कोणीच येत नाही माझ्या घरात आता...(तरही)

Submitted by सत्यजित... on 2 January, 2016 - 14:41

इतकेच येत आहे माझ्या मनात आता...
कोणीच येत नाही माझ्या घरात आता!

चौचाल चांदण्यांचा गेला कुठे पसारा?
का चांदही कळेना नाही नभात आता!

अंधार फार झाला पणती विझून गेल्या...
मीही मला दिसेना धड सावल्यात आता!

मी शोधतो स्वतःला दर्पण धरून हाती...
निखळून सर्व पारा जातो क्षणात आता!

या एकटेपणांतच झालोय गर्क इतका...
मजलाच मी बिथरतो माझ्या भ्रमात आता!
—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि ओळ नेमकी कुणाची? आणि त्यासाठी आभार कुणाचे मानावे?किंवा आवश्यक असल्यास परवानगी कुणाला मागावी? असे काही प्रश्न पडल्यामुळे ही तरही आजवर येथे पोस्ट केली नव्हती! ही ओळ ज्यांची असेल,त्यांचे मनस्वी आभार! तसेच परवानगी न घेता तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!

nice

खुप धन्यवाद सुप्रियाजी!

बेफीजी,आपले अनेक आभार...आणि क्षमस्व!

Thanks moga