Submitted by सुप्रिया जाधव. on 14 January, 2016 - 12:42
उगाचच वाढवा का शब्द शब्दांनी
हवे ते साध्य होते बंद ओठांनी
मनाची चलबिचल श्वासातुनी कळते
कशाला डोकवा डोळ्यात डोळ्यांनी
कळत नकळत तुला होकार कळवावा
रुपेरी बिलवरांच्या किणकिणाटांनी
चितारावीस नक्षी रोमरोमावर
शहा-यांची निमुळत्या लांब बोटांनी
जसाही स्पर्श झाला चंद्रकिरणांचा
किनारा गाठला लाजून लाटांनी
सुगंधावर फुलांच्या पाहिजे मक्ता ?
कळ्यांचे भार उचलावेत देठांनी
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर !
सुंदर !
छान. सगळेच आवडले, लाजून
छान. सगळेच आवडले,
लाजून लाटांनी, कळ्यांचे भार आणि बंद ओठांनी खासच.
लाजवाब...लाजवाब!! 'मक्ता' तर
लाजवाब...लाजवाब!!
'मक्ता' तर कहर! गझलेचा मक्तेदारच!
मस्त. आवडली.
मस्त. आवडली.
चितारावीस नक्षी
चितारावीस नक्षी रोमरोमावर
शहा-यांची निमुळत्या लांब बोटांनी
खुप आवडलेले कडवे
>>>मनाची चलबिचल श्वासातुनी
>>>मनाची चलबिचल श्वासातुनी कळते
कशाला डोकवा डोळ्यात डोळ्यांनी<<< सुरेख शेर!
गझल आणि कविता ह्यातील सीमारेषा अस्पष्ट आणि शब्दात नेमकी न पकडता येण्यासारखी असते असा अनुभव आहे. मुसल्सल आणि शब्दवैभवाने नटलेले म्हंटले तरी शेर हे शेर असायला हवेत.
उदाहरणार्थ, खालील शेरातील दोन ओळींचा क्रम उलटा केला आणि त्या सरळ वाचल्या तर एक वाक्य तयार होईल.
चितारावीस नक्षी रोमरोमावर
शहा-यांची निमुळत्या लांब बोटांनी
रचना गायनानुकुल आहे.
शुभेच्छा!
सुर्रेखच .... जसाही स्पर्श
सुर्रेखच ....
जसाही स्पर्श झाला चंद्रकिरणांचा >>>> हे असे वाचले
जरासा स्पर्श होता चंद्रकिरणांचा ....
ओह ! रचनेवर पुनश्च विचार
ओह !
रचनेवर पुनश्च विचार करते बेफिजी !
आपल्या मौल्यावान सूचना लक्षात घेवून
धन्यवाद !
सुगंधावर फुलांच्या पाहिजे
सुगंधावर फुलांच्या पाहिजे मक्ता ?
कळ्यांचे भार उचलावेत देठांनी >>>>>>>
........... छान कल्पनाविलास ! शृन्गार रसाची मुक्त उधळण !! आणखिही बरेच काही !!!
शेवटचे चार एकदम कातिल...मार
शेवटचे चार एकदम कातिल...मार डाला....
खूप छान.
खूप छान.
खूपच छान.!
खूपच छान.!
बाळ पाटील, भुईकमळ आणि
बाळ पाटील, भुईकमळ आणि सगळ्यांचेच आभार !