धारित्रीचे स्वयंवर सूर्य घडवू देत नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 January, 2016 - 05:05

हवेतुन गंध त्याचा ज्या दिशेने येत नाही
तिथे हेतूपुरस्सर जाणिवांना नेत नाही

दवांचे गुंफले हारांमधे अनमोल मोती
धरित्रीचे स्वयंवर सूर्य घडवू देत नाही

जरी धज्जा उडवला वास्तवाच्या काहिलीने
स्मृतींचे चांदणे वितळायचा संकेत नाही

पुन्हा पहिल्यापरी पड़ते जरी थंडी गुलाबी
शरीराचा निखारा पेट काही घेत नाही

मनातिल गैरसमजांच्या द-या रुंदावलेल्या
मनांना जोड़णारा पूलही वाटेत नाही

मनुष्याच्या पुढे आदर्श व्यभिचारी ऋतूंचा
कुणी सुधरेल याची काळ ग्वाही देत नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users