ड्वोरॅक आराखडा

Submitted by अभि_नव on 21 January, 2016 - 04:29

टंकलेखन यंत्र अस्तित्वात आले तेव्हा सुरुवातीला त्यांच्यावर ईंग्रजी अक्षरांची मांडणी अक्षरानुक्रमे होती. सर्वात वरच्या ओळीत A, B, C, D या प्रमाणे. यांत्रीक टंकलेखन यंत्रात ज्या पट्ट्या कागदावर आपटून अक्षरे उमटतात त्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण या सोप्या आराखड्यात खूप होते.

या वर उपाय म्हणून क्वर्टी आराखडा प्रचलीत झाला. यात सर्वात वरच्या ओळीत सुरुवातीचे ईंग्रजी अक्षरं Q,W,E,R,T,Y असे येतात म्हणून याचे नाव QWERTY KEYBOARD. यात पट्ट्या एकमेकांत फसण्याचे प्रमाण त्यामानाने बरेच कमी‌ झाले. संगणक आल्यानंतर सर्वात प्रचलीत आराखडा म्हणून संगणकाच्या कळफलकावही तोच वापरला गेला आणि आजही हाच आराखडा सर्वात जास्त प्रचलीत आहे.

परंतु, या क्वर्टी आराखड्यामधे ईंग्रजी भाषा टंकताना एकाच पंजावर जास्त ताण येणे ई. तोटे आहेत. यावर डॉ. ऒगस्ट ड्वोरॅक आणि त्यांचे मेहुणे डॉ. विलियम डेलेय यांनी संशोधन केले आणि कळफलकावरील अक्षरांच्या स्थानाची अदलाबदल करुन एक नवा कळफलक आराखडा तयार केला. यात ईंग्रजी भाषा टंकताना दोन्ही मनगटांच्या स्नायुंचा समान उपयोग केला जातो त्यामुळे एकाच पंजावर जास्त ताण येत नाही.

यालाच ड्वोरॅक लेआऊट असे म्हणतात आणि सिंपलीफाईड ड्वोरॅक लेआऊट खालीलप्रमाणे दिसतो:

विकीपिडीया वरुन साभार.

यातही काही किरकोळ बदल करुन वेगवेग़ळ्या उगयोगासाठी वेगवेगळे ड्वोरॅक आराखडॆ बनवले गेलेले आहेत. तसेच अमेरीकन व ब्रिटीश ईंग्रजीतील फरकाप्रमाणेही वेगळे ड्वोरॅक आराखडॆ आहेत.

मला या बद्दल सर्वात आधी २00९ च्या आसपास समजले. त्यानंतर या आराखड्याबद्दल अजुन वाचले असता असे लक्षात आले की, काही चर्चांमधे याचा प्रचार करताना टंकन वेग वाढतो असा फायदा सांगत आहेत. जे पुर्ण सत्य नाही. त्यामुळे अनेक जन निराश होऊन याच्या विरुद्ध मत प्रदर्शन करताना दिसतात.

याचा मुख्य उपयोग संगणकाची आज्ञावली लिहिणे आणि या सारख्या ईतर भरपुर वेळ सलग टंकन करण्याची आवश्यकता असण्या-या व्यक्तींना आहे. आणि हाच मुख्य मुद्दा लक्षात घेऊन अतिंमत: मी हा आराखडा शिकण्याचा निर्णय घेतला. आधीचा क्वर्टी आराखडा मी थेट टंकनयंत्रावरच शिकलो असल्यामुळॆ आधीच मला खाली न बघता वेगात इंग्रजी टंकन करता येत होते. त्यामुळे नवीन आराखडा आत्मसात करणे सोपे गेले.

आंतरजालावर उपलब्ध असलेल्या कोणत्यातरी ड्वोरॅक आराखड्याचा सराव करण्याच्या संकेतस्थळावरुन मी सलग ३ दिवस बसुन हा आराखडा आत्मसात केला आणि मला तो लगेच जमला हे मला अजुनही आठवते आहे.

आपल्याला जर हा आराखडा वापरायचा असेल तर संगणकाच्या स्थापत्य मधे जाऊन कीबोर्ट सेटींग किंवा कीबोर्ड लेआऊट अशी‌ सेटींग शोधा आणि तिथुन तुम्ही हा आराखडा तुमच्या कळफलकाच्या यादीत समाविष्ट करुन शकता. एका वेळी एकापेक्षा जास्त आराखडे ठेवण्याची सोय आहे पण कोणत्याही एका वेळेला एकच वापरता येतो. क्वर्टी मधुन ड्वोरॅक आणि परत बदल करण्यासाठी तुमच्या ओपरेटींग सिस्टीम नुसार एक कीबोर्ड शॉर्टकड असेल तो वापरु शकता.

