एका नाजूक विषयावर सल्ला हवा आहे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 January, 2016 - 02:07

कळ कळीची विनंती - शीर्षकापासून आतला कंटेन्ट काहीही हास्यास्पद वाटला तर जरूर थट्टा मस्करी करा.
पण धागा ईतकाही भरकटवू नका की इथे कोणी दिलेला योग्य सल्ला त्यात हरवून जाईल.
कारण प्रॉब्लेम खरेच फार जेन्युईन आहे.

थेट मुद्द्यावर यायच्या आधी थोडी पार्श्वभूमी सांगतो.
लहानपणापासून माझ्या जेवणाच्या कलेचे कौतुक होत आलेय. ताटात हवे तेच आणि हवे तेवढेच घेणार. नासाडी जराही करणार नाही. ताटातले पदार्थ जागच्या जागी सजवून घेणार. हात खरकटे करत कधी डाळभात खाणार नाही. ताटाबाहेर कधी एक शितही सांडणार नाही. ओल्या भाजीचा रस्सा ओघळत लोणच्यात गेलाय, पापड भातावर ओवरलॅप होत नरम पडलाय, एखादा आवडीचा पदार्थ हावरटासारखा पहिल्याच वाढणीत भरमसाठ घेतलाय वगैरे वगैरे प्रकार दिसणार नाहीत. अगदी शेजारी बसलेला अनोळखी व्यक्ती सुद्धा माझी जेवनशैली पाहता स्वताहून कौतुकाचे दोन शब्द बोलायचा.

तर हे वरचे गुण आजही अंगी नांदत आहेत. पण यांची किंमत शून्य करणारा एक दुर्गुण माझ्या ग’फ्रेंडला माझ्यात सापडला आहे. तो म्हणजे, तिच्यामते जेवताना किंवा काहीही खाताना माझ्या तोंडून आवाज येतो.. मचाक मचाक मचाक ..

आधी मला हा ईतका गंभीर प्रकार वाटला नाही. दरवेळी तिने आक्षेप घेताच मी काहीतरी विनोदी कारण सांगून वेळ मारून न्यायचो. पण आता यातील वारंवारता ईतकी वाढलीय की यातील विनोदही संपून गेलाय. अर्थात या कारणावरून लगेच आमचा ब्रेक अप होईल असे काही नाही... पण तसे खात्रीने सांगताही येत नाही. परिणामी तिच्यासोबत हॉटेलमध्ये खाताना काय मागवावे जेणेकरून तोंडाचा आवाज कमी होईल याचा विचार करता मी आजकाल ज्यूस आणि कॉफीवरच भागवू लागलोय. नात्यासोबत तब्येतीचीही हेळसांड होऊ लागलीय.

गर्लफ्रेंडने शेवटचे फर्मान सोडले आहे. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मी आता यापुढे खाताना तोंडाचा आवाज करणार नाहीये. प्रॉब्लेम असा आहे, जर मला कुठले बिडीकाडीचे व्यसन असते तर रडत रडत सोडलेही असते. पण तोंडाचा होणारा आवाज सोडण्यासाठी आधी तो निर्माण कसा होतो हे तरी समजायला हवे.

१ जानेवारी उजाडल्यापासून मी फावल्या वेळेत विविध खाद्यपदार्थ खाऊन, कोणत्या पद्धतीने खाताना तोंडाचा किती आवाज होतो आणि तो कश्याप्रकारे कमी करता येईल, हे घरच्या आरश्यात चेक करत आहे. तरी नेमका उपाय सापडत नाही. म्हणून इथे मदत मागत आहे.

तर खालीलप्रकारची मदत अपेक्षित आहे.

१) तोंडाचा आवाज होणे हे शारीरीक जडणघडणीशी निगडीत असते की चर्वणाच्या सदोष पद्धतीमुळे हा आवाज येतो? या ध्वनीनिर्मितीचे नेमके कारण काय?
२) यावर उपाय काय? पहिले कारण असल्यास एखादी सर्जरी वा तोंडाचा व्यायाम सुचवा. दुसरे कारण असल्यास घास कसा चावावा याचे तंत्र सांगा. गप्पकन गिळायचा असले अघोरी विनोदी उपाय नकोत.
३) सर्जरी असल्यास त्याचा इन्शुरन्स क्लेम करता येतो का? की ते डोळ्यांच्या लेजर ऑपरेशन सारखे कॉस्मेटीक मध्ये मोडते?
४) काही वेगळेच कारण आणि काही वेगळाच उपाय असतो का? मी माझ्या सायंटीफीक कल्पनाशक्तीला ताण देत आहे पण काही सुचत नाहीये.

