वासरू

Submitted by आवारा on 10 January, 2016 - 02:19

कालच आमच्या गायीच्या वासराने जन्म घेता-घेता शेवटच्या घटकाही मोजल्या आणि ते मृत असल्याचं डॉक्टरने सांगीतलं, अचानक वडिलांच्या चेह-यावर लक्ष गेलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं जाणवलं आणि आपसूकचं भरपूर प्रश्न मनात उभे राहिले. "बस फक्त एक गायीचं वासरूचं तर मेलय ना…? मग त्यात इतकं वाइट काय..? " रस्त्यावर अख्या माणूस अँक्सिडंट मध्ये मेल्यावर वाइट तर दुरच पण त्याच्याकडे पाहून गाडी सुसाट पळवणारे लोकं, त्यांना त्या मेलेल्या जिवाची कधी किंमतच नसते कि तो अँक्सिडंट झालेला आपला कोणी सख्खा नव्हता म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं..? इथे माणसाला किंमत नाही आणि वडिल गायीचं वासरू वाचलं नाही म्हणुन रडतायत. पण खरचं ते फक्त एक गायीचं वासरू होतं का..? कदाचित माझ्यासाठी हो पण वडिलांसाठी ते एक नातं होतं, किंबहूना वडिलांनी त्याच्या जन्मापुर्वीपासूनच त्याच्यात जिव गुंतवला होता. काय माहित कोणती भावना होती ती पण लहानपणी मी जेव्हा या वासरांसोबत खेळायचो तेव्हा त्यांच्यात नि माझ्यात एक ओळखीच नातं असायचं, वासरं मला पाहुन हंबरडायची पण आता माझा संबंध येतं नसल्याने मला त्याच मरणं एवढं विशेष काही वाटतं नव्हतं. पण आजही गोठ्यातली सारी जनावरं वडिलांना पाहून हंबरडतात आणि वडिलही तितक्याचं मायेनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि ती जनावरही त्यांचेे लाड वडिलांकडून करवुन घेतात हीच काय त्याच्या नात्यातली ओळख.
वासरू मेलं पण गाय मात्र शुद्धीत नव्हती. पण सकाळी ती शुद्धीवर आल्यावर आपल्या पोटात नऊ महिने सांभाळलेल्या वासराला पाहण्यासाठी खुंट्यावर आरडा ओरडा करेलं पण तिला कळेलं का..? की आपलं वासरू आता जिवंत नाहीय. कोण सांगेल तिला He is no more आणि ते तिला समजेल? . शेवटी तिही एक आई आहे. तिलाही आपलं वासरू कुठे गेलं याचं दुःख होणारचं. काय माहित काय वाटेलं तिला. पण वासरू मेलं हे ही मला योग्यचं वाटतं. काय होणारं होतं त्याचं पुढे, आयुष्यभर बैल झाल्यावर त्याला शेतात राबावं लागलं असतं कदाचित त्यानं आपल्या धन्याच्या भाकरिला जागुन आयुष्यभर ते केलही असतं पण आजकालच्या दुष्काळी परिस्थितीत अमुक मंत्री चारा पुरवणार याची वाट पाहत त्यालाही घरि चारा नाही म्हणुन बाजारात कमी-अधिक किंमतीत विकल्यावर त्याचीही कत्तल खाण्यात कत्तल करण्यात आली असती. असो पण जगून त्याला एक सुख नक्की मिळालं असतं वडिलांची माया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय. आजही माणूस प्राण्यांकडुन ईतके कष्ट करुन घेतो बघुन वाईट वाटतं... मी राहतो त्या परिसरात बर्याच वेळेला बर्फाच्या लाद्याच्या लाद्या वाहुन नेणारा एकटा बैल दिसला की खुप दया येते... त्या बिचार्याची काय अवस्था होत असेल? मन बेचैन होतं