ड्वोरॅक का वापरावा याबद्दल समर्थन करणार्या काही चर्चांमधे कार्पेल टनल सिन्ड्रोम याबद्दल माहिती मिळाली. पण क्वर्टीच्या सलग खुप वापरण्याने याचा किती टक्के लोकांना अनुभव येतो अशी काही आकडेवारी वाचायला मिळाली नाही.

तुम्ही पण हा आराखडा वापरुन बघा आणि सलग खुप वेळ टंकताना मनगटाच्या स्नायुंना जास्त आराम वाटतो का ते बघा. मी जेव्हापासुन हा आराखडा वापरायला सुरुवात केली तेव्हापासुन् क्वर्टी पेक्षा मला हाच जास्त चांगला आणि वेगवान वाटला म्हणुन मी हाच वापरत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख. मी क्वर्टी वापरतो पण माझे टंकलेखन पारंपरीक पद्धतीने होत नाही. मी डाव्या हाताचा वापर फार थोडा करतो ( काही कीज पुरताच )

संगणकाच्या स्थापत्य म्हणजे काय ? काही शब्द इंग्लिशच ठेवले तर बरे होइल . उगीच ते अग्निरथ- आवक्जावक दर्शक पट्टिका असे होते.

छान माहिती.
रेमिंगटन च्या मॅन्युअल टाइप राइटरवर टायपिंग शिकल्याने , QWERTY शिवाय दुसरं काही जमतंच नाही . पण तरी एकदा प्रयत्न करुन बघायला हरकत नाही. Happy

ईंटरेस्टींग. माझ्यासाठी ही नवीन माहीती आहे.

मला वैयक्तिकरीत्या तसा फायदा नाही कारण मला टाईपिंगची गरज जेमतेमच लागते. जे काही करतो ते मायबोलीवरची मराठी टाईपिंगच. ते देखील एकेक बोट वापरत..

पण इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.

काही शब्द इंग्लिशच ठेवले तर बरे होइल >> यावर वेगळा चर्चेचा धागा काढला जाईल. याबाबत अजुन काही काम करने डोक्यात आहे. याबद्दल नंतर कधीतरी.

छान लेख आहे स्पॉक.
पण मला नीट कळाले नाही. आपण तो ड्वोरेक आराखडा घेतला तरी आपल्या कीबोर्डवर तर qwerty पद्धतीनेच लिहिलंय ना.? मग हे कस adjust व्हावे.?
म्हणजे कीबोर्ड वरचं s दाबल्यावर o उमटेल आणि x दाबल्यावर q उमटेल का.? Uhoh
कि किबोर्डचे बटन काढून त्यात दाखवल्याप्रमाणे लाऊन घ्यायचेत .?

कि किबोर्डचे बटन काढून त्यात दाखवल्याप्रमाणे लाऊन घ्यायचेत .?
नाही हो!
कीबोर्डवरचे बटन आहेत तसेच राहतील.
आपण फक्त त्याचे की मॅपींग सॉफ्टवेअर मधुन बदलणार आहोत. त्यासाठी ओएसच्या मेन कीबोर्ड लेआऊट सेटींग मधे जाउन ड्वॉरॅक अ‍ॅड करा.
आता तुम्ही तुमच्या क्वर्टी कीबोर्डवर क्वर्टी तसेच ड्वॉरॅक दोन्ही पद्धतीने लिहू शकता.
खाली टुलबारबर US किंवा तत्सम लिहिलेले किंवा कीबोर्डचे चिन्ह असलेले छोटे चित्र येईल. त्यावर क्लिक करुन किंवा तुमच्या ओएसचा किबोर्ड लेआउटचा शॉर्टकट वापरुन तुम्ही क्वर्टी टु ड्वॉरॅक व परत असा बदल करुन शकता.

म्हणजे कीबोर्ड वरचं s दाबल्यावर o उमटेल आणि x दाबल्यावर q उमटेल का. >> हो असेच होते!

असे कठीन जात असेल तर कीबोर्डच्या अक्षरांचे स्टीकर्स मिळतात ते लावु शकता मुळ अक्षराच्या बाजुला.

