अजून बाकी आहे

Submitted by vilasrao on 22 January, 2016 - 23:33

भोग भोगायचे अजून बाकी आहे!
पाश तोडायचे अजून बाकी आहे!

दूर गेले मनातले अता श्रावणपण
मोर नाचायचे अजून बाकी आहे!

भेटतो रोज सावकार तो हा रस्ता
आज टाळायचे अजून बाकी आहे!

घोषणांनी भरून सांडले नेत्यांनी
ताट वाढायचे अजून बाकी आहे!

फक्त मोजा जित्या बळीराजांना
फास बांधायचे अजून बाकी आहे !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users