सहकार्य कराल अशी अपेक्षा
धन्यवाद
ऋन्मेष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी, खरेच माहीत नाही नोबिता. डोरेमॉन माहीत आहे. एकदा एका लहान मुलाच्या बड्डेला गेलेलो तेव्हा केकवर बसलेला.

साती, ती माबोवर नाहीये. आली तरी धागे नाही काढणार. ते काम माझेच. ती फार तर माझे हजार धागे झाल्यावर आमच्या होणार्‍या मुलांसाठी स्वेटर विणेल.

अतुल पाटील, धन्यवाद. जगात आणि आपल्या आयुष्यात ईतरही प्रॉब्लेम आहेत हे तिला त्याक्षणी जाणवून देण्याचा उपाय उत्तम.
साईड बाय साईड माझे प्रयत्न चालू आहेतच. २१ दिवसांचे माहीत नाही पण २५ वर्षांची सवय बदलायला २५ दिवस तरी दिले पाहिजेत असे टारगेट मी स्वताला दिलेय.

एक उपाय माझ्याकडून :

एक लाल रंगाचा ब्रांडेड रुमाल घ्या आणि त्याची त्रिकोणी घडी घालून पँटच्या डाव्या खिशात घाला. तुमच्या गफ्रेच्या जन्मतारखे एवढे काळे मनुके उजव्या खिशात ठेवा. गफ्रेच्या जन्ममहिन्याच्या संख्येएवढ्या लसणाच्या पाकळ्या गफ्रेबरोबर जेवण्याआधी तुम्ही स्वतः कराकरा चावून खा आणि एक डोळा बंद करुन एक पाय मुडपुन जेवायला बसा.

नक्की करुन बघा.

हा उपाय मुपी मध्ये एका नामवंत तज्ञांनी लिहिला होता. Happy

मी आजकाल ज्यूस आणि कॉफीवरच भागवू लागलोय >>>

त्यातही काळजी घेणे जरुरी आहे. ज्यूस जर स्ट्रॉ ने पीत असाल तर ग्लासमधला ज्यूस पार तळाशी गेल्यावर शेवटचा सीप घेताना स्ट्र्र्र्ड्र्ड्र्र्ड्क्र्र्‍रृर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज येउ शकतो.

ऋन्मेऽऽष तुला अगदी साष्टांग नमस्कार. कोपरापासून / पायावर डोक वगैरे ठेऊन नमस्कार तुझ्या इतका मायबोलीचा वापर आत्तापर्यत कोणीच केला नसावा. कायमच स्वत विषयी स्वताच्या गर्ल फ्रेंड विषयी मायबोलीकरांना विश्वासात घेऊन सांगितलस. त्यावरून थट्टा झाली तरी मनावर घेतलं नाहीस. किती हि माबोलीकरांनी नाव ठेवली तरी अफाट धागे विणलेस . वेळोवेळी गर्लफ्रेंड चा उलेख केलास. ती मायबोलीवर नसूनही तिला सामील करून घेतलास( का आहे मायबोलीकर ती ? ) एक काहीतरी अद्भुत रसायन आहेस तू . तुला भेटावस वाटतय खरच ? Happy

छोटी समस्या आहे पण समोरच्याला त्रासदायक होऊ शकते. ही सवय घालवता आली तर चांगलेच होईल, वाईट नक्कीच होणार नाही.
आता हे सर्व एकाचवेळी करावे: छोटे घास घ्यावेत (कितीही भूक लागली, कितीही आवडता पदार्थ असला तरी बक्कन तोंडात अन्नाचा डोंगर कोंबु नये). हळुहळु चावावे (अगदी गाय होऊन बसायची गरज नाही). शेवटचे, एकदा घास तोंडात विराजमान झाला की तो चावुन घशात जाईतोवर तोंड बंद ठेवावे, बंद ठेऊनच चावावे, गिळावे ईत्यादी. मैत्रीण 'बोल' म्हणु लागली तर हातानेच खुण करुन सांगावे की घास खाऊन झाला की बोलतो. आणि इथे इतर आलेल्या काही फाजिल उपायांकडे दुर्लक्ष करावे कितीही मोह झाला तरी. :-).

ज्यूस जर स्ट्रॉ ने पीत असाल तर ग्लासमधला ज्यूस पार तळाशी गेल्यावर शेवटचा सीप घेताना स्ट्र्र्र्ड्र्ड्र्र्ड्क्र्र्‍रृर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा आवाज येउ शकतो.>> +१. Lol

८) बादशहा - सोपा उपाय आहे. तोंड बंद ठेऊन जेवायचे >> कुठून

म्हणजे घास तोंडात टाकल्यावर तोंड बंद ठेऊन खायचे

८) बादशहा - सोपा उपाय आहे. तोंड बंद ठेऊन जेवायचे >> कुठून

म्हणजे घास तोंडात टाकल्यावर तोंड बंद ठेऊन खायचे

अजिबात साधी सवय / छोटी गोष्ट नाहीये ही. हे मचाक मचाक फारच इरीटेटींग असतंय. ऋ, तु प्रयत्नपुर्वक ही सवय सोड.

