अकोल्यात आमच्या शेजारी एक आजी आजोबा रहायचे. आजोबा चार वर्षापुर्वी गेलेत. ते ९५ वर्षाचे होते. आता आजी ९३ वर्षाची झाली आहे. दोन वर्षांपासून त्या पुण्यात वृद्धाश्रमात राहतात. त्यांना मुलबाळ नाही आहे. आजी आणि आजोबा दोघेही संस्कृत भाषेचे प्राध्यापक होते. असे शेजारी आणि तेही आजीआजोबा आपल्याला मिळालेत ह्याचे मला फार अप्रुप वाटते. आजीला कुठल्याच नातेवाईकांकडे राहयचे नाही. सासरच्या लोकांना आजी नको आहे. आजी मला नेहमी विनंती करतात की चांगले वृद्धाश्रम बघ. मला पुण्यात इतके दिवस शोध घ्यायला मिळत नाही. महिना १० हजार इतपत त्या देऊ शकतात. पुर्वी त्या सिंहगड रस्त्यावर दुर कुठेतरी विजनवासात एका ठिकाणी राहयच्या तिथे फक्त त्या एकच वृद्धा होत्या. फार कंटाळून जायच्या. मी पुण्यात आलो की आजींना माझ्याघरी घेऊन येतो. त्या स्वभावाने फार आनंदी आहेत. सतत वाचायला हवच असत त्यांना. अशा आजींसाठी मला चांगले वृद्धाश्रम शोधायचे आहे. इथे कुणी मदत करु शकेल का? मी जर भारतात परतलो तर आजींना माझ्याच घरी ठेवून घेईन. पण मी नसताना मला माझ्या घरच्यांना ही जबाबदारी देणे योग्य वाटत नाही. कारण माझी आई हीच एक आजी झालेली स्त्रि आहे.
पुण्यातील चांगले अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम
Submitted by हर्ट on 15 January, 2016 - 05:39
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफि, हो का? मला हे नवीन आहे.
बेफि, हो का? मला हे नवीन आहे. दोन वर्षांपूर्वी काका माझ्याकडे आले होते, तेव्हा याविषयी काही बोलले नाहीत. असो. बरं झालं, नवीन माहिती मिळाली.
बी तुमचे खुप कौतुक वाटते.
बी तुमचे खुप कौतुक वाटते.
बी, किती छान विचार आहेत आणि
बी, किती छान विचार आहेत आणि ते आचरणात आणायचा प्रयत्न करतो आहेस हे कौतुकास्पद आहे. तुझ्या प्रयत्नांना यश येऊ दे.
अथश्री परांजपे स्कीम्सची
अथश्री परांजपे स्कीम्सची ज्येष्ठांसाठीची स्कीम आहे. सर्व अत्यावश्यक आणि दैनंदिन सेवासुविधा आहेत. कन्सेप्ट चांगली आहे.
सीमा, आमच्या शेजारी भाड्याची
सीमा, आमच्या शेजारी भाड्याची घरे नाहीत आणि मुख्य म्हणजे आजीला कुणाचेही पैसे चालत नाही. त्या पैशाच्या बाबतीत अत्यंत चोख आहेत. एकदा मी त्यांना खजूर आणि केळी आणून दिली. मी त्यांच्याकडून पैसे घेतले नाही. त्यांना माझा खूप राग आला आणि नंतर त्यांचा तो राग बघून मला कळले की ह्यांना पैसे घेतलेले आवडत नाही. मी ५० रुपयाची नोट घेतली आणि मग त्या परत चांगल्या बोलायला लागल्या. मी जर त्यांना माझ्या घरी रहायला आणले तर त्या मलाही पैसे घेऊन मला ठेव असेच म्हणतील इतक्या तत्त्वाच्या आहेत.
आजोबा गेल्यानंतर आजींने लवकर स्वतःला सावरले. भाचे आणि पुतणे घरावर डोळा ठेवून होते म्हणून कुणालाही खबर न करता आजींनी स्वतःचे घर थोडी कमी किम्मत ठेवून विकले आणि फक्त मला सांगितले की यशवंत मी येथून आता हलणार आहे. मी कुणाहीकडे राहणार नाही. माझी पिढी हयात नाही. भाचे आणि पुतणे ६० च्या पुढे आहेत. त्यांना सुना आणि नातू आले आहेत. मी अशांच्या घरात नीट दिसणार नाही. शिवाय मला कोण कसे आहे हे खूप चांगले ठावूक आहे. आजींनी वर्तमानपत्र वाचून त्यातली कात्रणे मला दाखवली. एकेक कात्रण वृद्धाश्रमाबद्दल होते. मी सिंगापुरला असताना कळले की आजींनी घर विकले आणि त्या पुण्यात आहेत. माझ्या बहिणीकडे पत्ता ठेवला. पुण्याशी कुठलाही सबंध नसताना आजी वयाच्या ९१ वर्षी इतक्या लांब आल्यात. घरातील सगळे सामान आर. एस. एस. दाण केले. फक्त पंचायनन, कपडे आणि एक प्याला. जिथे आजींचे टुमदार घर आणि बाग होती तिथे आता जे आले आहेत त्यांनी सहा महिन्यात घर तीन मजले करुन घराचा नकाशाच बदलला. बाग काढून टाकली. घरे बांधली. काही भाड्यानी दिलीत. एकदम कॉम्प्लेक्स सारखे केले.
पुणे किंवा अन्यत्र असणारे
पुणे किंवा अन्यत्र असणारे अनाथाश्रम याबद्दल माहिती मिळू शकेल का. तसेच ज्या मुलांचे पालक त्यांना सांभाळू शकत नाहीत किंवा कारागृहात आहेत अशा मुलांचे संगोपन कोण करते , याबद्दल कुठे माहिती मिळू शकेल का .
पुण्यात गोल्फ कोर्सजवळ
पुण्यात गोल्फ कोर्सजवळ 'बालग्राम' म्हणून संस्था आहे. मध्यंतरी ही संस्था SOS India सोबत काम करत होती त्यावेळी खूप वेळा जाणे झाले आहे. आता ही संस्था SOS India बरोबर नाही काम करत. तरीही अत्यंत उत्तम प्रकारे मुलांचा सांभाळ करतात.
पुण्यातच मुल राहिलं पाहिजे अशी गरज नसेल तर अहमदनगर, अलिबाग येथे SOS चे campus आहेत. खरं तर भारतभर आहेत पण मला एवढेच कॅम्पस माहीत आहेत म्हणून ही दोन नावं लिहिलीत. आणि मुल SOS मध्ये गेले तर स्नातकोत्तर शिक्षण तसेच स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत त्याला सगळा सपोर्ट मिळतो हे मी खात्रीने सांगू शकते.
या संस्थांत मुलांची ऍडमिशन करण्यासाठी समाज कल्याण खात्यातर्फे जावे लागते.
दोन्ही पालक हयात व सक्षम असतील तर तिथे मुलांना ठेवता येईल का माहित नाही. परंतु एकल पालक जर अक्षम असतील किंवा कारागृहात असतील तर या दोन्ही ठिकाणी मुलं राहू शकतात. समाज कल्याण खात्याने नोटीफाईड केलेले नातेवाईक अधून मधून मुलांना भेटू शकतात, सुट्टीत २-४ दिवस घरी नेऊ शकतात.
https://www.soschildrensvillages.in/
https://www.balgrammaharashtra.com/
पुणे किंवा अन्यत्र असणारे
पुणे किंवा अन्यत्र असणारे अनाथाश्रम याबद्दल माहिती मिळू शकेल का>>>>>इथे संकलित माहिती मिळेल
https://www.oldagemh.com/
https://www.facebook.com/groups/331285451630205 इथे वृद्धांचे पालकत्व हा फेसबुक ग्रुप आहे
धन्यवाद माझेमन , प्रकाश
धन्यवाद माझेमन , प्रकाश घाटपांडे . छान माहिती.
मला अनाथाश्रमांचीच माहिती हवी होती. एका अनथाश्रमात आर्थिक मदतीची तेवढी गरज नाहिये असे जाउन आल्यावर समजले. थोड्य आड भागात अनाथाश्रम चालवणारे व संस्था किन्वा तत्सम कुणाचे फारसे पाठबळ नसणारे असे कोणि असेल तर ती माहिती हवी होति. तसेच ज्या मुलाना आई वडिल आहेत पण तरिहि त्यांना मदतीची गरज आहे , उदा. शिक्षा झालेले पालक ज्यन्च्या मुलांना कदाचित फार सहानुभुती आणि मदत मिळत नसेल,
त्यांची व्यवस्था कोण आणि कुठे करते अशी माहिती हवी होति .
रावी, मायबोलीवर ध्यासपंथी
रावी, मायबोलीवर ध्यासपंथी पाउले मध्ये याबद्दल माहिती मिळेल. तसंच एच आय व्ही ग्रस्त मुलांसाठी निवासी शाळा चालवणार्या एका व्यक्तीवर नुकताच एक धागा पाहिला.
आदिवासी फासेपारधी सुधार समिती
आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा
वंचित बेसहारा फासेपारधी भीक मागणारी तसेच कुठेही आपले वास्तव्य करणारी अशी मुले प्रश्नचिन्ह शाळेत राहतात ते 1 ली ते 10 वी शाळेत शिकतात
संस्थापक आहेत मतिन भोसले
श्रमिक सहयोग संस्था चिपळूण
श्रमिक सहयोग संस्था चिपळूण तालुक्यात कातकरी आदिवासी धनगर गवळी मुलांना डोंगरावर पाड्यात जावून शिकवतात
संस्थापक राजन इंदुलकर
https://weeklysadhana.in/index.php/view_article/namdev-mali-on-book-mor-...
मालनताई नावाच्या कुणी तरी
मालनताई नावाच्या कुणी तरी महिला आहेत. त्या अनाथाश्रम चालवतात.
त्याबद्दल माहिती मिळेल का ? अजून आहे का ?
मायबोलीवर ध्यासपंथी पाउले
मायबोलीवर ध्यासपंथी पाउले मध्ये याबद्दल माहिती मिळेल. > धान्यवाद भरत. नक्की बघेन.
आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा
श्रमिक सहयोग संस्था चिपळूण तालुक्यात कातकरी आदिवासी धनगर गवळी मुलांना डोंगरावर पाड्यात जावून शिकवतात > धन्यवाद निलूदा.
मायबोलीवर ध्यासपंथी पाउले
मायबोलीवर ध्यासपंथी पाउले मध्ये याबद्दल माहिती मिळेल. > धन्यवाद भरत. नक्की बघेन.
आदिवासी फासेपारधी सुधार समिती द्वारा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा मंगरूळ चव्हाळा
श्रमिक सहयोग संस्था चिपळूण तालुक्यात कातकरी आदिवासी धनगर गवळी मुलांना डोंगरावर पाड्यात जावून शिकवतात > धन्यवाद निलूदा. माहिती नोंदवून ठेवली अहे
Pages