मायामि, की वेस्ट,ओरलँडो आणि अ‍ॅटलांटा भाग १

Submitted by साहिल शहा on 11 January, 2016 - 21:32

२०१५ ला शेवटचे २ आठवडे सगळ्याना सुट्टी होती म्हणुन फ्लोरिडा आणि अ‍ॅटलांटा ची १० दिवसाची ट्रीप करायची ठरवली. सुट्टीचे दिवस असल्याने आधी विमानाची तिकिटे काढली. त्यात जाताना ओरलँडो आणि येताना अ‍ॅटलांटा वरुन तिकिटे मिळाली. त्यानुसार ३ दिवस मायामि, २ दिवस ओरलँडो आणि ३ दिवस अ‍ॅटलांटा आणि २ दिवस प्रवासात असा प्लान केला. ओरलँडो वरुन गाडी भाड्यानी घ्यायची आणि मायामि ला येउन ३ दिवस राहायचे तिथुन परत ओरलँडो ला येउन २ दिवस राहायचे आणि नंतर अ‍ॅटलांटा मध्ये ३ दिवस असा बेत केला. डिसनी, universal आणि केनेडी स्पेस मागच्या वर्षी केले असल्याने ओरलँडो मध्ये २ दिवस भरपुर होते.

मायमि मध्ये पहिल्या दिवसी मायमि साउथ बिच वर गेलो. लहानपण मुम्बईत गेल्यामुळे बिच वर पोहण्याचे खुप आकर्षण आहे. आमच्या सध्याचा घरापासुन १० किमी वर पण लेक ईरीचा बिच आहे (लेक ईरीचा किनारा ९०७ माईल्स किंवा १५०० किमी आहे आणि हा लेक एखाद्या समुद्रासारखाच वाटतो. किनार्यावर समुद्रासार्ख्या लाटा येत असतात) पण त्यात फक्त जुलै आणि औगस्ट मध्ये पाण्यात जाउ शकतो कारण बाकीच्या वेळी पाण्याचे तापमान २०C पेक्षा कमि असते. पाणि खारे नसल्याने एवढी मजा येत नाही. बर्याच दिवसानी समुद्राच्या पाण्यात भरपुर पोहलो. नंतर लाईट हाउस बघुन बिच वर सायकल राईड केली. सायकल भाड्यानि घ्यायला गेल्यावर सायकल चा दुकानदार ला ईग्रजी येत न्हवते तेव्हा खुप आश्चर्य वाटले. पण नंतर अशी बरीच मंडळी भेटली की त्याना इग्लिश येत नाही. मायामिच्या काही परिसर आणि की वेस्ट मध्ये असे वाटते की आपण क्युबा , किंवा कुठल्या तरी मध्य अमेरिकेतिल देशात आहोत असे वाटते. संध्याकाळी आम्ही मायामी क्रुस केली त्यात मायामि downtown, port, Alaskan Cruise आणि काही फेमस मिलियन डॉलर ची घरे दाखवली. कायद्यानुसार सध्या जे राहातात त्याची नावे सांगायला मनाई होती पण पुर्वी जे राहिले आहेत त्याची नावे आणि जी घरे विकायला आहेत त्याची माहिती गाईड एन्गिश आणि स्पॅनिस मध्ये आलटुन पालटुन देत होता. आणि बाकी सगळे फोटो आणि सेल्फी काढत होते. मायकल जॅक्सन , शकिरा, लेडी गागा, जॅकी चान , बरेच CEO मायामिला राहिले आहेत किंवा त्याची घरे होती. काही घरे विकायला पण होती २० ते १०० मिलियन डॉलर पर्यन्त किंमती होत्या. गाईड फोन वर त्या घरची जाहिरात दाखऊन किंमत सांगत होता.
दुसर्या दिवशी आम्ही की वेस्ट ला गेलो. की वेस्ट मायामि पासुन १३० माईल्स लांब आहे. मायामि पासुन की वेस्ट पर्यन्त समुद्रात काही बेटे आहेत. ह्या बेटामध्ये खराफुटीचे जंगल, थोडा उथळ तर काही ठिकाणी खोल समुद्र आहे. मायामि पासुन किवेस्ट ला जायला १६० माईल लांब रस्ता आहे तो खारफुटी च्या जंगलातुन तर मध्येच गावातुन तर कधी पुलावरुन जातो. बर्याच ठिकाणि २ लेन चा रोड असल्याने आणि मध्ये मध्ये सिनिक स्पॉट असल्यने १६० माईल्स जायला ४ तास लागतात. त्यातिल एक ब्रिज तर ७ माईल (१० की मी) लांब आहे.
भरपुर प्रवास असल्याने आम्ही सकाळी ८ वाजता निघालो. मध्ये दोन ठिकाणी थांबुन समुद्र आणि ब्रीज बघितले. अथांग निळा समुद्र, समुद्रात मध्येच निर्मनुष्य बेट बघुन मन प्रसन्न झाले. खारफुटी च्या जंगलातुन जाताना मगर, अजगर आणि बाकी प्राण्याच्या पासुन बचाव करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुनी ६ फुटी जाळी लावली होती. मध्ये मध्ये बेट लागत होती. यातिल काही बेटावर चांगले बिच , रिसोर्ट आहेत. दुपारी १२ वाजता आम्ही की वेस्ट च्या साउथ टोकाला ( हे अमेरिकेतिल contiguous states चे टोक पण आहे) पोहोचलो. ह्या पॉईट पासुन ९० मैलावर क्युबा आहे.
की वेस्ट वर अमेरिकेत अस्ल्यासारखे वाटतच नाही. नाताळ्च्या वेळ ९०F किंवा ३५C तापमान, रस्त्यावर स्कुटी टाईप गाड्या, ईग्रजी न येणारी माणसे बघुन आपण दुसर्‍या देशात आल्यासारखे वाटते.

