मदत हवीय!

Submitted by देवकी on 13 January, 2016 - 14:00

.धागा संपादित करण्यात आला आहे. सर्वांचे धन्यवाद ,माझ्याकडून व मैत्रिणीकडून.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकी,

सगळ्यात प्रथम जर हा प्रश्न गंभीर वाटतो आहे तर तुम्ही माबोकरांच्या सल्ल्यावर अवलंबुन राहू नये असं वाटतं.

>>की ह्या इंजेक्शनचा प्रभाव वर्षभर रहातो आणि ब्रेनवर परिणाम करत>>>> ह्या वाक्याचा नक्की अर्थ मैत्रिणीने विचारला नाही का फॅमिली डॉक्टरला? आणि त्याचा परिणाम निगेटिव्हच असेल असे धरून चालली आहे का मैत्रिण? खुद्द ज्या डॉक्टरानी हि इंजेक्शन्स दिली त्यांना ही विचारायला हवं की कोणती गोळी कशासाठी किंवा कोणतं इंजेक्शन कशासाठी ते. आपण ब्लाईंडली डॉक्टर सांगेल ते फॉलो करतो.

त्या इंजेक्शन्स मुळे मुलित काही फरक दिसतो आहे का मैत्रिणीला? तो बरा आहे की वाईट आहे?
खुप गंभीर असो वा नसो, शंका असेल तिथे सेकंड ओपिनियन घेणे क्रमप्राप्त ठरते.
वेळ न घालवता ताबडतोब दुसर्‍या तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे.

शुभेच्छा!

त्यांना ही विचारायला हवं की कोणती गोळी कशासाठी किंवा कोणतं इंजेक्शन कशासाठी ते. . >>>>>>>>> कॅलशियम लेव्हल वाढवण्यासाठी.तसेच तिच्या रिपोर्टमधे डी व्हिटॅमिन कमी असल्याने ही इंजेक्शन दिली गेली.
काल परत तिची ब्लड टेस्ट झाली. दुपारी नवर्‍याने फॅ.डॉ.कडे जाऊन विचारले.तेव्हा डी ची लेव्हल १०० असायला पाहिजे ती १६८ आहे.त्यामुळे तिला ड्राऊसीनेस येत आहे.त्यांनी गोळ्या,इंजेक्शन्स बंद करायला सांगितली आहेत.भरपूर पाणी प्यायला सांगितले आहे.ते म्हणाले की नंतर ब्रेन हॅमरेज वगैरे होऊ शकतो.आज संध्याकाळी परत ती स्वतः जाणार होती.

तिची डॉक्टरांवरच भिस्त आहे. तरीही ब्रेनवर परिणाम म्हटल्यावर जरा हादरली आहे.

कठीण आहे. इंजेक्शन/औषधे देण्याआधी त्याचे साईड इफेक्ट, रीस्क वगैरे सांगायला हवे होते. फॅमिली डॉकना माहित आहेत तर आर्थोला देखील माहित असणार ना? असे कसे निष्काळजीपणे वागतात. निदान इंजेक्शन /औषधे दिली तर रीस्क मॅनेज करण्यासाठी योग्य प्रकारे मॉनिटर तरी करायचे.