुन उलट बोंब मारणं ही लबाडीच आहे.

अहो जामोप्या, लेखक हिंदू धर्मात असंही म्हणतायत तेव्हा नका तुम्ही लक्ष देऊ आणि जीवाला लावून घेऊ. आमचा धर्म हा असाच आहे बघा. Proud

नै म्हणजे मी काय म्हणतू ... येवढा प्रॉब्लेम हाय त कशाला घालता पोरे जन्माला? ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी! राहिल इष्टेटीच, असली तर म्हातार झाल्यावर होईल त्येचा उपेग तुम्हालाच!

नाय का?

Proud

तुमचा धर्म आम्हाला आवडत नाहीच .. पैसा , वारस असल्या भंपक प्रश्नांचे भांडवल करुन दुसर्‍यांचे संसारसुख कसे नासवावे , यात तुमचा धर्म एक्स्पर्ट आहे.

जाऊ द्या हो जामोप्या,
तुमची मुलगी अजून काही वर्षांनी कायम बुरखा घालून वावरणार, तुम्ही म्हणाल याच्याशी निकाह करणार.
तुमच्या बद्दल बोलतच नाहीत ते खटोलाजी.
ते हिंदु धर्मात, मोकळ्या वातावरणात वाढवलेल्या कृतघ्न मुली आंतरजातीयविवाह करतात ना , त्यांच्याबद्दल बोलतायत.

हिंदु धर्मात, मोकळ्या वातावरणात वाढवलेल्या कृतघ्न मुली आंतरजातीयविवाह करतात ना >>> Proud

सुंदर लेख.

मुलींना वाढवून काहीही रिटर्न्स मिळत नाहीत हे सांगितले ते बरे केलेत. मुलांना वाढवून काय रिटर्न्स मिळतात ते सांगितले असते तर मी माझी किती अपोर्चुनीती कॉस्ट गेली त्याचा विचार करून थोडे रडले असते.

जे आईबाबा मुलांना वाढवताना रिटर्न्स चा विचार करतात त्यांची मुले ते रिटर्न्स त्यांच्या तोंडावर फेकून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणारच. त्यांनाही स्वतःच्या मुलांना वाढवून स्वतःच्या रिटर्न्सची तयारी नको काकारायला.

साधना ताई +१

मुलींना असे म्हणण्यात मलातरी काही अर्थ वाटत नाही. कारण आजकाल बरेच मुलं देखील दिवटे निघालेले पाहायला मिळतात.

माझ्या मते कमावलेला पैसा जावयाला किंवा मुलाला द्यायची मुळात काही गरज नाही.
मुलांना उत्तम शिक्षण द्यावे. लग्न वगेरे करून सगळे व्यवस्थितपणे करून दिले कि पुरेसे आहे.
घर घेऊन द्या, गाड्या घेऊन द्या हे कशाला हवे.?
एक मिनिमम अमोउंट ऑफ प्रॉपर्टी दिल्यास ठिकाय पण अति देऊन ओव्हरलोड करू नये. कारण समाजात असे इतर कितीतरी मुले आहेत ज्यांना गरज असते पैश्यांची अशांच्या शिक्षणाला पैसे द्यावेत. अनेक सामाजिक संस्था असतात, त्यांना उर्वरित सगळी रक्कम दान करावी असे मला वाटते.

माझ्या आईवडलांनी मला उत्तम शिक्षण दिलेय, पुरेसे सक्षम बनवले आहे. हि एवढीच त्यांची जबाबदारी होती असे मला वाटते. आता मला जे हव ते मी करेल. आणि शेवटी अर्थात मी सुद्धा माझी सगळी प्रॉपर्टी दान करेल.

वैयक्तिक जबाबदारी, गरजा संपल्या कि कुठेतरी सामाजिक जबाबदारी कडे पहिले पाहिजे असे मला वाटते. माणसाच्या गरजा वास्तविक फार कमी असतात. आपणच त्या काहीतरी मनाचे खेळ करून वाढवत नेतो. कारण आपल्या जगात फक्त आपण असतो. मला वाटत आपले जग म्हणजे फक्त आपण नसून आपला देश किंवा समाज असायला हवा.

कोणी पॉपकॉर्न देता का, पॉपकॉर्न ?

त्याच त्याच काडीटाकू विषयांवरचे
लेख, कविता, विनोद वाचताना खायला !

कोतबो, कोतबो करत
राजकारणाचं दळण दळणार्‍या घडामोडी वाचताना चघळायला !

कोणी पॉपकॉर्न देता का....

झगड्या, एस टी स्टॅंडवर जा, स्वस्तात मिळतील.

नाहीतर अ‍ॅक्ट थ्री चं पाकिट आणा.

घरच्या घरी तय्यार, खाने में मजेदार!

बायकोच्या वडिलोपार्जित इस्टेटीवर नवर्‍याचा हक्क आपोआप नसतो.>>

हो, त्यासाठी आधी बायकोचा खून बिन करावा लागतो.

(अधिक माहितीसाठी जुन्या काळातले 'बडे बापकी बेटी, तिच्यावर डोरे डालून इस्टेटपे कब्जा करनेकी ख्वाईश रखणारा मॅनेजरका खलनायक बेटा आणि गरिबाघरचा हिरो!)

Wink

जगताना माणसं बरंचा काही गोळा करत असतात,ते स्वतःसाठीच असते.आपणच त्याला हे मी माझ्या मुलासाठी,मुलीसाठी करतोय अशी नावं देतो.पण संग्रह करायच्या वृतीने खरं तर पसारा वाढवतो.पूर्वीचे लोक म्हणायचे की इस्टेट नाही ठेवता आली तरी चालेल पण मुलाबाळांवर कर्ज ठेवता नये.आताचे आईवडील म्हणतात की आम्हाला कष्ट पडले तसे पुढे मुलांना कष्ट पडू नये.
जाताना मुलामुलींपैकी कोणीही घेऊ दे की ती संपत्ती.ठेवली तरी रड आणि नाही ठेवली तर उलट गेलेल्याच्या नावाने शिमगा.

वैयक्तिक जबाबदारी, गरजा संपल्या कि कुठेतरी सामाजिक जबाबदारी कडे पहिले पाहिजे असे मला वाटते. माणसाच्या गरजा वास्तविक फार कमी असतात. आपणच त्या काहीतरी मनाचे खेळ करून वाढवत नेतो. कारण आपल्या जगात फक्त आपण असतो. मला वाटत आपले जग म्हणजे फक्त आपण नसून आपला देश किंवा समाज असायला हवा.>>>>>>>>> +१

Pages