रहस्यमय हिंदी चित्रपट

Submitted by अंजली on 12 January, 2016 - 10:59

रहस्यमय / थ्रिलर हिंदी चित्रपटांविषयी गप्पा. चित्रपटांची लिस्ट बनवता येईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक ऋषी कपुर आणि किमी काटकर चा मुवी होता. खोज. चांगली मिस्टरी होती.

शिवाय अमिरखानचा तलाश.

कोंकणा सेनचा एक मुवी होता. तिला Schizophrenia झालेला असतो. तो या लिस्ट मधे धरला जावु शकतो का? नावच आठवत नाहीए.

तिला Schizophrenia झालेला असतो >>>> १५ पार्क अ‍ॅवेन्यु <<< फार पुर्वी बघितलेला, तेव्हा Schizophrenia कोन्कणाला की शबाना ला ह्यावर वाद झाल्याचे आठवते.

बिमल रॉय यांचा असित सेन दिग्दर्शित "अपराधी कौन ? " या नावाचा सिनेमा आहे. गजानन जागीरदार, अभि भट्टाचार्य, माला सिन्हा.

सुश्मिता सेन, जॅकी श्रॉफचा समय किंवा असाच काहीतरी सिनेमा होता. तो बहुतेक सस्पेन्स थ्रिलर होता.

तरकीब, पुलिस पब्लीक हे अनुक्रमे नाना आणि राजकुमार यांचे पोलीस तपासावर आधारीत अत्यंत वाईट सिनेमे होते. पण चालले होते.

टेलिफोन ,खूनी कौन असेही अनेक विसरता येण्यासारखे सिनेमे बनवून ठेवलेत बॉलीवूडमधे. त्यांचं अस्तित्त्व मायबोलीवर त्यांच्यावर रिव्ह्यू लिहीले जावेत यासाठीच असावं.

वो कौन थी
गुमनाम
मेरा साया
शापित
१९२०
डरना मना है
डरना जरुरी है
भूत
वास्तुशास्र्त
रात
मधुमती (फक्त शेवट)
महल
धुंद ( डॅनी, झीनत)
कहानी
क्रीचर
राझ
राझ २
राझ ३
दो गज जमीन के नीचे
जानी दुश्मन
नागीन
सन्नाटा
कुदरत
आत्मा
रागीनी एम.एम.एस १& २
हॉरर स्टोरी
पिझ्झा
डर अ‍ॅट मॉल
हॉन्टेड
फुंक
फुंक २
वीराना
नैना
गेस्ट हाउस
पूराना मंदिर
गो गोवा गॉन
बीस साल बाद
एक थी डायन

हे येवढे अत्ता आठवत आहेत. मी सगळे बघितले आहेत. हिंदी, इंग्लीश.... अश्या प्रकारच्या सिनेमांची आवड आहे.... डोळे बंद करुन बघायचे लहान पणी... आर्थात तेंव्हा रामसेच्या भुतांना घाबरायला पण होत नसे.... तरी....

अजय देवगण चा काली
रोअर - टायगर्स ऑफ सुंदरबन
कोहरा
जूनून ( राहुल रॉय वाघ होतो तो... शशी कपूर वाला नाही )
ऐतबार ( डिंपल, डॅनी, सुरेश ओबेरॉय .... हा सिनेमा डायल एम. फॉर मर्डर वरुन घेतला आहे.)
हेट स्टोरी चे सगळे पार्ट

हेट स्टोरी ३ पाहिला.... थोडा बोल्ड आहे... पण चांगला आहे.... बराचसा प्रेडिक्टेबल आहे.

हेट स्टोरी -१ त्या प्रसिध्ध केस वर आहे. खरी गोष्ट. नेव्ही मधला फियान्से, नटी आणि तिचा बॉयफ्रेंड....

हेट स्टोरी -१ त्या प्रसिध्ध केस वर आहे. खरी गोष्ट. नेव्ही मधला फियान्से, नटी आणि तिचा बॉयफ्रेंड....>>>>> नाही. तो "it's not a love story " . नीरज ग्रोव्हर आणि मरिया सुसाईराज.

हेट स्टोरि -१ हा पण बराच बोल्ड आहे .
ती पूर्ण सिरिज हे.स्टो. -१,२,३ - "revenge" थीमवर आहे.

गुल पनाग चा एक सिनेमा आहे. तिच्या सावत्र बहीणीच्या मागे मारेकरी लागलेला असतो. ती तिला घेऊन दुस-या शहरात जाते. तिथेही तो पोहोचल्याचा तिला संशय येतो.

या सिनेमाचं नाव माहीत आहे का ?

गुल पनाग चा एक सिनेमा आहे. तिच्या सावत्र बहीणीच्या मागे मारेकरी लागलेला असतो. ती तिला घेऊन दुस-या शहरात जाते. तिथेही तो पोहोचल्याचा तिला संशय येतो.

या सिनेमाचं नाव माहीत आहे का ?

ऑफिसर - सुनील शेट्टी, रवीना टंडन.
हा Vertigo वरून घेतला होता!

चुरा लिया है तुमने - इशा देओल, हीरो आठवत नाही
हा Charade वरून घेतला होता!

पण मूळ चित्रपटांची कथा चांगली असल्याने पाहायला हे बरेच सुसह्य आहेत.

सोल्जर - बॉबी देओल, प्रीती झिंटा
चांगला suspense thriller होता, रहस्य बर्‍यापैकी होते.

मराठीतले चांगले रहस्यपटः
पाठलाग
पडछाया
हा खेळ सावल्यांचा
रात्र आरंभ
गैर
रिंगा रिंगा

नाम गुम जायेगा - दिया मिर्झासाठी पाहिला होता. फारसा आठवत नाही. बहुतेक schizophrenia किंवा मेमरी लॉस असं काहीसा टॉपिक होता.

हा हा हा. रहस्यमय थ्रिल अनुभवायचे असेल तर आपला बुवा एकच पर्याय असतो, पुस्तके तिही खासकरुन सुशींची. बाकी अ‍ॅक्श्न-सायफाय थ्रील म्हणाल तर बॉलीवूडपेक्षा हॉलिवूड (टॉलीवूड नव्हे! :राग:) सिनेमेच चांगले.
हा- जर तुंम्हाला इमोसनल अत्याचार टाईप मुव्हीज पाहिजे असतील तर मग मात्र त्या मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे बॉलिवूड सिनेमे. Wink

प्रत्येक रटाळ चित्रपट हा एका अर्थाने रहस्यमयच असतो. त्याचा शेवट नेमका कधी आहे हे रहस्य उलगडण्याची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात.

Pages