दुपारी जेवल्यावर समुद्र किनारी अ‍ॅडवेंचर राईड करायला गेलो. की वेस्ट ला पॅराग्लायडिंग , स्कुबा डायविंग , वॉटर जेट सारख्या बर्याच अ‍ॅक्टीविटीज करता येतात. वेळेअभावी अम्ही फक्त पॅरासेलिंग करु शकलो. ह्यात आधी तुम्हाला खोल समुद्रात बोटीतुन घेउन जातात. नंतर पॅराशुट नी हवेत उडवतात. त्याची दोर गाईड कडे असतो. गाईड आपल्यला २००-२५० फोट हवेत घेउन जातो आणि ५ मिनिटानी खाली आणतात. खाली आणताना समुद्राच्या पाण्यात डुबकी लावतात आणि मग बोटीत परत आणतात. संध्याकाळी ५ वाजता आम्ही परत मायामिला जायला निघालो. त्यात ईस्लामोरडा नावाच्या बेटावर अ‍ॅक्सीडंट झाल्यामुळे हॉटेल वर जाताजाता रात्री ११ वाजले.

तिसर्‍या दिवशी आम्ही एव्हरग्लेडस नॅशनल पार्क ला गेलो. ह्या पार्क बद्दल रायगड यानी लिहले असल्यामुळे मी आजुन काही लिहित नाही.

पुढच्या भागात ओरलँडो आणि अ‍ॅटलांटा बद्दल

फोटो

मायामि डाउनटाउन,

2015-12-22_214857094_509E2_iOS.jpg2015-12-22_215851689_30D14_iOS.jpg

२० मिलियन डॉलरचे घर. ह्यात मोठी बोट पार्क करायला पण जागा आहे.

2015-12-22_220814019_36792_iOS.jpg

७ मैल लंबीचा पुल
2015-12-23_155442235_16D3D_iOS.jpg

की वेस्ट ला जाताना सिनिक पॉईट वरुन घेतलेला फोटो...
2015-12-23_155812333_79C7B_iOS.jpg

Southern most point of contiguous अमेरिका
2015-12-23_175740194_CEE4A_iOS.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users