चोरटे सडे!

Submitted by सत्यजित... on 25 January, 2016 - 05:43

उरता अंतर फार तोकडे...
घट्ट मिठी..मग पार अवघडे!

नको पडाया पाय वाकडे...
किती बहाणे..नको ना गडे!

वेचुन घेवू रात आजची...
प्राजक्ताचे चोरटे सडे!

तुझी नि माझी भेट व्हायची...
लख्ख चांदणे नेमके पडे!

चमकदार घामाची रेषा...
शिखरावरचे गूज उलगडे!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही !!

मस्त...