भारतिय जेवणातील कॅलरिज आणि त्याचे आवश्यक दैनदिन प्रमाण

Submitted by हर्ट on 11 January, 2016 - 03:41

मी वर जो धागा उघडला आहे त्या विषयावर माहिती मिळेल का? एखाद्यानी एखादा पदार्थ किती खावा, त्यात किती कॅलरिज असते, आपल्या शरिराला त्यातली किती आवश्यक असते? ह्याबद्दल माहिती हवी आहे. पदार्थ आणि कॅलरिज हा विषय खरे तर नीट समजवून घ्यायचा आहे. पण होते असे की गुगलवर वा त्या त्या पदार्थाच्या पाकीटावर फक्त कॅलरिज लिहिलेल्या असतात. वयानुसार आपल्याला त्यातील किती कॅलरिज आवश्यक असतात ह्याची माहिती दिलेली नसते.

धन्यवाद.

जर समरी फार विस्कळीत लिहिली असेल तर क्षमस्व. तुम्हाला माझा मुद्दा कळला असेल अशी अपेक्षा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण नेहमी जे आकडे बघतो त्यांच्या बद्दल कॅलरीज असा उल्लेख करणे चुक आहे..
खरे तर ते सर्व आकडे कीलो कॅलरीज असतात.

म्हणजे एका पोळीत १०० कॅलरी असतात असे सर्रास म्हणले जाते, पण खरे तर १०० किलो कॅलरी असतात.

बी, प्रत्येकाचा कॅलरी प्लॅन वेगळा. लिंग, वय, लाईफस्टाइल किती कष्टाची, धावपळीची यानुसार दिवसाला किती कॅलरी योग्य ते ठरते. साधारण ३० टक्के फॅटपासून आणि प्रत्येकी ३५ % कार्ब्ज आणि प्रोटिन्स पासुन धरायचे. तुमचे सध्याचे वजन, उंची, वजन वाढवायचे /कमी करायचे/तसेच राखायचे याप्रमणे कॅलरीजची गरज बदलते.
बर्‍याच संस्थळावर तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आवश्यक कॅलरीजचा अंदाज देतात. http://www.calorieking.com/interactive-tools/how-many-calories-should-yo...

बशा लाइफ स्टाईल ला रोजचे १३००-१४०० किलो कॅलरी पुरायला हरकत नाही, पण आपल्या तेलाच्या फोडण्या आणि चहा कॉफी मुळे आपण जास्त घेतो.