आमच्या ऑफिसात एक आहे. जेवताना अख्या पॅन्ट्रीत त्याचं आपलं मचाक मचाक आणि थोड्या थोड्या वेळाने स्स्स्स स्स्स्स. Angry आणि एकदा त्या आवाजाकडे लक्ष गेलं ना की सारखंच जातं आणि राग येतो. फक्त मलाच नाही तर आणि अजुन बर्‍याच जणांना.

आता ह्या वरुन मला मान्सिक का काय ती गरज आहे असं असेल तर असेल बापडी. पण मचाक मचाक इज बॅड मॅनर.

'छोटा घास घेऊन ओठ बंद करून आतल्या आत चावून खाणे' हा एकमेव उपाय आहे. जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास ८-१० दिवसांत सवय लागून जाईल.

नंतर १०० रुपयांचे पेढे सगळ्यांना (वर उपाय सुचवलेल्या सर्व मा.बो.करांना) वाटायला विसरू नका. जास्त चांगला परिणाम होतो.

फार गंभीर प्रकरण दिसतय बुआ.....
आपण श्वानयोनीचे आहात काय ( पत्रिका बघून सांगा)
त्याचे कसे आहे त्या त्या प्राण्याच्या सवयी येवू शकतात आचरणात , आणि अजून तोंडाचे सायलेंसर नाही आले बाजारात नाहीतर सर्वांनी आपापल्या बायकांच्या तोंडाला बसवून घेतला नसता का ? Happy

कदाचित पटणार नाही पण यावर एक उपाय आहे, योगासनातला एक प्रकार आहे व्याघ्रासन तो रोज सकाळी करायला चालू करा ..
फार काही करायचे नाही यात जीभ बाहेर काढून वाघासारखे बसायचे त्यामुळे तोंडात असलेली अतिरिक्त लाळ कमी होते आणि जेवताना आवाज कमी होईल.

भेंडी ते "मचाक मचाक " बदल आधी, मायबोलीची आर्धी पब्लिक त्या नावाने धास्तावली असणार, वर त्यात नाजुक विषय म्हणे !!!!

तु "धागामेनियाक" झालायेस.

नाजूक विषय वाचून पहिल्यांदा दचकायला झाले होते पण खाली ऋ चे नाव बघून 'याचे नक्की गर्लफ्रेंड बरोबर भांडण झालेय किंवा तिला याचा फेसबुक पासवर्ड हवाय म्हणून सल्ला विचारतोय' या खात्रीने नि:शंक होऊन धागा उघडला. Happy

आपण श्वानयोनीचे आहात काय ( पत्रिका बघून सांगा)
>>>
माझा पत्रिकेवर विश्वास नाही म्हणून लहानपणीच फाडली.
पण श्वानयोनी शब्द ईंटरेस्टींग वाटतोय. काय असते हे नक्की?
तसेच मला कुत्रे आवडत नाहीत, कुत्र्यांना मी आवडत नाही. तरीही मी श्वानयोनीचा असू शकतो का?

ऋ - तु घोरतोस पण कारे....
पुढचा धागा यावर येऊ दे...घोरणे देखील फार त्रासदायक होऊ शकते.

साती शी पूर्ण पणे असहमत. जेवताना कोणाच्या तोंडून असं आवाज येत असेल तर मला हि इरिटेट होते. पण अर्थात मी हे समोरच्याला सांगत नाही. कारण माणसे उगाच दुखावले जाण्याची भीती असेते. पण गफ्रे ने सांगायला काही हरकत नसावी. तिला सायकिक म्हणण्याची काहीच गरज नाही. ओठ मिटून जेवणे हे शिष्टचाराना धरून आहे. आणि आम्हाला नाही पाळायचे शिष्टाचार. लोक कोण आल्म्हला सांगणार कस जेवावं अस जर म्हणण असेल एखाद्याचं तर प्रत्येकाची मर्जी. फक्त सार्वजनिक जागी कोणी तोंडावर उणीव दाखवली तर वाईट वाटून घेऊन नये हेमावैम. बाकी ऋन्मेश सुज्ञ आहे. त्याला जर त्याची सवय बदलावीशी वाटते तर त्याबद्दल बोलावे. गफ्रे आणि शिष्टाचारांबद्दल नाही Lol

Pages