बळ
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
11
वेदनेच्या आहारी
मृत्युच्या तोंडी असताना
व्यक्त होण्याची
मृत धडपड कुणाला दिसते? समजते?
डोळे भरुन कुणाला पाहता येत नाही
हातात हात घेऊन छातीशी लावता येत नाही
खांद्यावर डोके ठेवून रडता येत नाही
पाठिवरुन हात फिरवता येत नाही
खोल श्वास घेऊन चार शब्द बोलता येत नाही
कुणाच्या शब्दाला ओ देता येत नाही!
एकेक निर्जीव .. गतप्राण झालेल्या
अवयवातली उरलीसुरली शक्ती
काही.. काहीच कामी येत नाही
व्यक्त न होण्याची ही शिक्षा भोगायला
सगळे बळ एकवटून दिलेला...
शेवटचा एक हुंकार पुरेसा आहे!!!
-बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
बी, किती छान !...
बी, किती छान !...
छान .
छान .
आवडली.
आवडली.
छान लिहिलंय..
छान लिहिलंय..
मनापासुन आवडले.. छान लिहिता
मनापासुन आवडले..
छान लिहिता
मस्त बी! ही आवडली
मस्त बी! ही आवडली नेहमीसारखीच
धन्यवाद! ही कविता मी माझ्या
धन्यवाद! ही कविता मी माझ्या बहिणीवर लिहिली आहे. मागच्या महिन्यात दत्त जयंतीच्या दिवशी ती गेली. तिला कर्करोग होता. मी तिथे सिंगापुरहून मुंबई, मुंबईहून पुणे आणि पुण्याहून नागपुर आणि मग कार रेन्ट करुन अकोल्याला पोचलो तेंव्हा माझी स्थिती.. तिची स्थिती खूप हेल्पलेस होती
बी, तुम्ही फार सुरेख लिहिलंय
बी, तुम्ही फार सुरेख लिहिलंय हे लिहायला खरंतर आले होते. पण तुमची ही पोस्ट वाचली
ईश्वर तुम्हाला आणि सगळ्या कुटुंबाला या दु:खातून मधून सावरण्याची शक्ति देवो.
सुंदर शब्द आणि भाव. बी,
सुंदर शब्द आणि भाव.
बी, तुम्हाला दु:खातून सावरायला हेच बळ कामी येवो.
धन्यवाद सर्वांचे!!!
धन्यवाद सर्वांचे!!!
बी, तुम्ही फार सुरेख लिहिलंय
बी, तुम्ही फार सुरेख लिहिलंय हे लिहायला खरंतर आले होते. पण तुमची ही पोस्ट वाचली अरेरे
ईश्वर तुम्हाला आणि सगळ्या कुटुंबाला या दु:खातून मधून सावरण्याची शक्ति देवो. >>>>>> +१११११११