छान.
माझ्या अंदाजाने जे प्रचलित आहे त्याची सवय झाली की त्याबाहेर पडणे जड जाते. शिवाय बंहुतेक संगणकांच्या कीबोर्डवर, लॅपटॉपवर क्वर्टी पद्धतच दिसते. साहजिक तीच चालू राहते. शिवाय बहुतेकांनाआपला टायपिंगचा वेग कुठल्या स्पर्धेसाठी नाही, तर आपापल्या सोयीप्रमाणे पुरेसा असतो, त्यामुळे पंजावर ताण येण्याचा प्रकार होतच असेल असे नाही. जे ढूंढो-ढूंढो प्रकाराने टाइप करतात, त्यांचा तर पंजावर ताण कशामुळे येतो असाच प्रश्न पडेल.
मराठी किंवा देवनागरी टायपिंगबद्दल, स्पेलचेक, युनिकोड, व्हॉइस टायपिंग याबाबतीत फार प्रमाणीकरण झालेले दिसत नाही. तो मुद्दा आणखी वेगळा.
यापुढे व्हॉइस टायपिंगचे प्रमाण फार वाढेल. गुगलचे हिंदीचे व्हॉइस टायपिंग फार छान चालते. त्यामुळे कीबोर्डचा वापर भविष्यात कमी होईल असे वाटते व तो टायपिंगपेक्षा एडिटींगसाठी लागणा-या टायपिंगपुरता राहील असा माझा अंदाज आहे.

छान लेख! मला वाटते की जसे मोबाईल वरील बहुतांश कीबोर्ड अॅप्स मध्ये Word predictions ची सोय आहे तसेच संगणकाच्या कळफलकाच्या बाबतीत होईल आणि मग number of key strokes कमी होतील आणि वेग वाढेल.
Or else the entire/partial keyboard could become like a touch screen and would allow swiping which goes much faster.

राजेश कुलकर्णी,

जे प्रचलित आहे त्याची सवय झाली की त्याबाहेर पडणे जड जाते
>> सवयी मोडण्याची योग्य इच्छाशक्ती असली की काही जड जात नाही.

बंहुतेक संगणकांच्या कीबोर्डवर, लॅपटॉपवर क्वर्टी पद्धतच दिसते. साहजिक तीच चालू राहते.
>> तुमच्यासारख्या समाजातील वाईट प्रथांवर टिका करणा-या आणि त्या बदलण्याचा आग्रह धरणा-या व्यक्तीकडुन हे आळशीपणाचे समर्थन येईल असे अपेक्षीत नव्हते. कंपन्या त्यांना काय करायचे ते करतील. सॉफ्टवेअर च्या मदतीने आपन स्वतंत्र आहोत जुन्या वाईट प्रथा मोडायला!!

टायपिंगचा वेग कुठल्या स्पर्धेसाठी नाही, तर आपापल्या सोयीप्रमाणे पुरेसा असतो,
>>तुम्ही लेखातील खालील वाक्य मिसलेले दिसते:
याचा मुख्य उपयोग संगणकाची आज्ञावली लिहिणे आणि या सारख्या ईतर भरपुर वेळ सलग टंकन करण्याची आवश्यकता असण्या-या व्यक्तींना आहे.

मराठी किंवा देवनागरी टायपिंगबद्दल, स्पेलचेक, युनिकोड, व्हॉइस टायपिंग याबाबतीत फार प्रमाणीकरण झालेले दिसत नाही. तो मुद्दा आणखी वेगळा.
>> लेखात सगळीकडे "ईंग्रजी भाषा" टंकताना असा स्पष्ट उल्लेख आहे!

यापुढे व्हॉइस टायपिंगचे प्रमाण फार वाढेल. गुगलचे हिंदीचे व्हॉइस टायपिंग फार छान चालते. त्यामुळे कीबोर्डचा वापर भविष्यात कमी होईल असे वाटते व तो टायपिंगपेक्षा एडिटींगसाठी लागणा-या टायपिंगपुरता राहील असा माझा अंदाज आहे.
>>

  1. गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा आवाज टाळुन १००% बरोबर व्हॉईस टायपिंग कसे करावे?
  2. रात्री जागुन काम करणा-यांनी घरातल्यांना त्रास न होता १००% बरोबर व्हॉईस टायपिंग कसे करावे?
  3. ५०-१००-२०० किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक एकाच फ्लोर वर असताना आयटी कंपन्यांत प्रोग्रामिंग ई. काम करताना आपल्या आणि दुस-याच्या कामात कन्फ्लीक्ट न आणता १००% बरोबर व्हॉईस टायपिंग कसे करावे?
  4. (हे सर्व करताना निव्वळ या कामासाठी वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एखादे डीवाईस वापरावे लागणार नसेल असे बघा!)

