तुझ्या कळा माझ्या कळा

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

(हास्पीटलातल्या दोन पेशण्टा चा स.न्वाद/ मनोगत )

तुझ्या कळा माझ्या कळा
गुंफू कळान्च्या माळा
ताई (सिस्टर ना ती) आणखि कोणाला
मज रे दादा (वॉर्डबॉय) नाठाळा

तु़ज बी पी (ब्लड प्रेशर) मज अ‍ॅलर्जी
आणिक डायबीटीस दोघाना
वेध लागले घरच्याना
'निरोप' मिळेल का आम्हाला

तुजे ई सी जी माझे सी ई टी
रीपोर्ट येइल कधी नॉर्मला
नाहीच आला तर घोटाळा
सान्गा तिकडच्या आर एम ओ ला

तुला ग्लुको़ज डीस्परीन मला
बॉटल नळ्यान्चा वेटोळा
आणिक रेचक दोघाना
नाही चालला तर एनीमा

आला इथे खुप कण्टाळा
लेकी-मूले नेतील का घरा
दीस अखेरचे काढायला
नातवान्बरोबर खेळायला

(चु भू द्या घ्या )

मूळ गाणे
"तुझ्या गळां, माझ्या गळां
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखि कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालिं हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."

"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"

प्रकार: