अर्ज

Submitted by आवारा on 10 January, 2016 - 01:02

* अर्ज *

अर्जदार - समस्त विद्यार्थी

विषय - यस्टीतील खराब शिट बदलणे आणि यस्टीच्या टाइम टेबलात विद्यार्थ्याचे हित लक्षात घेऊन बदल करणे बाबत.

मा. आगार प्रमुख साहेब,

वरिल विषयी संपूर्ण विद्यार्थ्यांच्या वतीने अर्ज करतो की, आपल्या आगारातील बस क्रमांक एम.एच. १९ . ७१०० ही बस दर दिवशी सक्काळीच शाळा कॉलेजला येण्यासाठी आमच्या वाट्याला येते, सदरील बस मधील, अर्ध्या बसच्या मागील आसनव्यवस्थेचे हाल अपेक्षेपेक्षा अत्यंत द् यनिय आहे. शीटाची पाठ टेकवायची गादी पूर्णपणे गायब झालेली असल्याने त्यावर पाठ टेकवून बसतांना प्रत्येक खंड्यात गाडी गेल्यावर गाडीबैलात बसल्याची अनुभूती येते. या आसनांवर बसतांना मुलांना आणि विशेषतः मुलींना खुपच कष्टप्रायः यातनांचा सामना करावा लागतो. कधी- कधी तर मुलांचा घोळका एकमेकांच्या अंगावर जाउन पडल्याने, मुलांचा व मुलींचा वाद विकोपाला जाण्याची शक्यता असते. त्यात त्या मुली अजिबातच समजून न घेता उगाच आम्हां मुलांवर खटला भरवण्याच्या धमक्या देतात. या सा-याला यस्टीतील आसनव्यवस्था जबाबदार आहे.
साहेब, आम्हां विद्यार्थ्याच्या यस्टीच्या वेळेबद्दल काही तक्रारी आहेत, म्हणजे सक्काळी सहाची बस ही "सहाला" न पाठवता "सातला" पाठवली तर (विशेषतः हिवाळ्यात लय बेक्कार ठंडी असते म्हणून ) विद्यार्थ्याच्या आरोग्यास ते हिताचं असेल. म्हणजे रात्री पिच्चर पाहून उशिरा झोपलेल्या विद्यार्थ्यांना सक्काळी वेळेवर उठून नुसत तोडांवर पाणी मारून शाळेत किंवा कॉलेजला यावं लागणारं नाही आणि मुलींचाही घाई-गडबडीत केलेला मेकप व्यवस्थीत असेल.. सक्काळी लवकर उठण म्हणजे विद्यार्थ्यांना एक प्रकारे शिक्षाच आहे. तरि उपरोक्त विषयी आपण गहन विचार करून, यस्टीतील आसनव्यवस्था आणि टाईम-टेबल यातं बदल करावेत ही समस्त विद्यार्थ्याची विनंती.
आपले विश्वासू
समस्त पासधारक विद्यार्थी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users