  5. कंपनीच्या किंवा लष्कराच्या किंवा संशोधनाच्या दृष्टीने गुप्तता पाळावयाच्या संवेदनशील कामात १००% गुप्तता पाळुन १००% बरोबर व्हॉईस टायपिंग कसे करावे?
  6. अ) पासवर्ड वगैरे टाईप करताना गुप्तता पाळुन १००% बरोबर व्हॉईस टायपिंग कसे करावे?

....आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा:
"संगणकाला समजेल असे स्पष्ट" बोलण्याचा वेग टंकण्याच्या वेगाशी कसा जुळवावा?

जिज्ञासा,
बहुतांश कीबोर्ड अॅप्स मध्ये Word predictions ची सोय आहे तसेच संगणकाच्या कळफलकाच्या बाबतीत होईल
>>
आपल्याकडे आधीपासुनच सर्व आय.डी.ई.(Integrated Developement Environment) आणि आधुनीक टेक्स्ट एडीटर्स मधे ही सुविधा उपलब्ध आहे. त्याने नक्कीच वेग वाढतो.

छान माहिती लिहिली आहे. मी चिक्कार टाइप करते. HR पॉलिसीज, डॉक्युमेंटेशन, वेगवेगळे रिपोर्ट्स, प्रोसेसेस.... अखंड टायपिंग असतं. मनगटावर खरंच ताण येतो. त्यात मला दोन बोटं अधांतरी ठेवुन टाइप करायची सवय आहे. सपोर्ट नसल्यामुळे करंगळी आणि शेजारचं बोट आणि त्याखालचा अर्धा पंजा आणि मनगट बर्‍याचदा दुखतं.

मी हे आता नक्की ट्राय करेन आणि सांगेन कि नविन ड्वोरेक कि बोर्ड उपयोगी आहे का? अर्थात क्वर्टीची इतकी सवय असताना नविन किबोर्ड हाताखाली बसणं अवघड जाणार आहे.

हा आराखडा शिकु इच्छिणा-यांनी इथे एकदा बघावे http://www.dvorak.nl/
यात मॉनीटरवर ड्वॉरॅक आराखडा दिसत राहिल्यामुळे आपल्या बोटांना अक्षरांच्या नवीन जागांची सवय करणे सोपे जाते.

मनिमाऊ,
आपल्या ताणातील बराचसा भाग हा चुकीच्या टायपिंगमुळे (हात, बोट व मनगटाची चुकीची पोझिशन) असण्याची शक्यता आहे.

संगणकावर काम करतान बसण्याच्या आणि टंकन्याच्या योग्य पद्धती बाबत या काही लिंक्स आहेत. यातील सर्व छायाचित्रांमधे हाताचा किबोर्ड ठेवलेल्या फळीशी असलेला कोन ई. महत्वाच्या गोष्टी बघा:

http://www.wbmerriman.net/intro/pages/type/posture.php

http://www.wikihow.com/Sit-at-a-Computer

http://www.ergonomics.com.au/how-to-sit-at-a-computer/

http://ririanproject.com/2006/10/30/how-to-keep-good-posture-when-in-fro...

ज्यांनी टाईपरायटरवर टंकलेले आहे त्यांना QWERTY जास्त सोप्पा वाटतो. पण कोडींग करणारे बरेच लोक एकबोटे टाईपिस्ट असतात त्यामुळे ड्वोरॅक काय किंवा QWERTY काय फार फरक पडणार नाही. असो. चांगली माहीती.

माफ करा एक महत्वाचे नमुद करायचे राहीलेच.
माझ्या माहितीतली ही सोय फक्त प्रोग्रामींग च्या कीवर्डसाठीच आहे. नेहमीच्या लेखनासाठी नसावी बहुतेक.
तसेच या वर्ड प्रोसेसर्स मधे ही सोय ऑटोकम्पलीट च्या रुपाने आहे.
मला विंडोजबद्दल जास्त काही माहिती नाही, पण या काही लिंक्स आहेतः
http://esqinc.com/resources/white-papers/10-tips-to-increase-your-produc...

https://support.office.com/en-US/article/Add-AutoText-in-Word-5F08B3BA-C...

ओह वॉव.. छान आहे माहिती.. QWERTY ची सवय मोडायला हवीये..
मनीमाऊ.. अधांतरी बोटं.. यस्स्स्स अगदी अगदी!!!!!!!!!!! मी टू सेम सेम!!!