जान्हवीचं बाळ कसं असेल ?

Submitted by घायल on 13 January, 2016 - 21:01

देर से आये पर दुरूस्त आये
येणार येणार म्हणत अखंड महाराष्ट्राला युगानयुगे वाट पहायला लावणारा तो क्षण आला ! २०१६ हे वर्ष अशा रितीने सुरूवातीलाच नाट्यपूर्ण ठरले.

जान्हवीचं बाळ येणार आहे. २७ ला बारसं देखील ठेवलंय. आपण कॉन्ट्रीब्यूशन काढून जाऊच हो..

आता उत्सुकता आहे ती इतकी वर्ष या जगात यायला वेळ घेणारं हे बाळ कसं असेल याचीच.
कसं दिसेल, कसं असेल ? मोठं झाल्यावर कसं निपजेल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या प्रसंगी काही मान्यवरांची भाषणे होणार आहेत. साप्ताहिकी या कार्यक्रमात त्यातील काही अंश आपण इथे वाचू शकता.

वेंकय्या नायडू : अच्चे दिन आ गये !

देवेंद्र फडणवीस : आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यास हे सरकार कटीबद्ध राहील हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे. जान्हवीची डिलीव्हरी न होण्यामागे तत्कालीन सरकारचा नाकर्तेपणा, इच्छाशक्तीचा अभाव आणि जनसामान्यांच्या आकांक्षांबद्दलही असंवेदनशीलता हे घटक होते तसेच .......... @$%$^&*&*&!*!& !!&^^ट@^&
&^^&^&^&&^^^
अशा रितीने जनतेचे खरे प्रतिनिधी हे भाजप सरकार आहे हे सिद्ध झाले आहे.

रामदास आठवले : या निमित्ताने आपण जान्हवी या अडलेल्या मातेचा प्रश्न मोदीसाहेबांच्या कानावर घालून तो प्रश्न सोडवलेला आहे. आता माझ्या मंत्रीपदाच्या अडलेल्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या जनतेने आवाज उठवावा अशी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

शरद पवार : जान्हवीच्या डिलीव्हरीला जो अक्षम्य उशीर झाला त्याची जबाबदारी आमच्यावर टाकण्याचा हा प्रयत्न पाहिला तर लातूरच्या भूकंपात देखील आमचाच हात असावा अशी शंका आता आम्हाला येऊ लागली आहे.

दिग्विजयसिंह : जनम से पहले ही इतना बडा पॉझ लेनेवाला ये बालक आगे चलके अटलजी जैसे बडे बडे पॉझ ले सकता है | हमारी हार्दीक शुभकामनाएं |

सोनिया गांधी : एक आउरत ही एक आउरत का दरद समज सक्ती हे | राहुल बी ऐसे ही बहुत समय के बाद पइदा हुआ था | उस वक्त ही मै समझ गई थी कि बच्चा आलसी निकलेगा | जानुई से मुझे पुरी हमदरदी हे | जयहिंद |

राहुल गांधी : मैने डॉक्टरोंसे डिस्कस करके उन्हें कुछ सुझाव दिये थे, इसलिये जान्हवी की डिलीव्हरी संभव हुई है | अगर सरकार इसका क्रेडीट ले रही है तो हम उनके झूठ को बेनकाब कर देंगे | काँग्रेस पार्टी इसके लिये आंदोलन करेगी | कार्यकर्ता कहा है ? कहा है ?

क्रमश:

आलं एकदाशी.
बाळ कसं असेल?
-जान्हवी सारखं अतर्क्य,असंबंध,मधुमेह होईल इतकं अतिगोड(गूढ) हसणारं/री. काहीही हं श्री च्या चालीवर हसणारं/री,रडणारं/री
श्री सारखं प्रत्येक गोष्ट करताना पर्यावरणाची काळजी घेणारं/री(हा/ही शी-शू तरी करेल का?)
आईआजी सारखं विचारी(अति?)
कलाबाईंसारखं झणझणीत
*वरील मतांशी माझा काहीही संबंध नाही. बाळामध्ये वरील (अव) गुण न दिसल्यास निव्वळ योगायोग समजावा*

२७ ला बारसे करायचे तर आजच जन्माला यावे लागेल किंवा फार फार तर उद्या >.....>.>.>.
उद्या जन्मणार असेल तर संक्रात आलीच म्हणायची ...... बाळी !! Lol Lol

जन्म आणि लगेच बारसं,, काहिही हं...

पाचवी, घुगर्‍या, सोयर, सटवाई, कान टोचणे, वाळे घालणे, लंगोट बांधणे.. या प्रत्येकावर किमान आठ दहा एपिसोड होतील.

जन्म आणि लगेच बारसं,, काहिही हं...

पाचवी, घुगर्‍या, सोयर, सटवाई, कान टोचणे, वाळे घालणे, लंगोट बांधणे.. या प्रत्येकावर किमान आठ दहा एपिसोड होतील.
>>>>... अहो दिनेशजी, हे तर सोडाच ! देव न करो पण कदाचित बाळाला काचेच्या पेटीत ठेवायची वेळ आली आणि आईला बेड्रेस्ट सांगीतली तर .........!!!

जान्हवीच्या नवर्‍याला सहा आया(आईचे अनेकवचन)
जान्हवीच्या बाळाला किती?
त्या सहा + मामीआई + कला तू गप्प बस आई + तू काय बॉसची लाडकी आई आणि यांतून वेळ मिळाला तर काहीही हं श्री आई.

यावर नमो, उद्धव नि राज ठाकरे वगैरेंच्या प्रतिक्रिया पण येऊन देत >>>>>>>

............. राज साहेबांची माझ्या अल्पमतिप्रमाणे अशी प्रतिक्रीया असेल ....." त्या जान्हवीच्या डिलीव्हरीचे काय झाले ? डॉक्टरांना जमत नसेल तर माझ्या कार्यकर्त्यावर सोपवा ...... खट्याळ खट्ट !!

कलाबाईं: "जानू चे बाळ ते..कसे ऊं ऊं रडतेय, मोठ्या श्रीमन्त घरातले ना, नाहीतर आमचा पिन्ट्या... नुसता भोकाड
पसरून रडायचा..."
जानू चे बाबा: "कला...."
कलाबाईं: "अहो मी काय म्हण्ते, आज बारसे आहे, निदान आज तरी कपडे बदला तुमचे..सदा न कदा ते
सफेद बन्डी अनि रन्ग उडालेला पाय्जामा.."
जानू चे बाबा: "कला...."
Rofl